*सत्याग्रह ४*
🍁🍀🌸☘🌿
गांधींनी सत्याग्रह हे सर्वसामान्यांसाठी शस्त्र दिले. प्रतिकाराचे शास्त्र दिले.
जागतिक इतिहासात सत्याग्रहाचे ते प्रयोग अमर झाले आहेत.

गांधी म्हणतात गोरे लोक सत्याग्रहाचा ' पॅसिव्ह रेझिस्टन्स ' असा सत्याग्रहाचा अर्थ घेत. सदाग्रहला ते निर्बलांचे हत्यार समजत .
मगनलाल यांनी सत+आग्रह अर्थात सदाग्रह हा शब्द सूचविला. 
काही बदल करून गांधींनी तो सत्याग्रह असा स्वीकारला.

हे झाले तात्विक. आपण मागील प्रकरणात पाहिले जीवनात त्याचा प्रत्यक्ष प्रयोग. !

... गांधींजींसह कामगार, स्त्रीया इ.चां सत्याग्रह. त्यांचेवर अनेक अत्याचार झाले. उपासमार,गोळीबारात काही लोक कामी आले. ना गोखले यांनी चिडून याविरुद्ध मोहीम उघडली. हिंदुस्थानचे व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिज ह्यांनी द आफ्रिका सरकारवर टिका केली.

*सरकारने चौकशी मंडळ नेमले, चौकशी झाली. ३ पौंडाची डोईपट्टी रद्द झाली.सारी लग्ने कायदेशीर ठरली गेली. वसाहतीत जे रहात आहेत त्यांना रहाण्याचा परवाना असला म्हणजे कोठेही जाण्याचा परवाना आहे. इ इ ठरले. सत्याग्रहाने अपूर्व विजय मिळविला. इतिहासाचे ते एक गौरवशाली पान ठरले.*

गांधीजींचा हा लढा अनेकांकडून गौरविला गेला. हया लढ्याचा इतिहास म्हणजेच द आफ्रिकेतील गांधीच्या  आयुष्यक्रमाचा इतिहास होय.
हा इतिहास गांधींनी पुढे भारतीय स्वातंत्र्यलढयात त्यांना येरवडा येथे तुरूंगवास झाला. त्यावेळी तो लिहून काढला.
सत्याच्या प्रयोगाचा, अभिनव प्रयोगाचा तो इतिहास होऊन राहिला आहे.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510