म गांधी पुन्हा २, Gandhi again and again 2
*म. गांधी... पुन्हा,पुन्हा !*
यमाई औंध, राजेंद्र गुरव
गेली महिनाभर आपण म गांधीचे कर्तृत्व स्मरतोयं ! गांधीचे कर्तृत्व आभाळभर... अनं त्यालाही अनेक पदर.. कितीतरी आयाम !
गांधीनी आपल्या कार्यशैलीने काँग्रेस देशव्यापी केली. त्यातून सर्वसामान्यांची नेतृत्व पुढं आली.... आणि मग पिढयान पिढया प्रस्थापित सनातन्यांचा जळफळाट झाला !
काँग्रेस व म गांधीना संपविण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले .
स्वातंत्र्य चळवळीत अजीबात सहभाग नसलेल्या संघटनेनी म गांधीची यथेच्छ टवाळी करून घेतली आहे. गोबेल्स नितीचा बेमालूम वापर करून गांधीच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम राबवू पाहीला. आहे.
राजकारण ,समाजकारण,क्रियाशील आध्यात्म , शैक्षणिक तत्वज्ञान, पत्रकारीता, महिला व खेडयांचे सबलीकरण, सक्षम मनाची घडण, .. .. विविध क्षेत्रातील विविधांगी योगदानाने गांधीची एक अमिट निशाणी भारतवर्षावर आहे.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी लोक, अभ्यासू - चिकित्सक लोक गांधीना मानतात पण वर्षानुवर्ष पिचलेल्या समाजास धर्माच्या वेसणी लाऊन जे आपला कार्यभाग साधून घेत होते, त्यांनी पाहिले - सगळे पिडीत,गरीब, कष्टकरी, महिला,खेडूत गांधीजीच्या मागे उभे.
मग......
घाणेरड्या राजकारणांनी 'सबकुछ ' वापरून आपण तेवढे शहाणे.. अनं गांधी असे -असे..
धादांत खोटयाचा परिणाम संवेदनशील तरुणाईवर होत असेल - होत राहील !... गांधींचे कर्तृत्व वस्तुनिष्ठपणे मांडावे हाच उद्देश या गांधीमालेमागे आहे.
काहीजण म्हटले आपले 'वाचावे आनंदे ' .. कविता, रंग प्रभातीचे, सूर्याचे फोटो हे बरे होते.. लाईक मिळत होते, वाहवा मिळत होती, प्रसिद्धीही... कशाला हा जुना विषय !
... आज आपण स्वातंत्र्यात मोकळा श्वास घेऊ शकतो... त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यातील एक अद्वितीय योगदान होते म गांधीचे !
त्याचे कार्य कसे विसरता येईल ?
समाज, घर यांचे उन्नतीसाठी जीवन वाहणाऱ्यांना काहीजण विसरतात.. त्यांना थुका लावतात, कष्टणाऱ्याचेच कंबरडे मोडण्यासाठी कंबर कसतात...
म गांधी हा वैश्वीक आदर्श आहे.. त्यांची मूळं या भारतीय संस्कृतीवर पोसली आहेत आणि त्यामुळे एक नवा भारतही उभा राहीला आहे.
गांधी विचार पोसणे, अधिक दृढ करणे, जगभर प्रसारीत करणे हे आपले कामच आहे असे मला वाटत राहते आणि ही काळाचीही गरज आहे.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Comments
Post a Comment