महिला सत्याग्रह - भाग २

*सत्याग्रह - २*

सत्याग्रहाचा परिणाम म्हणून अनेक स्त्रीयां सत्याग्रही, कामगार, मजूर यांचेसह अनेक जन यात सामील झाले. सत्याग्रहाचे काम जोमाने सुरु होते.
 तुरूंगात अनंत हाल अपेष्टा, सरकारी अत्याचारांना तोंड देणे सत्याग्रहींचे काम ! जेवण व्यवस्थित नाही. कित्येक असुविधा.. किती वेळा तर नुसते उपवास.

...आणि  इकडे हजारो कामगारांचे काय करायचे?सरकारच्या भितीने  मालक त्यांना चाळीतून राहू देईनात. आपले थोडेसे सामान घेऊन ते बाहेर पडले. काहींना हाकलून दिले गेले. कित्येक रस्त्यावर - स्त्रिया , पुरुष, मुले !
ती स्वातंत्र्याची महान यात्रा होती.
*गांधीजी त्यांना घेऊन टॉलस्टॉय फार्मवर येणार होते*. तेथे खपू , राहू. इतर सोयी आहेतचं
पण *नाताळमधून ट्रान्सवॉलमध्ये यायचे*, हे सोपे काम नाही.
येथे परकीय सरकारचा वरवंटा. नाताळमधून ट्रान्सवॉलला जाणे हा. कायदेभंग होता ,
लाठीमार, गोळीबार दडपशाही ,अनंत शक्यता !...? काय होणार ? परंतु गांधीजी ती शांतिसेना घेऊन निघाले .
वाटेत परत दिव्य. बरोबर संसार नाही. खाणं नाही की पिणं! सर्वसामान्यांची मदत होण्याची शक्यता कमी. प्रवासात ब्रेड व साखर हा आहार असे. वाटोवाट मुक्काम होत . तेथे ब्रेड वाटला जाई.

भरीसभर  गांधीजींना दोनतीनदा वाटेत अटक झाली. परंतु जामिनावर पुन्हा : पुन्हा सोडण्यात येई.
परंतु  शेवटी गांधीजींना नऊ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. दुसऱ्याही एका कोर्टात आणखी तीन महिन्यांची साधी सजा झाली. पुढे अनेक कामगारही गिरफ्तार केले गेले. परंतु ज्या खाणीत ते काम करीत तेथेच त्यांच्या सभोवती कुंपण घालून तुरुंग करण्यात  आला ; आणि  त्याच खाणीत त्यांना सक्तमजुरीचे काम देण्यात आले !
म्हणजे सरकारी कामही होई आणि शिक्षाही !सरकारची दडपशाही,अत्यंत नीच अशी  गोष्ट होती ती !

गांधीजी आदर्श कैदी होते. त्यांना सक्तमजुरीची सजा होती. खडी फोडण्याचे काम त्यांना देण्यात आले. गांधीजी खडी फोडीत. हातांतून रक्त येई. परंतु ते काम थांबवीत नसत. तुरूंगात त्यांनी भंगीकामही केले. अशी तपस्या हा महापुरुष करीत होता.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510