शिक्षकाच्या भूमिकेत गांधी

*शिक्षकाच्या भूमिकेत गांधी*
🍀☘🌿🌸🍁
टॉलस्टॉय आश्रमात शिक्षणाची व्यवस्था करण्याचे गांधींनी ठरविले. निराळा शिक्षक देणे अशक्य होते. कारण योग्य हिंदी शिक्षक दूर्मिळ होते.डरबन पासून फार्म २१ मैल दूर होता, मग मोठा पगार दिल्याशिवाय कोण शिक्षक येणार ? फार्मकडे ऐवढा पैसा ही नव्हता.
... आणि गांधीना अपेक्षीत शिक्षण चालू पद्धतीपेक्षा वेगळे होते. सगळ्या फार्मची जबाबदारी गांधीवर होती , त्यामुळे शिक्षणाची जबाबदारी आपणच उचलावी असे गांधींनी ठरविले.

शारीरिक शिक्षण आणि उद्दोगी शिक्षणांवर भर होता. द आफ्रिकेमध्ये हिंदी मुलांना जे शिक्षण मिळे, ते फक्त अक्षरज्ञान असे. टॉलस्टॉय फार्म मध्ये मात्र उद्योगासह शिक्षणावर भर होता.व शिक्षकही स्वतः काम करणार यावर भर होता.

हस्तकौशल्यावर भर दिल्याने विद्यार्थी आनंदाने शिक्षणात सहभागी होत. पण अक्षरज्ञान देणे गांधींना कठीण जाई. साधनांची कमतरता होतीच वर इतर व्यापातून शिक्षणास पुरेसा वेळ नाही.

 दिवसभर शारीरिक काम करून गांधी थकून जात. कसे बसे स्वतः ताजेतवाने ठेवून शिक्षण दिले जात असे.
पुढे वेळापत्रकावर जादा लक्ष दिले गेले. सकाळचा वेळ शेती व गृहोद्दोग यामध्ये जात असे. त्यामुळे दुपारी जेवणानंतर लगेच शाळा सुरु होई. नंतर दुसरी वेळ सोईस्कर नव्हती.

पुस्तकी शिक्षणासाठी ३ तास ठेवलेले. वर्गात हिंदी, तामीळ, गुजराथी व उर्दू इ शिक्षण दयायचे.प्रत्येकाला मातृभाषेतूनच शिक्षण दयायचा निर्धार होता. इंग्रजी सर्वांना शिकवले जाई.  हिंदू मुलांना संस्कृत व सर्वानांच हिंदीचे थोडेथोडे ज्ञान दयायचे. वर इतिहास, भूगोल, अंकगणित सर्वांनाच शिकवायचे असा क्रम होता.
गांधी स्वतः तामीळ व उर्दू शिकविण्याचे काम करायचे
( गांधी - आत्मकथेतून )

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510