यमाई औंध, प्रार्थना

[01/10 00:22] gurav rajendra: 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
                        राजेंद्र गुरव,यमाई औंध

☘ *जय जगदंबे अंबाबाई*."☘

*जय जगदंबे अंबाबाई, तूच आम्हां माऊली ॥*
शिवानंदे सतत राहू दे, आम्हांवरी साऊली ॥ ध्रु ॥
 *अमृतयोगे तुझ्या रुपाची प्रगटती प्रतिबिंबे I*
*आशीषांची सुवर्णपुष्पे सुगंधिती जीवने ॥*
*तुझ्या कृपेची गंगा वाहे,सदा याच राउळी*
 शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥ 1॥

 *मातृत्वाची लेणी भरली, तुझीया हृदय कमली I*
*दातृत्वाचे देणे देते - सुखाची अंजली ॥*
*तुझ्या दर्शनी भेटतो माते - स्वर्ग याच मंदिरी*
शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥२॥

*पराक्रमाची विराट रुपे वधती दानवाते I*
*तपस्वीनीची सौम्यरुपे दिसती नामस्मरते ॥*
*तुझा महिमा किती गाऊ, थिटी येथं जीवनी*
शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥ ३॥
                  *25/12/2016 नाताळ              कृष्णनंदन*

 भावार्थ -
आदिशक्तीची अनेकपीठे भारतवर्षात आहे.जगदंबेचा महिमा जनमाणसांचे ह्रदयात चिरंतन वास करीत आहे.
भवानी, अंबा, पार्वती, काली ,दूर्गा   ..या विविध रुपात जगदंबा अवतरली असे आपण मानतो.
               ती जगदंबा अंबाबाई आपल्या सर्वांची आई आहे. तीच्या कृपेची सावली आपल्या सर्वांवर रहावी , हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना आहे.तीची सावली - आनंद देणारी ,ब्रम्हानंद देणारी,... शिवानंद देणारी आहे. म्हणून कवी जगदंबा चरणी आळवणी करतो...
*जय जगदंबे अंबाबाई, तूच आम्हां माऊली*॥
*शिवानंदे सतत राहू दे, आम्हांवरी साऊली* ॥ ध्रु ॥

एखाद्या ठिकाणी जगदंबेचे वास्तव्य असणे हा साधा योग नाही. अत्यंत पवित्र योगावरच जगदंबा एखादे ठायी अवतीर्ण होते. कवी त्या क्वचित घडून येणाऱ्या योगाला अमृतयोग असे म्हणतो.
जगदंबेच्या सहवासाने भक्तांचे जीवन सुगंधीत होते. .. कारण त्यात जगदंबेचा कल्याणकारी आशीष मिसळला आहे. जगदंबेने दिलेली आशिर्वादाची फुले ही साधी नाहीत... ती साक्षात सुवर्णपुष्पे आहेत.... कायम टिकणारी.. सतत मागे राहणारी !

*मातृत्वाची लेणी भरली, तुझीया हृदय कमली I*
*दातृत्वाचे देणे देते - सुखाची अंजली ॥*
*तुझ्या दर्शनी भेटतो माते - स्वर्ग याच मंदिरी*
शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥२॥
भक्तांवर जगदंबा आईच्या हृदयाने प्रेम करते. त्याला जवळ घेते.. आंजारते , गोंजरते .. कारण तीचं ह्रदय मातृरूपी आहे. जगदंबेचे अढळ मातृत्व दाखविण्यासाठी कविने *'मातृत्वाची लेणी*' या शब्दाचा प्रयोग केला आहे.तर ह्रदयाला कोमल कमळांची उपमा दिलेली आहे.
मग अशा आईचे दर्शन भक्तांना स्वर्गाची अनुभूती देणारचं !

*पराक्रमाची विराट रुपे वधती दानवाते I*
*तपस्वीनीची सौम्यरुपे दिसती नामस्मरते ॥*
*तुझा महिमा किती गाऊ, थिटी येथं जीवनी*
शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥ ३॥

शेवटचे कडवे हा काव्याचा कळसोध्याय असावा.
कवी म्हणतो _ . ' *माते तु भक्तांना विविध रुपात दिसते ! .. काहींना वरदायिनी, सुखदायिनी.... तर काहींना साक्षात - दूर्गा, चंडिका काली !
कविच्या या प्रश्नांला जणू जगदंबाच उत्तर देत आहे. _   ' *मी जे अमंगल आहे, पाशवी आहे... त्यासाठी भयंकारी आहे.... *महाकाली आहे.*
                  *पण तू संचित होऊ नकोस निर्वाज्य भक्तांसाठी मात्र मी सौम्य रुप घेते... तू निर्भय रहा*!

देवीचे उत्तर ऐकून कवी देवीपुढे नम्र होतो.    देवीच्या भव्य - दिव्यतेपुढे नतमस्तक होतो.
तो म्हणतो _ देवी तुझे गुणगान कसे गाऊ .. माझी जीभ,.. एकूणच जीवन तुझा महिमा गाण्यासाठी अपुरं आहे, थिटं आहे. ... मी फक्त विनवतो माते तुझा आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा. ..
*शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥*
कवी जगदंबेचा नम्रसेवक आहे.. श्रीयमाई कृपेनेच तो तिचा गुरव - पुजारी असावा !

☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, घटस्थापना _ १ /१० /२०१६ guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[01/10 00:31] gurav rajendra: कृपया, रचना तारीख - 25/12/1998 अशी वाचावी

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510