यमाई देवी औंध, आरती
नवरात्र द्वितीया ,३रा दिन ३/१o I१६
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
*!!श्री मूळपीठ यमाईची आरती ॥*
जगदंबे मूळपीठ निवासिने - आरती तुज अंबे I
यमाईमाते, औंधासूरमर्दिने -
आरती तुज अंबे
सुहास्य चंद्रमा ल्याली, भस्म विलेपन भाली
शिवशंभूची अर्धांगी माऊली ,आरती तुज अंबे_1
त्रिशुल, डमरु हाती, जटाभार शोभे माथी
ऊँ 'काराचा घोष तुझ्या अंतरी,आरती तुज अंबे - 2
वजर्टीक भाळली कंठी , रुद्रमाळ रुळे वक्षी
जगनमाऊली तेजस्वी तपस्वीनी, आरती तुज अंबे- 3
मांगल्यमूर्ती शिवे, मयूरवाहिनी अंबे
औंधासूराला मारिले तू बळें,आरती तुज अंबे --4
सगुण - निर्गुण रुपे , शक्तीची प्रतिबिंबे
कृष्णनंदनास्तव ह्रदयी विराजींते,आरती तुज अंबे
॥ *कृष्णनंदन* ॥
भावार्थ -
*जगदंबे मूळपीठ निवासिने - आरती तुज अंबे I*
*यमाईमाते, औंधासूरमर्दिने - आरती तुज अंबे*
श्री. मूळपीठनिवासिनी श्री यमाई हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान.. अनेकांचे कुलदैवत ही ! त्या देवीची स्तुती करताना कवी म्हणतो...

*यमाईमाते, औंधासूरमर्दिने -आरती तूज अंबे ॥*
मूळपीठ यमाईची भव्य दिव्य मूर्ती भक्तांवर वेगळाच प्रभाव टाकते.
भव्य कपाळ, कुंकवाचा मळवट व त्यावरील रेखीव हळदीची चंद्रकोर !
पार्वती रुपात देवीस भस्म विलेपन प्रिय आहे... ही पार्वती शिवशंभूची अर्धांगी सर्वांस वंदनीय आहे.
*सुहास्य चंद्रमा ल्याली, भस्म विलेपन भाली*
*शिवशंभूची अर्धांगी माऊली ,आरती तुज अंबे*
शिव -प्रभावळीतील ही देवता असल्यामुळे देवीचे हाती त्रिशुल, डमरू आहे. शिव रुपात जटा अनं शिवाची ध्यानमुद्रा अत्यंत भक्त प्रिय आहे. मूळपीठ गडावर देवी ध्यानस्त आहे.
*त्रिशुल, डमरु हाती, जटाभार शोभे माथी*
*ऊँ 'काराचा घोष तुझ्या अंतरी,आरती तुज अंबे*
देवीच्या कंठी वजर्टीक आहे. तर रुद्राक्षांची माळ गळ्यात आहे. तपस्वानी पार्वतीची आठवण देणारे रुप आईचे ... !
*वजर्टीक भाळली कंठी , रुद्रमाळ रुळे वक्षी*
*जगनमाऊली तेजस्वी तपस्वीनी,आरती तुज अंबे*
देवी सर्वांचे मंगल करणारी, कल्याणकारी आहे.ती मयूरवाहिनी होऊन औंधासूरावर चालून आली. व आपल्या बळाने त्याला ठार मारिले !
*मांगल्यमूर्ती शिवे, मयूरवाहिनी अंबे*
*औंधासूराला मारिले तू बळें,आरती तुज अंबे*
देवीचे भक्त सगुण रूपात देवीभक्ती करतात. तर साधक निर्गुण रुपाची आराधना !
मात्र ही सर्व विविध रुपे - जगदंबेची प्रतिबिंबे आहेत. आणि अनेक भक्तां प्रमाणे कवीच्याही ह्रदयीं देवी कायम आहे.
*सगुण - निर्गुण रुपे , शक्तीची प्रतिबिंबे*
*कृष्णनंदनास्तव ह्रदयी विराजींते,आरती तुज अंबे*॥
जय जगदंब
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment