रंग हा वेगळा

*रंग हा वेगळा*
🍁🌸🍀☘🌿
वर्ग संघर्षाची कहानी ही मानवी जीवन वृत्तांतातला महत्वाचा भाग आहे.

विभाजीत होणे, आपला गट बनविणे ही मानवाची प्रवृत्तीच आहे. रंगावरून,रुपावरून, भाषेवरून, धर्मावरून... कितीतरी गट निर्माण झाले आहेत. व्यवसायावरून, पंथावरुन, सामाईक प्रश्नावरूनही मानवी गट सहज पडतात.

आपआपला झेंडा, घोषणा, देव_ नेता इ ठरविण्यात माणूस सक्षमच आहे.

कपडयांच्या रंगावरून माणसांचे गट करायचे ठरवले तर किती गट होतील.
पण एखादे शाळेचे, ऑफीसचे सुव्यवस्थापनासाठीही एखादा ड्रेस कोड स्वीकारावा लागतो.
ती शिस्त येण्यास मात्र खूप कष्ट करावे लागते, वेळ दयावा लागतो, लाभार्थी परिपक्व व्हावे लागतात.
मानवीमनामध्ये एकात्म भाग निर्माण करणे महाकठिण
हे शिवधनुष्य अनेक साधू- संतांनी , महात्मांनी पेलण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत देशात आजही एवढी विविधांगी संस्कृती एकत्र नांदत आहे.याचे बरेचसे श्रेय म.गांधीना दिले जाते, दयायला हवे. नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींचा राष्ट्रपिता म्हणून यथोचित गौरव करतात, ते यामुळेच !

स्वतंत्र भारताच्या निवडणूका जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण, प्रत्यक्ष पक्ष कसा प्रचार करीत आहेत. विभाजनाचा विचार आहे ,अनेक मुखी !
सर्वांभूती समानत्वाचा लवलेश नाही.
मतांची पोतडी भरण्यासाठी जातीयवादांचा स्पष्ट आसरा. धर्मांध शक्तीचा नंगानाच !..... सुजाण भारतीय, अणवस्त्रधारी, प्रगतशील भारताची वैचारिक अवस्था !

स्वातंत्र्यपूर्व भारतवर्षात अनेक पंथ, विचारधारा, इंग्रजांचे  *डिव्हाईड अॅण्ड रुल*ची नीती.... या परिस्थितीत सर्वांना आश्वासक नेतृत्व गांधीनी दिले. नेताजींनी यथार्थपणे या सर्वांच्या एकात्मतेचे श्रेय गांधीजींना दिले आहे.

साठमारीच्या धुलवडीत गांधीचा साधा पांढरा रंग कितपत रुचेल, पटेल.. हाच खरा प्रश्न आहे.
🌿☘🌸🍀🍁

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त
भाग ९o🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510