गांधी व फाळणी Gandhi and divisied India

*फाळणीला गांधी जबाबदार होते का? गांधीजींनी मुस्लिमांचे लांगुलचालन करून हिंदूंच्या हिताशी तडजोड केली होती काय?* या प्रश्नाचा अस्सल ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे घेतलेला वेध!


फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींनी तयार केलेला तडजोडीचा हाच तो मसुदा जो काँग्रेस श्रेष्ठींपैकी कोणीही मान्य केला नाही आणि त्यामुळे गांधीजींनी वाटाघाटीतून अंग काढून घेतले.
----------------
२६९. तडजोडीच्या सुत्राचा मसुदा
(गांधीजींनी यावर आपल्या हस्ताक्षरात “गांधीचा मसुदा” असे लिहिले आहे.)
[एप्रिल १०, १९४७] (लॉर्ड माऊंटबॅटन यांना एप्रिल ११, १९४७ला पाठवलेल्या पत्रानुसार गांधीजींनी या मसुद्याची कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांशी आदल्या दिवशी रात्री चर्चा केली होती. पाहा लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र एप्रिल ११, १९४७)


 १. जोपर्यंत पाकिस्तानचा प्रश्न आहे आणि काँग्रेसची गोष्ट आहे बळजबरीने काहीही दिले जाणार नाही. गोष्ट जर विवेकाला पटण्यासारखी, न्याय्य आणि तर्कशुद्ध असेल तरच मान्य केली जाईल. बळजबरीने काहीही घेतले जाणार नसल्यामुळे कोणत्याही प्रांताला वा त्याच्या भागाला पाकिस्तानमध्ये सामील न होण्याचा आणि इतर प्रांतांबरोबर राहण्याचा अधिकार असला पाहिजे. उदाहरणार्थ आज माहीत असल्याप्रमाणे काँग्रेसबरोबर सरहद्द प्रांत आणि हिंदू आणि शीख यांची निर्णायक बहुसंख्या असलेला पंजाब आहे आणि यामुळे हे भाग पाकिस्तानच्या क्षेत्राबाहेर राहतील. अशाच प्रकारे पूर्वेकडे आसाम स्पष्टपणेे पाकिस्तानच्या क्षेत्राबाहेर आहे आणि बंगालचा पश्चिम भाग, दार्जिलिंग, दिनाजपूर, बारद्वान, मिदानपूर, खुलाना, २४ परगणा इत्यादी हिंदू बहुसंख्य भागही, जिथे हिंदूंची निर्णायक बहुसंख्या आहे, पाकिस्तानच्या क्षेत्राबाहेर राहतील. आणि काँग्रेस ज्याअर्थी तर्कसंगत असेल ते मान्य करण्याकरिता तयार असल्यामुळे हिंदूंना योग्य वागणूक देऊन त्यांना बंगालची फाळणी करण्याबद्दलच्या जाहीर भूमिकेचा पुनर्विचार करण्याकरिता मुस्लिम लीगला आवाहन करू शकते.

 २. सुचवण्यात आलेली तडजोड झाली (पाहा“तडजोडीच्या मसुद्याची रूपरेषा”, एप्रिल ४, १९४७) तर मुस्लिम लीग सहकार्याच्या भावनेने घटनासमितीत पूर्णपणे भाग घेईल यासंबंधात हा उल्लेख करणे आवश्यक असेल. यामुळे इथे या गोष्टीचा उल्लेख करणे अनुचित होणार नाही की विभक्त मतदार संघाच्या व्यवस्थेने राष्ट्राची जास्तीत जास्त हानी केली आहे आणि यामुळे काँग्रेसचा भर या गोष्टीवर असेल की निवडणुका संयुक्त मतदार संघाद्वारे घेण्यात याव्या आणि जिथे आवश्यकता असेल तिथे राखीव जागा ठेवण्यात याव्या हे काँग्रेसचे निश्चित धोरण आहे.

 ३. सध्या आसामवर जो हल्ला केला जात आहे (मुस्लिम लीगने आसाममध्ये मुसलमानांना घुसवण्याकरिता आणि तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात बदल व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते.) आणि तथाकथित सविनय आज्ञाभंगाचा विचार केला जात आहे (आसाम प्रांताच्या मुस्लिम लीगने मार्च ३० पासून सविनय आज्ञाभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.) तो पूर्णपणे थांबवण्यात आला पाहिजे.

 ४. असे म्हणतात की टोळीवाल्यांशी संगनमत करून सरहद्द प्रांत आणि इतर भागात दंगली घडवून आणण्याचा मुस्लिम लीग प्रयत्न करते आहे, हे थांबायला पाहिजे.

 ५. हिंदूंच्या भावनांची आणि विरोधाची पर्वा न करता सिंध(प्रांताच्या) विधानसभेने घाईघाईत जो हिंदू विरोधी कायदा केला आहे तो रद्द केला पाहिजे.

 ६. मुसलमान बंहुसंख्याक प्रांतात नागरी आणि पोलीस खात्यात हिंदूंना वगळून गुणावगुणांचा विचार न करता मुसलमानांची भरती करण्याचा जो उघडउघड प्रयत्न सुरू आहे तो यापुढे थांबवण्यात आला पाहिजे.

 ७. खून, जाळपोळ आणि लूटमार करण्याकरिता प्रेरित करणारी आणि द्वेषभावना वाढवणारी भाषणे थांबवण्यात आली पाहिजे.

 ८. इंग्रजीतील वा इतर कोणत्याही देशी भाषेतील डॉन, मॉर्निंग न्यूज, स्टार ऑफ इंडिया, आझाद इत्यादी वर्तमानपत्रांच्या हिंदूंबद्दलची द्वेषभावना पसरवणाऱ्या धोरणात बदल घडवून आणण्यात आला पाहिजे.

 ९. नॅशनल गार्डच्या बुरख्याआडील उघड वा गुप्त स्वरूपातील खाजगी सैन्य थांबवले पाहिजे.

 १०. बळजबरीचे धर्मांतर, बलात्कार, अपहरण, जाळपोळ आणि लूटमार, ज्यामुळे मुसलमानांकडून  स्त्रिया, पुरुष आणि मुलांचा खूनसुद्धा होतो, ती थांबवण्यात आली पाहिजे.

 ११. मुस्लिम लीगने जे करावे अशी काँग्रेसची अपेक्षा आहे ते सर्व काँग्रेसही पूर्णपणे करील.

 १२. इथे जे सांगण्यात आले आहे ते संस्थानांना, पोर्तुगीज भारताला आणि फ्रेंच भारातालाही लागू होईल.

 १३. वरील गोष्टीत दोन्ही पक्षांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि करारात ती जाहीरपणे आणि लेखी स्वरूपात मान्य केली पाहिजे. असे झाले तर मुस्लिम लीगने केवळ मुसलमानांचे वा काही मुसलमान आणि इतर काही लोकांचे जरी संपूर्ण मंत्रिमंडळ तयार केले तरी त्यावर काँग्रेसचा कोणताही आक्षेप नसेल.

 १४. वरील अटी मान्य करून मुस्लिम लीगने जर मंत्रिमंडळ तयार केले तर काँग्रेस त्याला पाठिंबा देण्याचे वचन देते आणि आपल्या बहुमताचा उपयोग ती केवळ मुसलमानांना पराभूत करण्याच्या  हेतूने करणार नाही. उलटपक्षी प्रत्येक उपायाचा त्याच्या गुणदोषाच्या बळावर विचार केला जाईल आणि संपूर्ण हिंदुस्तानच्या कल्याणाकरिता जे पाऊल उचलले गेले असेल त्याला काँग्रेस पाठिंबा देईल.


महात्मा गांधी - द लास्ट फेज, भाग २, पृष्ठ १२८ आणि १२९ मधील चित्र
-------------------
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९४, इ-पुस्तक
अनुवाद ब्रिजमोहन

(वरील दोन्ही संदर्भ उपलब्ध आहेत)

*हे सर्व पुरावे पाहता गांधींनी मुस्लिमांचे लांगुलचालन केले, हिंदूंच्या हिताशी तडजोड केली वगैरे प्रचार खोटा ठरतो.*

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510