यमाई - भूपाळी
नवरात्र दिवस २ रा
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
*॥श्री यमाई देवीची भूपाळीll*
. .
*उठ भवानी,उठ यमाई औंधासूरमर्दिनी*
*प्रभातसमयीं येभगवती गातो तुला आरती ॥ ध्रु॥*
*तृणपर्णे गुंफीती भक्ती , मौक्तीकांच्या माला*
*भावपुष्पें फुलूनी आली तरूवर वृक्षाला I*
*"सुहास्य कमलें मोदाने _ द्रव्य सुंगंधी अर्पी*
*उठ भवानी, उठ यमाई - औंधासूरमर्दिनी*॥१॥
*क्षितीजांती येवून रविराज ठोठावी दाराला*
*रंग उधळतीं गगन सारे _ तेजोपूर्वेला*
*कुंकूम तिलक घेऊनी आली, उषा ही सावळी*
*उठ भवानी, उठ यमाई - औंधासूरमर्दिनी*॥२ ॥
सुगंधी वारा ,घेवूनी ताना -वाहतो अवतीभोवती
आनंदीत खग गण मोदाने-. तुज प्रेमे भजती
स्मरण करी जगदंबेचे _चराचर मनी
उठ भवानी, उठ यमाई - औंधासूर मर्दीनी ॥ 3॥
*तेजोप्रभे घाली रविकर _ पृथ्वीला माला*
*गुंजारती भ्रमर अवचित - पुष्प गालाला*
*तेजाचे सडे पडले पहा -.दश दिशांतूनी*
*उठ भवानी, उठ यमाई - औंधासूर मर्दीनी* ॥ ४॥
*धुक्याचीं चादर गुंडाळी - जागी हो धरा*
*त्यासम आपण देवी आता _ डोळे हे उघडा*
*दिव्य दृष्टीने उजळा जीवन - अंतर बाहयात्करी*
*उठ भवानी, उठ यमाई - औंधासूरमर्दिनी*॥ ५॥*
यमाई देवी औंधचे पुजारी राजेंद्र गुरव
भावार्थ - श्रीयमाई (भवानी ) असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान ! देवीच्या दर्शणाला भक्तांची दाटी ... पहाटे समयी देवी साठी असणारा हा भक्तीभाव साऱ्या आसमंती दाटला आहे.
देवीच्या दर्शनासाठी आतुरलला भाव देवीचे लवकर दर्शन मिळावे म्हणून उत्कटतेने विनवीत आहे -

देवीचे दर्शणास आतुर सर्वजण ,देवी स्वागताचे तयारीत मग्न आहेत. तृण पर्णावर पडलेले पाणी, दवबिंदू जणू भाव -भक्तीचे मौक्तिक असून त्याची भावमाला गुफायचे काम सुरु आहे...
झाडा -झाडावर ही भक्तीपूर्ण फुले आलेली आहेत. .हर्षानंदाने ही फुले वातावरणात सुगंध ओतत आहेत.

इकडे सूर्यदेवक्षितीजाचा दरवाजा वाजवित आहेत. तेजोवलीत अशी पूर्व दिशा, आणि दिशेला असणारे गगन ही रंगाची उधळण करीत आहेत.
उषेचा लालसर रंग आसमंती , जणू देवीचे भालस्थळी कुंकूमार्चन करण्यासाठी आतुरलेली आहे.

वाऱ्याची भिरभऱ आणि त्याची आवर्तने म्हणजे गायकाची तान आहे. देवीला रिजवण्यासाठी तो तत्पर आहे. सर्वांचे अवती -भोवती तो उगाच घुटमळतो आहे.आनंदीत होऊनी पक्षी गाणे म्हणत आहेत. येथे आनंद व मोद हे शब्द एकत्र येऊन आनंद द्विगुणीत करीत आहेत. वातावरण एवढं उल्लासित की , सगळं चराचर जणू मनात देवीचे मनन चिंतन करीत आहे.
*सुगंधी वारा ,घेवूनी ताना -वाहतो अवतीभोवती*
*आनंदीत खग गण मोदाने-. तुज प्रेमे भजती*
*स्मरण करी जगदंबेचे* _*चराचर मनी*
*उठ भवानी, उठ यमाई - औंधासूर मर्दीनी*॥ ॥
आता . 'रवी ' दृष्टीपथास येवू पहात आहे. पृथ्वीवर पोहचणारे त्याचे किरण जणू पृथ्वीला तेजाच्या माळा घाळून सजवित आहे.
आणि मधेच भ्रमण येऊन लाडीकवाणे फुलांचे गालाला स्पर्शत आहेत.
रवीकरांनी पृथ्वीवर तेजाचा सडा टाकलेला आहे आणि त्याची प्रभा दशदिशां तेजोमय करीत आहे.
*तेजोप्रभे घाली रविकर*_ *पृथ्वीला माला*
*गुंजारती भ्रमर अवचित - पुष्प गालाला*
*तेजाचे सडे पडले पहा -.दश दिशांतूनी*
उठ भवानी, उठ यमाई - औंधासूर मर्दीनी ॥ ॥
तेजाच्या सडयामुळे तिमीराचा शेवट झाला आहे.तर धुक्यांचे अंथरूण - पांघरून गुंडाळून ठेवून वसुंधरा ही तयार होत आहे.

हे सर्व देवीमातेस विनवीत आहेत की आपण ही आता उठावं !
आपल्या दर्शनाने आम्हांस कृतकृत करावे.
बाह्य जीवनाला तर आशिर्वाद दयाच ,पण आमचा आंतरआत्मा ही ज्ञान प्रकाशाने प्रञ्वलीत करा .ही माते आपले चरणी प्रार्थना आहे.
*उठ भवानी, उठ यमाई - औंधासूरमर्दिनी*॥
🕉🔸🔸🔸🔸🔸🔸🔸💥🔸🔸🔸🔸(जगदंबार्पणमस्तु) _ राजेंद्र गुरव , यमाई औंध ९५६११५४१४० , guravrajendra546@gmail.com🙏🏻🕉🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

Comments
Post a Comment