कस्तुरबा

*कस्तुरबा*
🌿☘🍀🌸🍁🌞

गांधीजींनी स्त्रीयांना सत्याग्रहाचा सल्ला दिला.पण घरी पत्नीला असे सूचवले होते का ?
... ' तुम्ही मला सत्याग्रहात सामील व्हायला का सांगत नाही ? मी का अपात्र आहे त्यास ? _ असे म्हणत कस्तुरबा सत्याग्रहात सामील झाल्या.
 सत्याग्रह, स्वातंत्र्यलढा , गांधींचे जीवनातील विविध प्रयोगांना कस्तुरबांनी अनमोल साथ दिली.

  विश्ववंदय,अखंड विश्वाला सत्य , प्रेम, अहिंसा आणि शांतीचा संदेश, आपल्या विचार, उच्चार आणि आचारातून ज्यांनी दिणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी. आणि अशा या महामानवाची सावली, मैत्रीण, सहचारिणी, सत्यव्रती आणि खऱ्या अर्थाने अर्धांगिनी बनून जीवन जगणाऱ्या कस्तुरबा,

या त्यांच्या महान पत्नी होय . त्यांना 'बा' असेही संबोधले जायचे.
  कस्तुरबा यांचा जन्म ११ एप्रिल १८६९ चा. पोरबंदर येथील काटियावाड हे त्यांचे गाव. त्या निरक्षर होत्या. तत्कालीन पद्धतीनुसार लहानपणीच वयाच्या ६ व्या वर्षी त्यांचा मोहनदास यांच्याशी साखरपुडा झाला आणि १३ व्या वर्षी लग्न झाले.

   स्त्रीला जीवनदायिनी व विश्वातील एक महान ऊर्जा मानणाऱ्या महात्मा गांधीजींनी सुरुवातीला म्हणजे वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला कस्तुरबांना  आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला. पुरुषी अहंकार लादण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या लक्षात आले की, जन्मजात समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवत असताना स्त्रीला उपेक्षित ठेवून चालणार नाही. स्त्रीला निसर्गाने दिलेल्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे, तिचे प्रत्येक बाबतीत दमन करुन फक्त तिला भोग्य वस्तू मानणे महापाप आहे. इथेच विषमतेची मूळे रुजली जातात व फोफावतात म्हणून त्यांनी कस्तुरबांना शिक्षित केले. ' स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन' या विधानानुसार आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा आदर करून सामावून घेतले . त्यांचे सहकार्य मिळवले. विशेष म्हणजे , कस्तुरबांनी बापूंच्या देशसेवेच्या कार्यात सर्वस्वी झोकून दिले आणि देशातील लाखो स्त्रियांना स्वातंत्र्यांच्या चळवळीत सहभागी करून घेतले.
गांधीजींनी आफ्रिकेत चालवलेल्या स्त्रीयांच्या चळवळीत कस्तुरबा सामील झाल्या. अत्यंत कष्टाने त्यांनी गांधीच्या सत्याग्रहाला आणखी मोठे केले.

 साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या 'बा ' यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाबरोबरच सामाजिक चळवळीत विशेष योगदान दिले. त्यात जातिभेद निर्मूलन, शिक्षण प्रसार, स्वच्छता इ. क्षेत्रांतील कार्याचा प्रामुख्याने समावेश होता.

 त्यांनी स्त्रियांना चरखा ग्रामोद्योग तसेच कुटिरोद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबन, स्वदेशीचे धडे दिले. स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
दक्षिण आफ्रिकेत बापूंसोबत असताना तेथील खिश्चन वगळता इतर धर्मीयांच्या लग्नाला मान्यता देण्यासाठी जो संघर्ष झाला, त्यामध्ये त्यांना तीन महिने तुरुंगातही जावे लागले होते. द. आक्रिकेतून परतल्यानंतर त्यांनी गांधीजींच्या प्रत्येक लढयात उस्फूर्तपणे अनुभवी कार्यकर्त्यासारखा सहभाग घेतला.
१९२२ मध्ये जेव्हा गांधीजींना ब्रिटिश सरकारने अटक केली, तेव्हा त्या विरोधात कस्तुरबा यांनी विदेशी कपडयांवर बहिष्काराचे आवाहन केले. बापूंचा संदेश सांगत त्या तरुणांप्रमाणे गुजरातच्या गावागावांतून फिरत. जेव्हा जेव्हा गांधीजींना तुरूंगात जावे लागायचे
 तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी कस्तुरबा या गांधीजींची कमी भरुन काढायच्या.

एकूणच कस्तुरबा म्हणजे गांधीच्या सत्य, सत्याग्रह व स्वातंत्र्य - संग्रामचळवळीच्या सहगांधीच होत्या.
त्यांचा एकसंघ व सातत्याचा पाठिंबा गांधींना होता, ही बाब इतिहासाच्या पथ्यावर पडली आहे. ( आधारीत )

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸(भाग ८२)
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510