मरण सोहळा The death anniversary

👁🌴👁
*मरणाचा सोहळा व्हावा !*
यमाई औंध, राजेंद्र गुरव

 रौलेट कायदयाविरुद्धची धामधूम चालूच होती. म गांधीचे देशभर दौरे चालू होते. मध्येच विश्रांतीसाठी ते आश्रमात थांबलेले...

विश्रांतीचे काळात गांधीजींचा वाढदिवस होता.
आश्रमातील लोकांनी लहानसा आनंद सोहळा साजरा करण्याचे योजले. आश्रम सजवला गेला. सर्वत्र फुलांच्या माळा,तोरणे लावण्यात आली. समारंभाची वेळ झाली. सर्वजण महात्माजींना सन्मानाने कार्यक्रमस्थळी घेऊन आले. उत्साहाचे वातावरण सर्वत्र.

कार्यक्रमात महात्माजी बोलू लागले -
"  आज मी पन्नाशी ओलांडली.आपण आनंद साजरा केलात. आपण आनंदात माळा, हार इ आणलेत. या हार - माळा यांची मला गोडी नाही. पण आपण सर्वांनी जे केले त्यामागची भावना मी जाणू शकतो. झाले ते बरेच झाले
पण मला एक सांगायचे आहे *आपण माझा वाढदिवस जेवढया आनंदाने साजरा केलात, तेवढा माझा मृत्यूदिनही साजरा करा.*
 माझ्या आयुष्यासाठी आज ज्याप्रमाणे प्रभूचे आभार मानीत आहात, त्याप्रमाणे त्या प्रभूने मला नेलं तर त्यावेळीही त्याचे आभार माना. जीवन आणि मरण या दोन्ही परमेश्वराच्या मंगल देणग्या. . त्यामुळे मरणांवेळी उगाच रडत बसू नका !
       
*मरणाचे भय नसलेला आणि मरणाचाही सोहळा व्हावा असा वाटणारा तो महात्मा होता.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510