स्त्री शक्ती जागृती

*स्त्री शक्ती जागृती*
🍀☘🌿🍁🌸

आफ्रिकेतील गांधीच्या सत्याग्रहाच्या अनुसंधाने ना गोखले आफ्रिकेत शिष्टाईसाठी आले. गांधीजी गोखल्यांना गुरु मानीत.
गोखल्यांनी तेथील सरकारी अधिकारी, प्रमुखांच्या भेटी घेतले. गोखले विश्वास ठेवणारे. ते गांधीजींना म्हणाले, " काळा कायदा पुढील वर्षी रद्द होईंल, ३ पौंड डोईपट्टीचा नवीन कर आहे तोही रद्द होईल. सत्याग्रह थांबवा "

या शिष्टाईमुळे सत्याग्रह थांबला.
पण थोडया काळात सरकार पुनः उलटले. जुने नियम राहिले वर नवीन कायदा आला.
सर्वांना चीड आणणारा,अपमानास्पद कायदा !
" जी लग्ने ख्रिश्चनधर्मविधीप्रमाणे झालेली नसतील किंवा जी लग्ने नोंदणी पद्धतीने झाली नसतील , ती सारी बेकायदा ठरविण्यात येतील. "
असा हा आसुरी कायदा होता. हिंदू, मुसलमान, पारशी, सर्वांची लग्ने बेकायदेशीर ठरली. धर्मपत्नीचे स्थान कोठे राहिले ? सतीत्वाचा हा अपमान होता, पातिव्रत्याची विटंबना होती. स्त्रिया संतापल्या. आतापर्यंत स्त्रियांना सत्याग्रही म्हणून घेण्यात येत नसे. परंतु स्त्रियांवरचा अन्याय दूर करायला स्त्रियांनी पुढे यावे असे गांधीजींना वाटले. स्त्रियांची शक्ती जागी झाली.
त्या दिवशी टॉलस्टॉय फार्मवर स्त्रियांची बैठक होती. गांधीजी सारे सांगत होते,  " तुम्हांला तुरुंगात पाठवतील. सक्तीची शिक्षा होईल. कपडे जेलचे मिळतील. धोबीकाम वगैरे करावे लागले. अपमान होतील. सारे कराल सहन? तुमची लहान मुले, त्यांचे हाल होतील." परंतु स्त्रिया म्हणाल्या, "आम्ही सर्व संकटांना तोंड द्यायला तयार आहोत."

****
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510