अहिंसा २

अहिंसा - २
🍁🌸🌿☘
म गांधींनी अहिंसेच्या तत्वाचा लावलेला अन्वयार्थ, अखिल मानवतेच्या कलाण्याचा आहे.
सततची युद्धे,लढाईची खुमखुमी, रक्तपात , सामान्यांवर भीतीचे सावट असणे इ... इ. अहिंसेचा त्यांनी धरलेला आग्रह जगाला त्यांनी केलेले एक महत्वाचे योगदान आहे.

अहिंसा म्हणजे हिंसा न करणे असा ढोबळ अर्थ सर्वसामान्यां कडून घेतला जातो. पण गांधीच्या दृष्टीने अहिंसा एक तत्व आहे. आणि या तत्वाला खूप व्यापक अर्थ आहे.

 त्यांच्या दृष्टीने आचाराने, विचाराने किंवा उच्चाराने कोणालाही न दुखावणे, क्रोधामुळे , स्वार्थामुळे किंवा सुडबुद्धीने कोणत्याही प्राणिमात्राला इजा किंवा दुःख न देणे म्हणजे अहिंसा.
अहिंसेचे व्रत घेतलेल्या व्यक्तीबद्दल कोणाबद्दल  मनात शत्रुत्व नसते, मनात तो क्षमाशीलच असतो.

परवान्यांच्या होळी बरोबर सत्याग्रहाच्या आंदोलनास धार आली.
गांधीजींनी टॉलस्टॉयची ग्रंथ संपदा अभ्यासली होती. टॉलस्टॉयचा प्रभाव गांधीवर होता.

टॉलस्टॉयचे गांधींच्या सत्याग्रहावर इतर जगाप्रमाणे कुतुहुलाने लक्ष होते.
त्यांनी गांधीजींच्या सत्यागहाच्या आंदोलनाला आशिर्वाद पाठविले.वयोवृद्ध शांती दूताचे नूतन प्रेषितांस जणू शुभेच्छा मिळाल्या होत्या.
आपले डोळे मिटण्यापूर्वी अहिंसक लढा आपण ऐकला याचा टॉलस्टॉयला मनस्वी आनंद झाला.
लवकर वयोवृद्ध असलेले टॉलस्टॉय यांचे निधन झाले.



म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510