सत्याग्रह - ५

*सत्याग्रह ५*
🌿☘🌸🍀🍁
गांधीजींच्या आफ्रिकेतील सत्याग्रहाची माहिती जगभरच्या साहित्यातून मिळते. Satyagraha in Africa या नावाचे पुस्तकात ती प्रसिद्ध झाली आहे.
त्याचे मराठीतील भाषांतर  उपलब्ध आहे. ' नवजीवनच्या ' अंगात सत्याग्रहाचा वृत्तांत क्रमशः प्रसिद्ध झाला आहे.
मा वालजी गो देसाई यांनी 'करंट थॉट ' हे पुस्तक यावर लिहले आहे.
' *द.आफ्रिकेतील सत्याग्रहाचा तो विजय अपूर्व होता. जगाच्या इतिहासात एक नवीन पान लिहले गेले* _ असा गौरव साने गुरुजींनी केला आहे.

या सत्याग्रहाच्या लढयात गांधींची सुहृदयता अनुयायांच्यात, विरोधकांचे मनात घर करून राहिली.

सत्याग्रहाच्या एका प्रसंगात एक व्यक्ती गोळीबारात ठार झाला.गांधी त्या विधवा मातेचे सात्वंनास गेले. गांधी म्हणाले
"तुमचे सांत्वन मी कसे करू ?. .. अनेकांचे सुखासाठी मला हा लढा लढायला हवाच ! "

गांधी कृतीशील नेते होते. अनेक हृदयद्रावक प्रसंगात ते ढळले नाहीत.

शिष्यांप्रमाणे असणाऱ्या गांधीजींच्या कर्तृत्वाची असिम छाप नामदार गोखले यांचेवर पडली. गांधींच्या एकूण व्यक्तीमत्वामुळे ते प्रभावीत झाले.
गोखले म्हणतात
 *भारतीय संस्कृतीतील सर्व शुचिता व दिव्यता गांधीजींच्या द्वारा प्रकट होते.हिंदी संस्कृतीचा परमोच्च विकास म्हणजे गांधीजींची मूर्ती होय.*
भाग ८८
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510