महिला सत्याग्रह - १

*महिला सत्याग्रह*
🍁🍀🌸☘🌿🌺

द आफ्रिकेतील त्या काळ्या कायदयाविरुद्ध महिल्यांचे बरोबर गांधींनी चर्चा केली आणि महिला सत्याग्रहास तयार झाल्या . कस्तुरबाही यात सामील झाल्या. साऱ्यांचा  उत्साह वाढला.

एक चैतन्य घेऊन महिला बाहेर पडल्या. ट्रान्सवॉलची हद्द ओलांडून त्या नाताळमध्ये आल्या. कोणीही त्यांना अटकाव केला नाही. त्यांची प्रतिकार शक्ती ती काय ?
त्या पुढे चालत राहिल्या - रस्त्यात भेटणाऱ्या कामगार, मजूर, महिला या सर्वांना त्या बेकायदे यांची माहिती सांगत.
' ३ पौडांचा कर, लग्नच बेकायदा ठरविणारा कायदा. ! ' माहिती ऐकल्यावर सर्व संतापत. वणवा पेटत होता. त्या  सर्वांनी संप पुकारला.

सरकारने पाहिले की ह्या सत्याग्रही स्त्रियांना ह्या पुढे मोकळे ठेवणे धोक्याचे आहे. स्त्रियांना अटक करण्यात आली. तुरूंगात नंतर न्यायालयापुढे.
तीन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली. भारतीय नारी तिकडे दूर आक्रिकेतील तुरूंगात खितपत पडल्या. कस्तुरबांचे एक धान्य व्रत होते. त्यांची दाद लागेना. मोठया कष्टाने त्यांना त्यांचा आहार मिळू लागला. परंतु त्या अशक्त झाल्या. सुटल्या तेव्हा नुसती हाडे राहिली होती. मोठ्या प्रयत्नाने त्यांचे प्राण वाचले. तब्येत मात्र हडकली. अभंग निर्धार कायम होता.

आणि ती पुढं अमर झालेली वलीअम्मा !
१६ वर्षाचे तिचे वय. ती तुरुंगातून ताप घेऊन बाहेर आली. महात्माजी तिच्या समाचारास गेले. ती उंच होती ; त्यामुळे तिचा कृशपणा अधिकच भेसूर दिसे. गांधीजी आस्थेने तिची चौकशी करू लागले.
"वलीअम्मा तुला तुरूंगात गेल्याबद्दल वाईट नाही ना वाटत? " गांधीजींनी विचारले.
"नाही , मुळीच नाही.पुन्हा तुरुंगात जायची वेळ तर आनंदाने जाईन"
" हे सगळं सहन करताना मरण आले तर ?"
" मरणाची कुणा पर्वा ! सत्यासाठी मरण कोणा नको आहे. "

गांधीच्या या संवादानंतर वलीअम्माचे निधन झाले
त्यागाचा , स्फूर्तीचा शाश्वत वारसा ठेवून !

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510