संयम आणि ब्रम्हचर्य

*संयम आणि ब्रम्हचर्य*

गांधींचा समाजकार्याचा व्याप वाढू लागला , गृहस्थाश्रमातील व्यक्तीला समाजसेवा करायची म्हणजे तारेवरची कसरतच !

समाजकारण - राजकारणांसाठी कोण घरादारांवर तुळशीपत्र ठेवणार ?

संसाराचा व्याप कमी करावा लागेल - गांधींनी ठरवले. कुटूंबासाठी जादा शक्ती वाया गेली तर, मानवतेची सेवा कशी होणार ?... आपलं सगळं लक्ष सेवेवर हवे.
कुटूंबातील अडचणी, पोराबाळांची स्वप्नं यासाठी गृहस्थाची क्रयशक्ति जाणारचं ! बायको प्रसूत होण्याची वेळ आली की मग समाजकारणाकडे लक्ष लागेल ? .... कुटूंब की मानवसेवा ?
गांधीचा रात्रंदिवस या विचारात असत. ज्याचे डोळ्यापुढे सतत मानवतेचा ध्यास त्याला कसली निवांतपणाची आस ?

.. *आपण आता ब्रम्हचर्य स्वीकारले पाहिजे असे त्यांना वाटू लागले*
त्यांनी मित्रांजवळ चर्चा घेतली आणि ब्रम्हचर्य स्वीकारण्याचे निश्चित केले.

चंगळवाद आणि भोगवादाकडे झुकलेल्या एका पिढीला गांधीचा हा निर्णय या काळात कसा वाटेल ?..
.. *जे व्रत्य म्या घेतले, जे- जे म्हणूनी सोसेन पण वचनभंग होणार नाही या कुळीचे गांधीचे होते.*

आजारी पडल्यावर किंवा उपवास असताना एखादे पदार्थाचा मोह सोडवित नसणाऱ्या प्रवृत्ती . कधी एकदा उपवास संपतोयं असं होऊन जाते.
सहजपणे सामान्यजण मोहास बळी पडतात. मोडलेल्या व्रताबाबत मोडके तोडके समर्थन करतात.

समर्थ मन आणि कणखर बाणाच भीष्म प्रतिज्ञा पूरी करतो... ऐऱ्या गबाळ्याचे कामचं नव्हे !

गांधीजींनी पत्नीबरोबर चर्चा करून आपले व्रताविषयी पत्नीस सांगीतले. आणि अजोड विचारांच्या त्या माऊलीनेही त्यांना सहमती दिली !

१९०६ मध्ये गांधीजींनी ब्रम्हचर्याचे व्रत घेतले... गांधीचे वय होते त्यावेळी ३७ वर्षाचे !

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 (६४ )
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510