गांधी - टॉलस्टॉय फार्म - १

..*टॉलस्टॉय फार्म*
🌿🍁🌸🍀☘

'ठं '- दलित कुदळीचा घाव घालतोय,
तर मराठा नकळत ती माती पाठीत भरून बाहेर फेकतोय,
.
कुठं हिंदू श्रमदान करतोय तर थकला म्हणून त्याला कुठं मुस्लीम नकळत प्यायला ग्लासभर पाणी आणून देतोय,

कुठं चांभार श्रमदानाठिकाणी
सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करतोय
तर त्याला हातभार म्हणून लोहार नकळत स्वतःचे पैसे देतोय.

.
कुठं तृतीयपंथी सगळ्यांना वाटून चहा देतोय,
तर कुठं अपंग कुदळ खोरे शेलवटायचं काम करतोय,
.
कुठं रंगाने काळा असणारा माती परिक्षणाची माती गोळा करतोय तर कुठं गोरा त्याच्या पोतेची नोंद ठेवतोय,
.
कुठं ब्राम्हण रोपवाटीका तयार करतोय
तर कुठं, वारीक त्याला रोज पाणी घालतोय,

*कालच पाणी फौंडेशनच्या अनुशंघाने वरील प्रकारच्या एकसंघ विचाराच्या गोष्टी घडत आहेत अशा आशयाची सचिन अतकरेंची पोस्ट आली होती*
आणि एकदम आठवण झाली गांधीच्या टॉलस्टॉय फॉर्म...
वरील गोष्टी जशाच्या तश्या ठिकाण मात्र दूर आफ्रिकेत..
कुठं गुजराती खोऱ्याने माती ओढतोय
तर महाराष्ट्रीयन  स्वतः ती पाटीत भरून कडेला टाकतोय...
कुठं आंध्री दळण दळतोयं, कुणी रानातनं फळं गोळा करतोय, कोणी रानातं खपतोयं !

 या देशाच्या बाहेर अखिल भारतीय संमेलन भरले होते. आणिनिर्माते होते राष्ट्रपिता महात्मा गांधी.
 सामाजिक ऐकी म्हणत्यात ती यापेक्षा काय वेगळी असते.
 हो..??

म गांधीच्या सत्याग्रहातून अनेक लोक तुरुंगात जात. मागे उरत मुलं -बाळं आणि बायका ! त्यांना गोळा केलेल्या फंडातून पैसे दिल जात.

पण पैसे किती दिवस पुरणार ?. .. .सर्वांची पोटं कशी भरणार ?
या सर्वांवर उपाय म्हणून गांधींजी स्वावलंबनाकडे वळले.

गांधीजींचे एक कंठश्च मित्र होते कालेनबाख. ते जर्मन होते.त्यांची ११०० एकर जमिन एके ठिकाणी होती. गांधींना ती जमिन उपयोगासाठी मिळाली.
जमिनीवर भरपूर हिरवी रानं, फुलझाडे, फळझाडे होती होती. शेजारून एक पाण्याचा ओहोळ गेलेला !
येथे झोपडया बांधण्यात आल्या आणि उपरोक्त सर्व मंडळी एकत्र आली ..

*तेथे सर्वजण एकत्र खपत ! चार घास पिकवत ! प्रेमाने खात. सुखाने नांदत.*
*हे एकत्र येणे उद्योग प्रधान होते.आणि सर्वत्र प्रेम पसरवित होतं !*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,(भाग ७६ )🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510