अहिंसा _ म गांधी
अहिंसा
🍀🍁🌿☘🌸
अहिंसा परमो धर्म '
माननारे वर्धमान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी म्हणजे प्राचीन काळापासून भारत देश ज्या अहिंसेच्या तत्वाचा पुरस्कार केला आहे ,त्या तत्वज्ञानाचे त्या - त्या काळातील पुरस्कर्ते होते.
गांधी म्हणत ' हिंसा हा पशूचा ,तर अहिंसा हा सुसंस्कृत मानवाचा धर्म आहे. ' अहिंसेचे व्रत घेतलेल्या व्यक्तीच्या मनात कधीही कोणाबद्दल शत्रुत्व नसते.तो उच्च धर्माचे, आत्मबळाच्या धर्माचे पालन करते.
मात्र गांधींची अहिंसा म्हणजे दुर्बलता नव्हती, असहाय्यता नव्हती किंवा दूर्बलता नव्हती. तर ते एक सर्वोच्च कोटीचे शौर्य होते. अहिंसा दुबळ्याचे नव्हे तर शूरांचे शस्त्र होते .
गांधीचे मते भेकड माणूस अहिंसेचे पालन कधी करू शकत नाही. ते म्हणत 'भ्याडपणा आणि हिंसा यांच्यात निवड करण्याचा प्रसंग आलाच तर हिंसा पत्करावी '
त्यांनी आफ्रिकेत असताना बोअर युद्धात व झुलूंच्या बंडात भाग घेतला आणि १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेंव्हा भारतीय फौजा धाडण्यास त्यांनी तात्काळ संमती दिली ती यामुळे.
आपली अप्रतिष्ठा होत असताना ,ते असहाय्यपणे बसण्यापेक्षा आपल्या सन्मानाचे रक्षण करण्याकरीता भारताने शस्त्र हाती घेतले तरी चालेल असे ते म्हणत !
अहिंसेचे व्रत घेतलेल्या व्यक्तीचे ठायी कोणते गुण हवेत हे गांधी नेहमी स्पष्ट सांगत. -
१ त्या व्यक्तीने कोणताही प्रसंग येवो, सत्याची कास सोडता कामा नये,
२ शत्रु वा विरोधकांविषयी मनात क्रोध, मत्सर वा द्वेष असू नये.
३ उलट सर्वांबद्दल आपुलकी, प्रेमभाव असावा.
४ चित्तवृत्ती स्थिर असावी.
५ अंतरंग स्वच्छ व मन निर्भय असावे.
६ मन अनासक्त, सर्व मोहांपासून मुक्त असावे
७ गरजेपेक्षा जादाची संग्रहवृत्तीचा हव्यास नको
असे अहिंसा व्रताचे नियम, दंडक त्यांनी घालून दिले. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे ते आयुष्यभर चालले. वैचारिक विरोधक वा ब्रिटिशांबद्दल द्वेष वा क्रोध त्यांचे मनाला शिवला नाही.
*म गांधींची स्थितप्रज्ञता ,स्थिर चित्तवृत्ती,निर्भयता ,मनातील असीम शांती आणि निर्मळ,खुले मन यांची हजारोंनी,परकीय समीक्षक, पत्रकार,राजकीय तत्वज्ञ,महान नेते यांनी प्रशंसा केली आहे*
महात्माजींनी आपल्या फार्मला ज्या टॉलस्टॉयचे नाव दिले तो शांतीचा, अहिंसेचा, प्रेम धर्माचा प्रेषित होता, श्रमजीवनाचा कैवारी होता. गांधीवर या विचारांचा प्रभाव होता. टॉलस्टॉय शांततावादी होता, तो प्रतिकाराचा पुरस्कर्ता नव्हता. सारे सहन करावे _ अशी त्यांची निती.
गांधीजींनी शांततावादी मार्गात प्रतिकार ओतला.
आणखी एक महत्वाचे - 'अहिंसा फक्त साधू, संत आणि तपस्वी यांचेपुरती मर्यादीत होती. ती सर्व सामान्य लोकांनी कशी आचरावी यासाठी गांधीनी वस्तूपाठच दिले.'
*फ्रेडिक बॉन फिशर म्हणतात ' प्राचीन भारतातील अहिंसा नकारात्मक होती.गांधींची अहिंसा म्हणजे एक विधायक तत्व होते, ते एक आक्रमक शस्त्र होते.*
महावीर जयंती१७.४.१९
.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,भाग ७८🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
प्रतिक्रिया देऊ शकता
What's app 8275370028,e emai-
guravrajendra546@gmail.comआणिFacebookवरही🌺

Comments
Post a Comment