Posts

Showing posts from April, 2019

नव्या प्रवासाची सुरुवात

नव्या प्रवासाची सुरुवात☘🌸🌿🍁🍀 आफ्रिकेतील सत्याग्रह संपला.गांधी गोखल्यांच्या सूचनेनुसार,इच्छेनुसार स्वदेशी जाताना गांधी प्रथमतः इंग्लंडला जायला निघाले. महायुद्धाचे वातावरण होते. इंग्लडच्या खाडीपर्यंत पोहोचेपर्यंत युद्धाला तोंड फुटले... इकडे गोखले पॅरिसमध्ये अडकले. या वेळेत गांधीजींनी स्नेही सोराबजी यांचेमार्फत डॉ जीवराज मेहता ,इतर हिंदी लोकांची एक सभा बोलावली. गांधीजींनी सभेस संबोधीत केले. *युद्ध परिस्थितीत गांधी एक निरीक्षण नोंदवितात.युद्धाला  लोक घाबरत नव्हते.प्रत्येकजण आपआपल्या शक्तीनुरूप लढाईत भाग घेण्यास गुंतले होते. *स्त्रीयांचा ' लाइसियम ' नावाचा क्लब होता.त्यांच्या सभासदांनी युद्धखात्याला लागणाऱ्या कपड्यापैकी शक्य ती जबाबदारी घेतली होती. सरोजिनी नायडू या क्लबच्या सभासद होत्पा. गांधीची त्यांची येथेच ओळख.गांधीनी येथे कपडे शिवले आणि जखमी लोकांची शुश्रुषा शिक्षणही घेतले.* **भाग ९१* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

रंग हा वेगळा

*रंग हा वेगळा* 🍁🌸🍀☘🌿 वर्ग संघर्षाची कहानी ही मानवी जीवन वृत्तांतातला महत्वाचा भाग आहे. विभाजीत होणे, आपला गट बनविणे ही मानवाची प्रवृत्तीच आहे. रंगावरून,रुपावरून, भाषेवरून, धर्मावरून... कितीतरी गट निर्माण झाले आहेत. व्यवसायावरून, पंथावरुन, सामाईक प्रश्नावरूनही मानवी गट सहज पडतात. आपआपला झेंडा, घोषणा, देव_ नेता इ ठरविण्यात माणूस सक्षमच आहे. कपडयांच्या रंगावरून माणसांचे गट करायचे ठरवले तर किती गट होतील. पण एखादे शाळेचे, ऑफीसचे सुव्यवस्थापनासाठीही एखादा ड्रेस कोड स्वीकारावा लागतो. ती शिस्त येण्यास मात्र खूप कष्ट करावे लागते, वेळ दयावा लागतो, लाभार्थी परिपक्व व्हावे लागतात. मानवीमनामध्ये एकात्म भाग निर्माण करणे महाकठिण हे शिवधनुष्य अनेक साधू- संतांनी , महात्मांनी पेलण्याचा प्रयत्न केला आहे. भारत देशात आजही एवढी विविधांगी संस्कृती एकत्र नांदत आहे.याचे बरेचसे श्रेय म.गांधीना दिले जाते, दयायला हवे. नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींचा राष्ट्रपिता म्हणून यथोचित गौरव करतात, ते यामुळेच ! स्वतंत्र भारताच्या निवडणूका जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण, प्रत्यक्ष पक्ष कसा प्रचार करीत आहेत...

आफ्रिकेस निरोप

आफ्रिकेस निरोप 🍁🍀🌸☘🌿 सत्याग्रहाचे ते पर्व संपले. १९१४ ते वर्ष ! १८९३ मध्ये गांधीजी  प्रथम आफ्रिकेत गेले होते आणि माघारी १९१४... वीस वर्ष गेली. उमेदीची, चैत्यन्याची ! सत्याग्रहाचे विजयी सेनापती ते. कालाच्या भालावर कर्तृत्वाची मोहोर उमटून ते चालले होते. हजारो अनुयायी. शेकडो स्नेही- सोबती. सुख- दुःखाचे अनेक प्रसंग. गंभीर प्रसंग, प्राणावर बेतणारे प्रसंग. कटू अपमान, दडपशाही, सत्याची कसोटी आणि विजयी क्षण !... कित्येक आठवणी स्मृतीपटलावर ! 'टॉलस्टॉय फार्म '-. तेथीलं जीवन ! तेथ भेटलेला रस्कीन ! गीता, बायबल..... ! समाजवादाची पेरणी, एकत्र शेती, शिक्षणाचे प्रयोग... बॅरिस्टर म्हणून लढविलेले वाद ! .... स्त्री, कामगार, गरीब यांना दिलेले स्फुल्लिंग.. सर्वांना आशेचा किरण दिला...! हे करता करता गांधीनांही आपला जीवनमार्ग मिळाला होता. आफ्रिकेतील लढयांची अनमोल अनुभवसंपत्ती सोबत होती. आता मातृभूमीच्या सेवेसाठी हा वीर परतत होता ! द आफ्रिकेत जनरल स्मटसबरोबर गांधींच्या चकमकी झाल्या, त्यांचेही प्रेम गांधींनी संपादिले. महात्माजींनीं स्वतःच्या हातांनी चप्पलजोड तयार करून ते स्मट्स साह...

सत्याग्रह - ५

*सत्याग्रह ५* 🌿☘🌸🍀🍁 गांधीजींच्या आफ्रिकेतील सत्याग्रहाची माहिती जगभरच्या साहित्यातून मिळते. Satyagraha in Africa या नावाचे पुस्तकात ती प्रसिद्ध झाली आहे. त्याचे मराठीतील भाषांतर  उपलब्ध आहे. ' नवजीवनच्या ' अंगात सत्याग्रहाचा वृत्तांत क्रमशः प्रसिद्ध झाला आहे. मा वालजी गो देसाई यांनी 'करंट थॉट ' हे पुस्तक यावर लिहले आहे. ' *द.आफ्रिकेतील सत्याग्रहाचा तो विजय अपूर्व होता. जगाच्या इतिहासात एक नवीन पान लिहले गेले* _ असा गौरव साने गुरुजींनी केला आहे. या सत्याग्रहाच्या लढयात गांधींची सुहृदयता अनुयायांच्यात, विरोधकांचे मनात घर करून राहिली. सत्याग्रहाच्या एका प्रसंगात एक व्यक्ती गोळीबारात ठार झाला.गांधी त्या विधवा मातेचे सात्वंनास गेले. गांधी म्हणाले "तुमचे सांत्वन मी कसे करू ?. .. अनेकांचे सुखासाठी मला हा लढा लढायला हवाच ! " गांधी कृतीशील नेते होते. अनेक हृदयद्रावक प्रसंगात ते ढळले नाहीत. शिष्यांप्रमाणे असणाऱ्या गांधीजींच्या कर्तृत्वाची असिम छाप नामदार गोखले यांचेवर पडली. गांधींच्या एकूण व्यक्तीमत्वामुळे ते प्रभावीत झाले. गोखले म्हणतात  *भारती...
*सत्याग्रह ४* 🍁🍀🌸☘🌿 गांधींनी सत्याग्रह हे सर्वसामान्यांसाठी शस्त्र दिले. प्रतिकाराचे शास्त्र दिले. जागतिक इतिहासात सत्याग्रहाचे ते प्रयोग अमर झाले आहेत. गांधी म्हणतात गोरे लोक सत्याग्रहाचा ' पॅसिव्ह रेझिस्टन्स ' असा सत्याग्रहाचा अर्थ घेत. सदाग्रहला ते निर्बलांचे हत्यार समजत . मगनलाल यांनी सत+आग्रह अर्थात सदाग्रह हा शब्द सूचविला.  काही बदल करून गांधींनी तो सत्याग्रह असा स्वीकारला. हे झाले तात्विक. आपण मागील प्रकरणात पाहिले जीवनात त्याचा प्रत्यक्ष प्रयोग. ! ... गांधींजींसह कामगार, स्त्रीया इ.चां सत्याग्रह. त्यांचेवर अनेक अत्याचार झाले. उपासमार,गोळीबारात काही लोक कामी आले. ना गोखले यांनी चिडून याविरुद्ध मोहीम उघडली. हिंदुस्थानचे व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिज ह्यांनी द आफ्रिका सरकारवर टिका केली. *सरकारने चौकशी मंडळ नेमले, चौकशी झाली. ३ पौंडाची डोईपट्टी रद्द झाली.सारी लग्ने कायदेशीर ठरली गेली. वसाहतीत जे रहात आहेत त्यांना रहाण्याचा परवाना असला म्हणजे कोठेही जाण्याचा परवाना आहे. इ इ ठरले. सत्याग्रहाने अपूर्व विजय मिळविला. इतिहासाचे ते एक गौरवशाली पान ठरले.* गांधीजींचा ह...

सत्याग्रह - ३

*सत्याग्रह ३* 🌿☘🌸🍀🍁 म गांधींच्या सत्यवादी, निरपेक्ष, संतवृत्तीची अमीट निशाणी अनुयायांवर होती. त्यामुळेच सर्व अनुयायांनीही निर्मळ , निरपेक्ष त्याग केला. सत्यासाठी सर्वस्व अर्पिले. अन्यायाविरूद्ध ठाम निर्धार केला. तन - मन - धन अर्पिले. काहींनी जीवन अर्पिले. स्त्री - पुरूष, शेतकरी, मजूर कामगार सर्वच संघर्षासाठी रस्त्यावर आले. *सत्याग्रहयाकडे विरोधकांसाठी द्वेष नाही. ..आणि कमालीचा संयम,मनात शांतता आहे. सत्याग्रहाला पराभूत होणे माहितच नाही.* *सत्याग्रह हे गांधींनी जगाला दिलेले क्रांतीकारक, अभूतपूर्व शस्त्र आहे.* " गांधी हे खरे खंदे लढवय्ये होते - रक्त न सांडणारे. सत्य व अहिंसा या द्वारा निःशस्त्र पददलित जनता, साम्राज्यवादी, सामर्थ्यसंपन्न शोषक सत्तेविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवू शकतात, आपले हक्क मिळवू शकतात.हे गांधींनी जगाला दाखवून दिले. त्यादृष्टीने गांधींचे नेतृत्व क्रांतिकारी स्वरूपाचे ठरले यात शंकाच नाही. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blog...

महिला सत्याग्रह - भाग २

*सत्याग्रह - २* सत्याग्रहाचा परिणाम म्हणून अनेक स्त्रीयां सत्याग्रही, कामगार, मजूर यांचेसह अनेक जन यात सामील झाले. सत्याग्रहाचे काम जोमाने सुरु होते.  तुरूंगात अनंत हाल अपेष्टा, सरकारी अत्याचारांना तोंड देणे सत्याग्रहींचे काम ! जेवण व्यवस्थित नाही. कित्येक असुविधा.. किती वेळा तर नुसते उपवास. ...आणि  इकडे हजारो कामगारांचे काय करायचे?सरकारच्या भितीने  मालक त्यांना चाळीतून राहू देईनात. आपले थोडेसे सामान घेऊन ते बाहेर पडले. काहींना हाकलून दिले गेले. कित्येक रस्त्यावर - स्त्रिया , पुरुष, मुले ! ती स्वातंत्र्याची महान यात्रा होती. *गांधीजी त्यांना घेऊन टॉलस्टॉय फार्मवर येणार होते*. तेथे खपू , राहू. इतर सोयी आहेतचं पण *नाताळमधून ट्रान्सवॉलमध्ये यायचे*, हे सोपे काम नाही. येथे परकीय सरकारचा वरवंटा. नाताळमधून ट्रान्सवॉलला जाणे हा. कायदेभंग होता , लाठीमार, गोळीबार दडपशाही ,अनंत शक्यता !...? काय होणार ? परंतु गांधीजी ती शांतिसेना घेऊन निघाले . वाटेत परत दिव्य. बरोबर संसार नाही. खाणं नाही की पिणं! सर्वसामान्यांची मदत होण्याची शक्यता कमी. प्रवासात ब्रेड व साखर हा आहार असे. ...

महिला सत्याग्रह - १

*महिला सत्याग्रह* 🍁🍀🌸☘🌿🌺 द आफ्रिकेतील त्या काळ्या कायदयाविरुद्ध महिल्यांचे बरोबर गांधींनी चर्चा केली आणि महिला सत्याग्रहास तयार झाल्या . कस्तुरबाही यात सामील झाल्या. साऱ्यांचा  उत्साह वाढला. एक चैतन्य घेऊन महिला बाहेर पडल्या. ट्रान्सवॉलची हद्द ओलांडून त्या नाताळमध्ये आल्या. कोणीही त्यांना अटकाव केला नाही. त्यांची प्रतिकार शक्ती ती काय ? त्या पुढे चालत राहिल्या - रस्त्यात भेटणाऱ्या कामगार, मजूर, महिला या सर्वांना त्या बेकायदे यांची माहिती सांगत. ' ३ पौडांचा कर, लग्नच बेकायदा ठरविणारा कायदा. ! ' माहिती ऐकल्यावर सर्व संतापत. वणवा पेटत होता. त्या  सर्वांनी संप पुकारला. सरकारने पाहिले की ह्या सत्याग्रही स्त्रियांना ह्या पुढे मोकळे ठेवणे धोक्याचे आहे. स्त्रियांना अटक करण्यात आली. तुरूंगात नंतर न्यायालयापुढे. तीन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली. भारतीय नारी तिकडे दूर आक्रिकेतील तुरूंगात खितपत पडल्या. कस्तुरबांचे एक धान्य व्रत होते. त्यांची दाद लागेना. मोठया कष्टाने त्यांना त्यांचा आहार मिळू लागला. परंतु त्या अशक्त झाल्या. सुटल्या तेव्हा नुसती हाडे राहिली होती. मोठ्य...

कस्तुरबा

*कस्तुरबा* 🌿☘🍀🌸🍁🌞 गांधीजींनी स्त्रीयांना सत्याग्रहाचा सल्ला दिला.पण घरी पत्नीला असे सूचवले होते का ? ... ' तुम्ही मला सत्याग्रहात सामील व्हायला का सांगत नाही ? मी का अपात्र आहे त्यास ? _ असे म्हणत कस्तुरबा सत्याग्रहात सामील झाल्या.  सत्याग्रह, स्वातंत्र्यलढा , गांधींचे जीवनातील विविध प्रयोगांना कस्तुरबांनी अनमोल साथ दिली.   विश्ववंदय,अखंड विश्वाला सत्य , प्रेम, अहिंसा आणि शांतीचा संदेश, आपल्या विचार, उच्चार आणि आचारातून ज्यांनी दिणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी. आणि अशा या महामानवाची सावली, मैत्रीण, सहचारिणी, सत्यव्रती आणि खऱ्या अर्थाने अर्धांगिनी बनून जीवन जगणाऱ्या कस्तुरबा, या त्यांच्या महान पत्नी होय . त्यांना 'बा' असेही संबोधले जायचे.   कस्तुरबा यांचा जन्म ११ एप्रिल १८६९ चा. पोरबंदर येथील काटियावाड हे त्यांचे गाव. त्या निरक्षर होत्या. तत्कालीन पद्धतीनुसार लहानपणीच वयाच्या ६ व्या वर्षी त्यांचा मोहनदास यांच्याशी साखरपुडा झाला आणि १३ व्या वर्षी लग्न झाले.    स्त्रीला जीवनदायिनी व विश्वातील एक महान ऊर्जा मानणाऱ्या महात्मा गांधीजींनी सुरुवातीला म...

स्त्री शक्ती जागृती

*स्त्री शक्ती जागृती* 🍀☘🌿🍁🌸 आफ्रिकेतील गांधीच्या सत्याग्रहाच्या अनुसंधाने ना गोखले आफ्रिकेत शिष्टाईसाठी आले. गांधीजी गोखल्यांना गुरु मानीत. गोखल्यांनी तेथील सरकारी अधिकारी, प्रमुखांच्या भेटी घेतले. गोखले विश्वास ठेवणारे. ते गांधीजींना म्हणाले, " काळा कायदा पुढील वर्षी रद्द होईंल, ३ पौंड डोईपट्टीचा नवीन कर आहे तोही रद्द होईल. सत्याग्रह थांबवा " या शिष्टाईमुळे सत्याग्रह थांबला. पण थोडया काळात सरकार पुनः उलटले. जुने नियम राहिले वर नवीन कायदा आला. सर्वांना चीड आणणारा,अपमानास्पद कायदा ! " जी लग्ने ख्रिश्चनधर्मविधीप्रमाणे झालेली नसतील किंवा जी लग्ने नोंदणी पद्धतीने झाली नसतील , ती सारी बेकायदा ठरविण्यात येतील. " असा हा आसुरी कायदा होता. हिंदू, मुसलमान, पारशी, सर्वांची लग्ने बेकायदेशीर ठरली. धर्मपत्नीचे स्थान कोठे राहिले ? सतीत्वाचा हा अपमान होता, पातिव्रत्याची विटंबना होती. स्त्रिया संतापल्या. आतापर्यंत स्त्रियांना सत्याग्रही म्हणून घेण्यात येत नसे. परंतु स्त्रियांवरचा अन्याय दूर करायला स्त्रियांनी पुढे यावे असे गांधीजींना वाटले. स्त्रियांची शक्ती जागी झाली...

शिक्षकाच्या भूमिकेत गांधी

*शिक्षकाच्या भूमिकेत गांधी* 🍀☘🌿🌸🍁 टॉलस्टॉय आश्रमात शिक्षणाची व्यवस्था करण्याचे गांधींनी ठरविले. निराळा शिक्षक देणे अशक्य होते. कारण योग्य हिंदी शिक्षक दूर्मिळ होते.डरबन पासून फार्म २१ मैल दूर होता, मग मोठा पगार दिल्याशिवाय कोण शिक्षक येणार ? फार्मकडे ऐवढा पैसा ही नव्हता. ... आणि गांधीना अपेक्षीत शिक्षण चालू पद्धतीपेक्षा वेगळे होते. सगळ्या फार्मची जबाबदारी गांधीवर होती , त्यामुळे शिक्षणाची जबाबदारी आपणच उचलावी असे गांधींनी ठरविले. शारीरिक शिक्षण आणि उद्दोगी शिक्षणांवर भर होता. द आफ्रिकेमध्ये हिंदी मुलांना जे शिक्षण मिळे, ते फक्त अक्षरज्ञान असे. टॉलस्टॉय फार्म मध्ये मात्र उद्योगासह शिक्षणावर भर होता.व शिक्षकही स्वतः काम करणार यावर भर होता. हस्तकौशल्यावर भर दिल्याने विद्यार्थी आनंदाने शिक्षणात सहभागी होत. पण अक्षरज्ञान देणे गांधींना कठीण जाई. साधनांची कमतरता होतीच वर इतर व्यापातून शिक्षणास पुरेसा वेळ नाही.  दिवसभर शारीरिक काम करून गांधी थकून जात. कसे बसे स्वतः ताजेतवाने ठेवून शिक्षण दिले जात असे. पुढे वेळापत्रकावर जादा लक्ष दिले गेले. सकाळचा वेळ शेती व गृहोद्दोग यामध्ये...

अहिंसा २

अहिंसा - २ 🍁🌸🌿☘ म गांधींनी अहिंसेच्या तत्वाचा लावलेला अन्वयार्थ, अखिल मानवतेच्या कलाण्याचा आहे. सततची युद्धे,लढाईची खुमखुमी, रक्तपात , सामान्यांवर भीतीचे सावट असणे इ... इ. अहिंसेचा त्यांनी धरलेला आग्रह जगाला त्यांनी केलेले एक महत्वाचे योगदान आहे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे असा ढोबळ अर्थ सर्वसामान्यां कडून घेतला जातो. पण गांधीच्या दृष्टीने अहिंसा एक तत्व आहे. आणि या तत्वाला खूप व्यापक अर्थ आहे.  त्यांच्या दृष्टीने आचाराने, विचाराने किंवा उच्चाराने कोणालाही न दुखावणे, क्रोधामुळे , स्वार्थामुळे किंवा सुडबुद्धीने कोणत्याही प्राणिमात्राला इजा किंवा दुःख न देणे म्हणजे अहिंसा. अहिंसेचे व्रत घेतलेल्या व्यक्तीबद्दल कोणाबद्दल  मनात शत्रुत्व नसते, मनात तो क्षमाशीलच असतो. परवान्यांच्या होळी बरोबर सत्याग्रहाच्या आंदोलनास धार आली. गांधीजींनी टॉलस्टॉयची ग्रंथ संपदा अभ्यासली होती. टॉलस्टॉयचा प्रभाव गांधीवर होता. टॉलस्टॉयचे गांधींच्या सत्याग्रहावर इतर जगाप्रमाणे कुतुहुलाने लक्ष होते. त्यांनी गांधीजींच्या सत्यागहाच्या आंदोलनाला आशिर्वाद पाठविले.वयोवृद्ध शांती दूताचे नूतन प्रेष...

अहिंसा _ म गांधी

अहिंसा 🍀🍁🌿☘🌸 अहिंसा परमो धर्म '  माननारे वर्धमान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी म्हणजे प्राचीन काळापासून भारत देश ज्या अहिंसेच्या तत्वाचा पुरस्कार केला आहे ,त्या तत्वज्ञानाचे त्या - त्या काळातील पुरस्कर्ते होते. गांधी म्हणत ' हिंसा हा पशूचा ,तर अहिंसा हा सुसंस्कृत मानवाचा धर्म आहे. ' अहिंसेचे व्रत घेतलेल्या व्यक्तीच्या मनात कधीही कोणाबद्दल शत्रुत्व नसते.तो उच्च धर्माचे, आत्मबळाच्या धर्माचे पालन करते. मात्र गांधींची अहिंसा म्हणजे दुर्बलता नव्हती, असहाय्यता नव्हती किंवा दूर्बलता नव्हती. तर ते एक सर्वोच्च कोटीचे शौर्य होते. अहिंसा दुबळ्याचे नव्हे तर शूरांचे शस्त्र होते . गांधीचे मते भेकड माणूस अहिंसेचे पालन कधी करू शकत नाही. ते म्हणत 'भ्याडपणा आणि हिंसा यांच्यात निवड करण्याचा प्रसंग आलाच तर हिंसा पत्करावी ' त्यांनी आफ्रिकेत असताना बोअर युद्धात व झुलूंच्या बंडात भाग घेतला आणि १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेंव्हा भारतीय फौजा धाडण्यास त्यांनी तात्काळ संमती दिली ती यामुळे. आपली अप्रतिष्ठा होत असताना ,ते असहाय्यपणे बसण्यापेक्षा आपल्या सन्...

टॉलस्टॉय फार्म - २

*टॉलस्टाय फार्म-2* ☘🍀🌿🍁🍀 गांधीजींचा फार्म म्हणजे सत्याग्रहांचे गोकुळ होते. आश्रमवासिंयांचे कष्टावर पीके येत. वसाहतीत इतर उद्योग ही चालत. चांभारकामातून  चपला तयार होऊ लागल्या. *म गांधी स्वतःहा उत्तम चपला तयार करीत.त्यांनी अनेक चप्पल जोड तयार केले.* कुंभार मातकाम करी तर सुतार विविध लाकडी वस्तू करी. सगळा फार्म एक उद्योगमंदिर झाला. सत्याग्रहांच्या एकूण जीवन चरितार्थाची सोय होऊ लागली होती. मग गांधी आणखी सुधारण्याकडे लक्ष देऊ लागले. गांधींनी शिक्षणाकडे लक्ष दयायला सुरुवात केली. सत्याग्रही विभिन्न भाषिक,भिन्न धर्मीय, हिंदुस्थानच्या विविध प्रांतातून आलेले. त्यांना शिकवायचे कसे गहन प्रश्न होता .... शिक्षणाचे प्रयोग सुरु झाले. कृतीतून शिक्षण - उद्योगधंदयातून शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली .आणि त्याबरोबर परस्पर -सामंजस्य आणि सहिष्णुतेची शिकवण दिली जात असे. ' *'टॉलस्टॉय फार्म ' मध्ये उद्योगधंदयांच्या मदतीने शिक्षण देण्याची प्रसिद्ध वर्धाशिक्षण पद्धतीचा पाया घातला गेला.* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,भाग ७७🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  827537...

टॉलस्टॉय फार्म - १

*टॉलस्टॉय फार्म* 🌿🍁🌸🍀☘ 'ठं '- दलित कुदळीचा घाव घालतोय, तर मराठा नकळत ती माती पाठीत भरून बाहेर फेकतोय, . कुठं हिंदू श्रमदान करतोय तर थकला म्हणून त्याला कुठं मुस्लीम नकळत प्यायला ग्लासभर पाणी आणून देतोय, कुठं चांभार श्रमदानाठिकाणी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करतोय तर त्याला हातभार म्हणून लोहार नकळत स्वतःचे पैसे देतोय. . कुठं तृतीयपंथी सगळ्यांना वाटून चहा देतोय, तर कुठं अपंग कुदळ खोरे शेलवटायचं काम करतोय, . कुठं रंगाने काळा असणारा माती परिक्षणाची माती गोळा करतोय तर कुठं गोरा त्याच्या पोतेची नोंद ठेवतोय, . कुठं ब्राम्हण रोपवाटीका तयार करतोय तर कुठं, वारीक त्याला रोज पाणी घालतोय, *कालच पाणी फौंडेशनच्या अनुशंघाने वरील प्रकारच्या एकसंघ विचाराच्या गोष्टी घडत आहेत अशा आशयाची सचिन अतकरेंची पोस्ट आली होती* आणि एकदम आठवण झाली गांधीच्या टॉलस्टॉय फॉर्म... वरील गोष्टी जशाच्या तश्या ठिकाण मात्र दूर आफ्रिकेत.. कुठं गुजराती खोऱ्याने माती ओढतोय तर महाराष्ट्रीयन  स्वतः ती पाटीत भरून कडेला टाकतोय... कुठं आंध्री दळण दळतोयं, कुणी रानातनं फळं गोळा करतोय, कोणी रानातं खपत...

होळी - परवाना अनं सर्वस्वाची !

*होळी - सर्वस्वाची अनं परवान्यांची !* ☘🍀🌿🌸🍁 गांधीजींवरचा तो हल्ला जीवघेणाच होता. ओठ कापला गेला होता. गालातून रक्त येत होते. त्यांचे पुढचे तीन दात पडले होते. " झोपून रहा " विश्रांती घ्या " - डॉक्टरांचा सल्ला. परिस्थितीचे भान ठेवून गांधीजींनी एक पत्रक लिहून प्रसिद्ध केले *'माझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना माफ करा,त्यांना आपण काय करीत आहोत याचे भान नव्हते.'* हल्ला करणारे मुसलमान होते म्हणून हिंदूनी संतापू नये. सांडलेल्या रक्तामुळे हिंदू - मुसलमान एकत्र येवोत. कराराप्रमाणे ज्यांची इच्छा आहे,त्यांनी परवाने काढा. पुढे सरकार कायदा रद्द करेल. "  प्रेमळ लोक सेवेला, काही प्रार्थना म्हणत. त्यiचे प्रेमाने गांधी भारावून जात. कालांतराने गांधी ठीक होऊ लागले. सरकारने पुन्हा धोका दिला. कायदा रद्द केला नाही. गांधीनी सरकारला कळविले *दिलेल्या विहित वेळेत कायदा रद्द करा, नाहीतर साऱ्या परवान्यांची होळी करू.* सरकारचे उत्तर आले नाही. गांधीजींनी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस. लोक जमले. प्रचंड सभा भरली. *गांधीजी म्हणाले आता जरी सरकारचे उत्तर आले तरी सरकारचे अभ...

तडजोड ३

शब्दाला जागणारा गांधीजींना जबरी दुखापत झाली होती. डोक यांचे घरीच त्यांची सुश्रुषा चालली होती. परवाने काढणारा अधिकारी त्यांचे तब्यतेची चौकशी करण्यासाठी आला. " मी परवाना काढायला आलो होतो, पण त्यावेळी हा प्रकार झाला. आता त्वरेने माझे ठसे घ्या ! अधिकारी त्यांना थांबवित म्हणाला " तुमची तब्येत अजुनही खराब आहे.  घाई कशाला करतायं ? " " लोकांना, माझे ऐकणाऱ्या अनुयायांना मी परवाने काढा असे सांगतो आहे. तर आधी मी तसे वागले पाहिजे " तो अधिकारी गहिवरला..  गांधीजीची अवस्था आणि त्याची सत्यवृत्ती पाहून त्याचे डोळे भरून आले. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

तडजोड २

*सरकारशी तडजोड* ☘🍀🍁🌸🌿 'आता स्वेच्छेने परवाने काढा पुढे आम्ही हा कायदा रद्द करू !' - सरकारची ही तडजोड सत्याग्रही या नात्याने मान्य केली. माघार घ्यायची - का नाही ? यावरून सत्याग्रहांच्यात मतभेद होते. गांधींनी केलेली जडतोड काहींना माघार वाटत होती. मीर आलम पठाण गांधीचा जुना पक्षकार. तो नेहमी गांधीजींचा सल्ला घ्यायचा. तडजोडीचे त्याला मान्य नव्हते . मग चळवळ का सुरू करायची -असे त्याला वाटले. सत्याग्रहांचे वतीने गांधीजी पहिला परवाना गांधीजी काढणार होते. गांधीजी निघाले. तेवढयात मीर आलम तेथे पोहचला. " कोठे चाललात ? " मीरचा प्रश्न " परवाना काढायला जातो. ठसे दयायला, मी दाही बोटांचे ठसे देणार आहे. तुम्ही दोन अंगठ्यांचे दिलेतरी बास. चला माझ्या बरोबर ! " गांधी एवढे बोलतात तेवढयात त्यांच्या डोक्यावर सोटा बसला.  ' हे राम ! ' - म्हणत गांधी जमिनीवर पडले, बेशुद्ध झाले. लाथा, बुक्काचे तडाखे चालूच होते. युरोपियन लोक धावले. मीर आलम व त्याचे साथीदार पळणार होते. तोच युरोपियन लोकांनी धरले. पोलीसही आले. गांधीजीचे मित्र श्री डोक नावाचे धर्मगुरू  तिकडे धावल...

तडतोड १

सरकारी तडजोड आणि परिणाम 🍀🍁☘ परवाने संदर्भाने सरकारने गांधीजींना तडजोडीचा निरोप दिला. जनरल स्मट्रस यांनी गांधींना बोलाविले. चर्चा. . *'*तुम्ही आपण होऊन स्वेच्छेने परवाने जर काढाल तर पुढे हा कायदा आम्ही रद्द करू.* *... पंरतु आज स्वेच्छेने परवाने काढा , सरकार  सक्तीन हे काम करु इच्छित नाही.'* कायदा रद्द होईल तर स्वेच्छेने परवाने काढूया असा गांधींनी विचार मांडला. गांधीजींचा हा विचार म्हणा वा निर्णय काहींना पटला नाही. यात आपल्या स्वाभिमानाची हानी आहे. चळवळीची हानी आहे, असे काहिंना वाटले. चळवळीचे पुढे काय ?... का सरकारचं सत्याग्रहींमध्ये दोन गट पाडू इच्छित होतं ? 🍁🍀☘🌸🌿 म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,भाग ७२🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

बापू

*बापू* 🌞☘🌸🍁🍀🌞 म गांधींना मुले फार आवडत. जुन्या अभ्यासक्रमात म गांधीचा लहान मुलाला घेतलेला एक फोटो प्रसिद्ध होतो. आणखी एक फोटो म्हणजे समुद्रकिनारी एक मुलगा काठी घेऊन चालला आहे. तर त्याचे मागे महात्माजी काठी धरून हसत जात आहेत, हे ही अत्यंत लोकप्रिय , परिचीत चित्र आहे. मुलांनाही अर्थात गांधीजी आवडत ते त्यांना प्रेमाने 'बापू 'म्हणत गांधीजी लहान मुलांत नेहमीच मिसळत. फिरायला जाताना आपल्या बरोबर ते मुलांना घेत त्यांचेबरोबर संवाद साधत ! नेहमीप्रमाणे बापू फिरायला चाललेले . त्यांचेबरोबर मुलांची सेना. जिज्ञासू मुले बापूना प्रश्न विचारीत. हसत खेळत फिरणे.  एक मुलगा म्हणाला, ' बापू, तुम्हांला एक विचारू ? ' ' हां, विचार ! ' ' अहिंसा म्हणजे  परपीडा न देणे ,हो ना ? ' बरोबर ' ' तुम्ही हसत हसत आमचे गालगुच्चे घेता. ही हिंसा की अहिंसा ? ' ' अरे लबाडा ! ' असे म्हणत मोठ्यांदा हसत बापूंनी त्याचा जोराचा गालगुच्चा घेतला. ' बापू चिडले, बापू चिडले ! ' असे मुले हसू लागली टाळ्या वाजवू लागली. बापूही त्या हास्यरंगात सामील झाले. म.गा...

सत्याग्रह ३

*पहिला सत्याग्रह*               भाग ३रा 🌸🍁🌺🍀🌿 कोर्टाने दिलेली २ महिन्यांची शिक्षा म गांधींनी आनंदाने मान्य केली. ते तुरुंगात जायला निघाले. मनात विचार आला - ' माझे मागे ह्या चळवळीचे काय होणार ? सरकारी दडपशाही अशीच चालू राहील ?.. लोक दडपले जातील की धैर्याने तुरुंग वास पत्करतील ? .. चळवळ बंद पडली तर ?... आपणही २ महिने तुरुंगात .. तुरुगांतून चळवळीचे काम कसे होणार ? ' - गांधी विचाराने नाराज होत . पुन्हा स्वाभाविक उर्मीने उसळून येत- '  तुरुंग म्हणजे सुखकारक जागा समजा असेच लोकांना मी बजावयाचो ना ! त्यांना आपण तयार व्हा हालअपेष्टा भोगण्यासाठी असे म्हणायचो ना ! मग आपल्यावर प्रसंग आल्यावर डगमगयचं ! ....  सामोरे जायचं परिस्थितीशी. तेही आनंदाने. म गांधीच्या चेहऱ्यावर नेहमीचेच हास्य फुलले. गांधीजी तुरुंगात गेले. तेथे काही परिचीत होतेचं, ..... आणि रोज सत्याग्रहींच्या झुंडी तुरुंगात दाखल होत होत्या... याचा एक फायदा झाला , बाहेरच्या हालचाली गांधींना कळत आणि तुरुंगात उत्साहाचे वातावरण वाढे ! *'तुरुंगातील अन्न ठीक नाही हो !- कैदयांची तक्रार...

सत्याग्रह २

सत्याग्रहाचा १ला प्रयोग               भाग २ 🍁🌺🍀🌿  परवान्या विरोधी केलेली म. गांधी व सहकाऱ्यांनी केलेली सभा, ठराव सरकारला कळला होतो. काही काळ सरकारने जावू दिला. जवळ - जवळ वर्षभरानंतर सरकारने  परवान्याची प्रक्रिया सुरू केली. .....१९०७ च्या डिसेंबर पर्यंत  थोडया लोकांनी परवाने काढले पण त्यांची संख्या उणीपुरी ५०० ही नव्हती. सरकार चिडले. काहीतरी शिक्षा करावी विरोधकांना , नाहीतर पकडून टाकावे तुरुंगात - हे उपाय करावे असे सरकारला वाटू लागले. त्यांनी गांधी व प्रमुख सहकाऱ्यांना कोर्टनोटीस काढल्या - ' आपण सर्वांनी सरकारी कायद्याचा आदर करीत १० जानेवारी १९o८ च्या आत परवाने काढा नाहीतर त्या तारखेनंतर २ दिवसांच्या आत ट्रान्सवॉल सोडुन जा .. ' असा आदेश देण्यात आला. पंरतु एवढे सारे होऊनीही  कोणी परवाने काढले नाहीत आणि कोणीही ट्रान्सवॉल सोडूनही गेले नाही. सर्वांवर खटले भरण्यात आले. ज्या कोर्टात गांधीजी बॅरिस्टर म्हणून न्यायालयासमोर उभे रहात, तिथे ते कैदी म्हणून उभे राहिले होते. ... ते साधे कैदी नव्हते, सत्याग्रही कैदी होते. ' ......

सत्याग्रह १

*सत्याग्रहाचा १ला प्रयोग* 🌿🌸🍁🍀🌺 २२ ऑगस्ट १९०६ रोजी द आफ्रिकेत ट्रान्सवॉल सरकारने एक वटहुकूम जाहीर केला. *ट्रान्सवॉल राहणाऱ्या हिंदी माणसाने,आठ वर्षावरील प्रत्येक स्त्री -पुरुष व्यक्तीने ,राहण्याची परवाणगी काढली पाहिजे.* आपली नावे नोंदवावीत, पास घ्यावेत. प्रत्येकाने आपले नाव, जात, धंदा, वय, राहण्याचे ठिकाण नोंदवायचे. शरीरावरच्या जन्मखुणा वा कायमच्या खुणा सांगाव्यात. अंगठा, बोटे यांचे ठसे दयावेत. आपण जेथे जाणार तेथे हा पास स्वतःजवळ ठेवायचा. जणू फिरण्याचा परवानाचं ! मर्यादीत कालात पास काढा नाहीतर शिक्षेला सामोरे जा - सरकारची घोषणा.  पास काढला नाही,तर तो गुन्हा आणि त्यास दंड किंवा तुरुंगवास ! हिंदी लोकांत एकच खळबळ उडाली... एवढा जुलूम, एवढी दडपशाही ! म गांधी पण विचारात पडले. मित्रांशी चर्चेची आवर्तने आणि शेवटी जाहीर सभा घेण्याचे ठरले.      हिंदी लोक ११ सप्टेंबर १९०६ला सभेसाठी एकत्र आले. सगळे चिंतीत, अस्वस्थ ! गांधीनी आपली मतं मांडली . सभेत ठरला मांडला गेला. " काय होवो ते होवो ,आम्ही सर्व हालअपेष्टा सोसू , पंरतु हा जुलमी कायदा माननार नाही !   ( क्रमशः...

निसर्ग नियम व निसर्गसंपदा

*निसर्गनियम, निसर्ग संपदा.* गुढीपाडवा - नववर्षाचा प्रारंभ दिन. कटुलिंबाचा पाला खाऊन आपण सुरुवात करतो. कडुलिंब औषधी गुणधर्मानी मनुष्य प्राण्यांवर उपकार कर्ताच ! आपल्या सणांची रचना निसर्गचक्राप्रमाणे ! गांधी अनुभवानी व विविध प्रयोगांनी निसर्गोपचारी झाले. गांधींना विविध औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग यांची जाण होती. शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे, मग पंचभूतांसंबंधी उपायांनी शरीराचे रोग बरे करता येईल असे गांधीना वाटे. *काही रोग पृथ्वी तत्वाने म्हणजे मातीने बरे होतील. काही रोग पाण्याने बरे होतील. काही रोग तेजाने अर्थात प्रकाशाने बरे होतील.तर काही रोग मोकळ्या हवेने बरे होतील असे गांधीना वाटे* जलचिकित्सा करणारे , प्रकाशचिकित्सा करणारे, त्या पद्धतीचा पुरस्कार करणारे त्याकाळी पुढे आले होते. गांधी त्यांचा अभ्यास करीत त्यापद्धतीचा स्वतःवर प्रयोग करीत. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸६७🌿 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

त्याग आणि संयम

*त्याग आणि संयम* आपण एखादया वस्तूचा त्याग करतो . पंरतु तो तात्पुरताच असतो. त्या वस्तुबद्दल विरक्ती उत्पन्न झाल्याशिवाय तो त्याग टिकत नाही, असे गांधी मानत . गांधीजींनी ब्रम्हचर्याचे व्रत घेतले . आता हा वसा टाकायचा नाही. गांधींनी मनोमन ठरवले ऐहिक सुख इंद्रियांना सदा खुण वतेच , इंद्रियांवर संयम हवा ! ... अनं त्यासाठी आहारावर, तोंडावरही ताबा हवा. काय खायला हवे, काय बोलायला हवे. कोणाची संगत हवी,काय वाचावे ... काय ऐकावे ! कसे बसायचे , कसे निजायचे - गांधींनी दिवसभराचे नियोजन केले. ब्रम्हचर्य पाळायचे म्हणजे खूप जपायचे मनाला, शरीराला ! सुखद स्पर्श, आवडीचा पदार्थ,चमचमीत खाणे इ सर्वांचा त्याग करायचा ! महात्मा गांधी म्हणत - *" ब्रम्हचर्य म्हणजे अमळ बेफिकीरी नाही, अखंड सावधानता आहे. स्वतःवर विश्वास हवा, परमेश्वराची कृपा ही हवी. अखंड साधना प्रभुकृपेनेच फलद्रुप होईल.* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

सत्य आणि तथ्य

*सत्य आणि तथ्य* एक एक विचारांची पारख करून त्या विचारांची अंमलबजावणी गांधीजी आपल्या जीवनात करीत होते. जे उत्तम वाटले ते अंगी बाणवित होते. बॅरिस्टरीचा व्यवसाय सुरू होता. पंरतु खोटारडा अशील आला की गांधी त्याचा खटला नाकारीत. गांधीजींची सत्यनिष्ठा सर्वांना कळली होती. त्यामुळे खोटा खटला घेऊन जायला कोण धजावत नसे. एकदा पारशी व्यापारी रुस्तुमजी शेठ म्हणून त्यांची केस गांधीकडे आली. शेठने जकात अधिकाऱ्याबरोबर संधान साधले होते. तो भारतातून माल मागवी, पंरतु जादा मालाची जकात चुकवी. खोटेचं आकडे दाखवी. एकदा दुसऱ्याचं अधिकाऱ्याला शंका आली.त्याने तपासणी केली. शेठची फसवेगिरी सापडली. शेठ गांधीच्या पायावर - अब्रु वाचविण्याची विनंती ! गांधी - " तुमची चूक कबूल करा.. " केली ना तुमच्याजवळ " - शेठ ' तुम्ही सरकारला फसवले आहे. तिथं कबूल व्हा ! '- गांधी रुस्तुम शेठजींचे वकील वेगळेच सल्ले देत होते. शेठने गांधीच्या सूचनेप्रमाणे वागणे ठरविले. गांधीजी जकात अधिकारी व सरकारी वकिलास भेटले. 'तुमच्या नियमाप्रमाणे शेठ दंड भरण्यास तयार आहेत ' - गांधी. अधिकाऱ्यांच्या शंकेला जागा उ...

संयम आणि ब्रम्हचर्य

*संयम आणि ब्रम्हचर्य* गांधींचा समाजकार्याचा व्याप वाढू लागला , गृहस्थाश्रमातील व्यक्तीला समाजसेवा करायची म्हणजे तारेवरची कसरतच ! समाजकारण - राजकारणांसाठी कोण घरादारांवर तुळशीपत्र ठेवणार ? संसाराचा व्याप कमी करावा लागेल - गांधींनी ठरवले. कुटूंबासाठी जादा शक्ती वाया गेली तर, मानवतेची सेवा कशी होणार ?... आपलं सगळं लक्ष सेवेवर हवे. कुटूंबातील अडचणी, पोराबाळांची स्वप्नं यासाठी गृहस्थाची क्रयशक्ति जाणारचं ! बायको प्रसूत होण्याची वेळ आली की मग समाजकारणाकडे लक्ष लागेल ? .... कुटूंब की मानवसेवा ? गांधीचा रात्रंदिवस या विचारात असत. ज्याचे डोळ्यापुढे सतत मानवतेचा ध्यास त्याला कसली निवांतपणाची आस ? .. *आपण आता ब्रम्हचर्य स्वीकारले पाहिजे असे त्यांना वाटू लागले* त्यांनी मित्रांजवळ चर्चा घेतली आणि ब्रम्हचर्य स्वीकारण्याचे निश्चित केले. चंगळवाद आणि भोगवादाकडे झुकलेल्या एका पिढीला गांधीचा हा निर्णय या काळात कसा वाटेल ?.. .. *जे व्रत्य म्या घेतले, जे- जे म्हणूनी सोसेन पण वचनभंग होणार नाही या कुळीचे गांधीचे होते.* आजारी पडल्यावर किंवा उपवास असताना एखादे पदार्थाचा मोह सोडवित नसणाऱ्या प्र...

भाग ६१ ते ६३ बद्दल

*६३ व्या भागाबद्दल*🌸🍁🌺☘🌿🍁🌸🇮🇳 म गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सुरु केलेल्या लेखमालेचे परवा ३१.३ ला ६१ दिवस पूर्ण झाले. सांप्रत काळात म गांधीजी सारखा प्रचंड आवाका अनं जनसामान्यांशी नाळ असले किती नेते आपल्याला भेटतात ? भरमसाठ आश्वासने..... आणी, कथनी अनं करणीत जमीन- अस्मानाचा फरक ! गांधीजींचे नेतृत्व भारताला मिळण्याअगोदर,  काँग्रेसच्या छत्राखाली अनेक महद्जन, विद्वान कार्यरत होते...आणि काँग्रेसचा व्याप सीमीत होता. गांधींनी काँग्रेसला चळवळीचे रूप दिले व त्या चळवळीत सर्वसामान्य,पीडीत, दीन - दलित,गरीब सगळेच सामील केले. त्यातील अनेकांनी पुढे स्वातंत्र्यलढयाचे, सामाजिक बदलाचे नेतृत्व केले. द आफ्रिकेपासून ते भारतीय स्वातंत्र्यलढयाचे विविध वळणांवर आपणांस गांधीजींचे सत्यवादी, प्रयोगशील, आधी आचरण करणारे नंतर उपदेश देणारे व्यक्तीमत्व  सहज सापडते. गांधींच्या जीवनवादी प्रयोगातून जगाला अनेक मार्ग मिळाले, नित- नवीन  दिशा मिळाल्या- ' मागील ३ लेखात *गांधीजींनी सर्वांच्या हिताला जपणारी कामे, कामाबाबत भेदभाव न करता कामाप्रमाणे सर्वांना समान वेतन , स्वावलंबी जीवन, ए...

समाजाचा पैसा समाजासाठी

*समाजाचा पैसा समाजासाठीच* वाचनांबरोबर गांधीजी शब्दार्थाशी एकरूप होत. समानता, अपरिग्रह हे शब्द, १ा ब्दशः जीवनात उतरत. परमेश्वराकडे जायचे म्हणजे सर्व वासनातून अनासक्त व्हायला पाहिजे असे गांधी मानत. गांधीजी विम्याचे हप्ते भरीत. अध्ययनकाळात त्यांनी मुंबईच्या मित्राला लिहले " बासं झाले हप्ते आता, बुडू दे पॉलिसी ! " " परमेश्वरावर ज्याची श्रद्धा आहे. त्यांनी पुढची फिकीर कशाला करायची. म गांधी दैनं खर्चातून उरलेले पैसे थोरल्या भावाकडे पाठवित. पण त्यांना आता निराळी दृष्टी  आली. आफ्रिकेन मिळवलेले पैसे आफ्रिकेतील लोकांच्यासाठी खर्च करायचे. त्यांनी भावाला कळविले -" *माझेपैसे येथील समाजाच्या हितासाठीच खर्च होतील* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

प्रयोग

*प्रयोग* गांधीजी व त्यांचा मित्र पोलक यांची चांगलीच गट्टी जमली. विविध अनुषंघाने ते एकत्र येवू लागले. पोलकनींच रस्किनचे ' अन्टु धिस लास्ट ' हे पुस्तक गांधीजींना आणून दिले होते. गांधीजींनी एक जमीन खरेदी केली. सुमारे ८० एकर होती. गांधीजींची अशी कल्पना होती , शेतीसाठी सर्वांनी एकत्र काम करायचे. एकत्र राहायचे, शेती करायची, मेहनत घ्यायची . काम करणाऱ्यास महिना ४५ रुपये दयायचे असे ठरले. 'इंडियन ओपिनियन 'हे पत्रही शेतातच आणण्यात आले . वृत्तपत्राचा छापखाना शेतातचं सुरू झाला. म गांधीजींचे पुतणे मगनलाल हे गांधीजींच्या प्रयोगात पूर्णपणे सामील झाले. शेती सुरू झाली. शेतीची काम नियोजनाने होऊ लागली. पण पुढे -पुढे गांधीजींना जोहान्सबर्ग येथे कामानिमित्त जाऊ लागे- राहायला भाग पडे. शेतीकडे मधून- अधून चक्कर होई. जोहान्सबर्ग येथेही गांधीजी अत्यंत साधेपणाने राहू लागले. *स्वावलंबन हे जीवनाचे सूत्र ठरले.ते घरीच छोटी मोठी कामे करीत.भाकरी भाजत, मित्र पोलक बरोबर जात्यावर दळीत* गांधीजींच्या प्रयोगशील जीवनातील सुरूवातीचे हे प्रयोग होते. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 ...

जीवन सिद्धांत

*जीवन सिद्धांत* गीतेच्या अध्ययन करताना गांधींना त्यांचे मित्राने प्रख्यात इंग्रजी लेखक यांचे - ' अन्टु धिस लास्ट ' .हे पुस्तक वाचावयास दिले.( आचार्य जावडेकर यांनी या पुस्तकाचा ' अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र ' या नावाचे पुस्तकात मराठीत अनुवाद केलेला आहे. हे पुस्तक वाचून गांधीजी गंभीर झाले. त्यांतील तत्वानुसार त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात नियम पाळायचे ठरविले. त्यांना उपरोक्त पुस्तकात ३ महत्वाचे सिद्धांत आढळले - *१सर्वांच्या हितातच आपले हित असते*. २ *सर्वांना आपापल्या सेवाकर्माने उपजीविका मिळविण्याचा हक्क आहे आणि त्या अर्थाने सारी सेवाकर्मे सारखीच आहेत. सेवा कोणती असो, कुंभार असो चांभार असो, न्हावी असो वा वकिल* .,.... *सारे समान आहेत.* ३ *शेतकरी, कामगार, कष्टकरी, प्रामाणिक पणे जीवन जगणाऱ्याचे जीवन म्हणजे यथार्थ जीवन!* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

चिंतन मन न

*चिंतन मनन* आफ्रिकेतील लोकांचे प्रश्न , त्याचा अभ्यास, चळवळी, पत्रव्यवहार, वृत्तपत्र लेखन यातून वेळ मिळे तेंव्हा गांधी निरंतर चिंतन करीत. त्यातूनच त्यांनी गीतेचे अध्ययन त्यांनी सुरु केले. अध्ययनानंतर मनन सुरु होई. श्लोका- श्लोकांचा अर्थ, शद्बांचे भावार्थ - त्या अर्थाशी तादात्म्य पावणे - गांधीजी गीतामय होऊन जात. इतरही वाचन सुरू होते. *गांधीजींच्या जीवनात या चिंतन, मननाने संपूर्ण क्रांती होऊ पहात होती.* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

आफ्रिकेतील लोकांसाठी

*आफ्रिकेतील लोकांसाठी* दिलेल्या शब्दाप्रमाणे म गांधी पुन्हा द आफ्रिकेत गेले. हिंदी लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. हिंदी लोकांच्या चर्चेतूनही त्यांना त्यांचे प्रश्न कळले. गांधीजींनी ' इंडियन ओपिनियन ' नावाचे वृत्तपत्र चालू केले. त्यातून हिंदी लोकांचे प्रश्नाला वाचा फोडली. या प्रश्नांची दखल घेऊन त्यांचा प्रसार करता , गांधींजींचे विचार, तत्वज्ञान आपोआप प्रसारीत झाले. *आफ्रिकेतील लोकांसाठी ते पत्र म्हणजे गांधीजींच्या जीवनवृत्तीचे प्रतीकच बनले.* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

वचन Promise

*वचन* हिंदुस्थानाच्या राजकारणात गांधीची वाटचाल आता कुठे चालू झाली होती. गांधीजींनी मुंबईत नवा संस्कार थाटावयाचे ठरविले होते. पण तोच आफ्रिकेतून तार आली. *गांधींना "पुन्हा या " असा निरोप आला.* हिंदी लोकांची स्थिती अधिकाधिक दोनवाणी होत चालली आहे. या परिस्थितीत गांधीजी आपलाच आसरा आहे. " आता कुठे भारतात गांधीजी स्थिरस्थावर होऊ पहात होते, काँग्रेसमध्येही कामाला वाव होता. ... पण हा निरोप ! म गांधीजी वचनाला जागणारे.. "हाक मारताच तुम्ही आले पाहिजे.. " हे शब्द ते कसे विसरणार ? वचनाप्रमाणे गांधीजी पुन्हा द आफ्रिकेत जाण्यास तयार झाले. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

गोखले आणि गांधी

*गोखले आणि गांधी* ना गोखले आणि गांधीजींच्यात जीव्हाळा उत्पन्न झाला. *गोखले यांचे भेटीवेळी मला शुद्ध गंगोदकात डुंबत आहे असे मला वाटते.* असे गांधी म्हणत. गोखलेंनाही गांधीचे बद्दल आदर वाटू लागला. गोखलेंच्या सहवासात गांधी त्यांची छोटे - मोठी कामे निष्ठेने करून देत. ' त्यांचे कपड्यांना इस्त्री करुन देणे, घर आवरणे, त्यांना आवश्यक वस्तू ठेवणे ही कामे गांधी प्रेमाने करीत. ना गोखले गांधीजींना म्हणाले *' मुंबईस रहा . येथे न्यायालय आहे.तुम्हास बॅरीस्टर म्हणून जम बसवितायेईल.उत्तम प्रॅक्टीस होईल. आणि माझे सार्वजनिक कार्यक्रमात, सेवेत तुमची मदत होईल.** गांधीजींनींही मुंबईला राहण्याचे ठरविले. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

नेत्यांच्या भेटी

*नेत्यांच्या भेटी* गांधीजींना नामदार गोखले यांचेविषयी अत्यंत आदर वाटू लागला होता. त्यांनी आधिवेशनात ना गोखल्यांची भेट घेतली. त्याचवेळी ते फिरोजशहा मेथा यांनाही भेटले " गांधी आपण सभेत बोलणार आहात तर आधी लिहून काढा व मला दाखवा " _ अशी सूचना म.गांधींना त्यांनी दिली. गांधीनी त्यांची सूचना शब्दशा पाळली. आधिवेशनात गांधी लो टिळकांनाही भेटले _ टिळक व मेथा दोघांचे व्यक्तीमत्वाविषयी गांधींना आदर होता. आणि *गोखले यांचेबरोबर भेटताना गांधींना खूप मोकळेपणा वाटला, आदर वाटला आणि प्रेमही* *दोघांत पुढे नात्यांची एक वीण बांधली गेली.* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

हिंदुस्थानात पहिलं पाऊल

हिंदुस्थानात पहिले पाऊलं आफ्रिकेस प्रेमळ निरोप देऊन गांधीजी हिंदुस्थानात माघारी आले. ... त्या वेळी कॉग्रेसची वार्षिक सभा कलकत्त्यास भरणार होती. गांधीजी लगोलग सभेच्या ठिकाणी. स्वयंसेवक, सफाई सेवक यांना त्यांनी मदत करावयास सुरुवात केली. झाडूकाम, शौचालय स्वच्छतेचे काम यात ते पारंगत होते. स्वयंसेवकात ते मिसळून गेले. अधिवेशनाच्या कामातही त्यांनी सहभाग घेतला. तात्कालीन नेत्यांची भेटही घेतली. नामदार गोखलेंचे बरोबर चर्चा केली. अधिवेशनात द आफ्रिकेतील परिस्थितीसंबंधी चर्चा करून त्यासंबंधी एक ठरावही त्यांनी मांडला. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

गांधीजी आणि तुकाराम Gandhi & Tukaram

*गांधीजी आणि संत तुकाराम* 1930 ला येरवडा कारागृहात असताना गांधीजींनी  तुकाराम महाराजांच्या 16 अभंगांच इंग्रजीत भाषांतर केलं होतं..त्यामध्ये " जे का रंजले गांजले " यांसारख्या अभंगाचा समावेश होता.संत तुकाराम महाराजांच्या अभगांचं त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे ,असे ते वारंवार नमूद करत असत. डॉ.इंदूभूषण भिंगारे व कृष्णरावदेशमुख यांनी संततुकारामांची राष्ट्रगाथा’ हे पुस्तक 1945 साली प्रकाशित केल होत.  त्या पुस्तकाची प्रस्तावना महात्मा गांधीजींनी लिहिली होती ..त्यामध्ये ते लिहितात कि, *"तुकाराम मुझे बहुत प्रिय है."*  एवढंच नव्हे तर नंदलाल बोस या शांतिनिकेतन मधल्या प्रसिद्ध चित्रकाराकडून त्यानी तुकारामांचं चित्र काढून घेऊन ते त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी पाठवलं होत... संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा  विषयच एवढा अफाट आणि खोल आहे की जीवनाच कोणतेही क्षेत्र त्यापासून वंचित राहत नाही..अगदी सामान्य व्यक्तीपासून ते अतिसामान्य व्यक्तीच्या मुखामध्ये संत  तुकारामांचे अभंग सहज खेळतात..बाकी मग संत तुकाराम महाराज म्हणतातच,  मना वाटे तैसी बोलिलो वचने..।नाही मनी लाज ध...

उपभोगशून्य नेता

*उपभोगशून्य नेता*            यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍁🍀🍁🍀🍁🍀 गांधीजींनी सर्व मौल्यवान भेटी किंचीतही मन न दाखवता माघारी दिल्या. सर्व सभा स्तिमीत ! पतीच्या या कृतीवर कस्तुरबा जरा नाराजच होत्या. *लोकांनी आपुलकीने दिलेल्या भेटी. त्या स्वीकारण्यास काय अडचण?प्रेमाची साठवण ती आपल्या सोबत नको का घ्यायला?* स्त्री सुलभ भावनाचं त्या , त्यांना आवर कसा घालायचा ?.. त्याला दिशा कशी दयायची ? पंरतु कस्तुरबां पुढे समजून गेल्या की गांधीजींनी केले तेच योग्य ! गांधीजी लिहतात - *" सार्वजनिक कार्यकर्त्यांने देणग्यांचा स्वतःसाठी कधी वापर ,करु नये, स्वार्थासाठी सामाजिक संपत्ती वापरु नये. माझे हे ठाम मत आहे. अनुभवाने ते दृढतर झाले आहे. "* गांधीजींनी ही उक्ती आयुष्यभर कृतीत आणली . म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

गांधी - अनमोल भेट Gift

*अनमोल भेट*              यमाई औंध,राजेंद्र गुरव 🍁🍁🍁🍁🍁🍁  बोअर वॉर संपल्यावर गांधीना भारतात जावे असे वाटू लागले. मित्रांना, अनुयायांना त्यांनी आपला मनोदय कळविला.  गांधी माघारी जाणार म्हटलेवर त्यांना वाईट वाटले... काहींना गहिवरून आले. "पुन्हा आमच्यावर संकट आली तर ? " . "... हाक मारताच तुम्ही आले पाहिजे " - काहींनी गांधींना आर्ततेने हाक दिली. गांधीनीं त्यांचे हात हातात घेऊन त्यांना अश्वस्थ केले.  " येईन " - गांधीनीं त्यांना शद्ब दिला. गांधीजींना प्रेमळ, भावपूर्ण निरोप देण्यात आला.लोकांची गर्दी झाली होती - तशी भेट वस्तूचीं पण ! उंची वस्त्रे, सोन्या - चांदीच्या, भारी किंमतीच्या... हिऱ्या माणकांच्या सुंदर वस्तू, शोभेच्या वस्तू किती भेटवस्तू.... कितीप्रेम ! गांधीजींचे ह्रदय कृतज्ञतेने भरून आले. त्यांनी त्या अनमोल भेटीकडे पाहीले.. ते सद्गगदित होऊन म्हणाले...'' मी या वस्तू तुम्हांला परत देतो.या वस्तू म्हणजे तुमची ठेव. येथीलं जनतेच्या कामासाठी यांचा उपयोग करा.! " _ *सारं वातावरण भारून गेलेलं... महात्माजींच्या अनमोल भेटीस कोंद...

गांधी _ सेवाभाव

👁🌴👁 *सेवाभाव* आश्रमात असताना म गांधीजीं अनुयायी, आश्रमवासी यांची सेवा करीत. आजारीजणांची शुश्रूषा करीत. गांधी आफ्रिकेत असताना गोऱ्या गोऱ्यांत लढाई झाली. त्या युद्धाला बोअर वॉर म्हणतात. जे लोक ब्रिटिश अंमलाखाली राहू इच्छीत नव्हते _ त्यांनी युद्ध पुकारले.                गांधीजींनी जखमी शिपायांचे शुश्रुषेसाठी हिंदी लोकांचे शुश्रुषापथक स्थापले. *हिंदी लोकही निर्भय असतात, मरणाला ते भित नाहीत, प्रसंगी ते स्वतःचा जीवही धोक्यात घालण्यास मागेपुढे पहात नाही. हे गांधींना दाखवायचे होते. '* हिंदी लोकांचे काम अपूर्व झाले ! प्रत्यक्ष रणांगणांवर त्यांना जावे लागे. जखमी सेनापतीसही उचलून आणण्याचा मान हिंदी पथकास मिळाला. युद्ध थांबले, पथकांचे कामही! हिंदी लोकांच्या सन्मानात मात्र भर पडली. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Kasturba

👁🌴👁 *सहचारीनी कस्तुरबा*                 यमाई औंध,राजेंद्र गुरव गांधीजीची लोकप्रियता वाढत गेली, कार्य सर्वदूर पसरले. अनेक मित्र - माणसे जोडली गेली. त्यामुळे गांधीचे घरी अनेकांचा राबता... अनेकजण मुक्कामालाही ! ....कधीकधी कामाचे व्यापामुळे कारकूनही मुक्कामी राहत. हे सारे गांधींचे कुटूंबीयच होऊन राहीलेले. या सर्वांची उठबस कस्तुरबा करीत. कोणाचे काम राहिले तर साध्वी कस्तुरबा  करीत ! कधी-मधी गांधीजी - कस्तुरबा यांचेत मतभेदही होत. परंतु कस्तुरबांचा स्वभाव सोशीक ! गांधीजी लिहतात, *"आमच्या भांडणांत तीच सहनशीलतेत अधिक ठरे "* असे झगडे पुढे राहिले नाहीत. कस्तुरबा महात्माजींच्या निरनिराळ्या कामात, विचारात सामील झाल्या... जणू त्याचे जीवनज्योती गांधीमार्गावर प्रकाश ण्यासाठीचं उरल्या ! म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

मरण सोहळा The death anniversary

👁🌴👁 *मरणाचा सोहळा व्हावा !* यमाई औंध, राजेंद्र गुरव  रौलेट कायदयाविरुद्धची धामधूम चालूच होती. म गांधीचे देशभर दौरे चालू होते. मध्येच विश्रांतीसाठी ते आश्रमात थांबलेले... विश्रांतीचे काळात गांधीजींचा वाढदिवस होता. आश्रमातील लोकांनी लहानसा आनंद सोहळा साजरा करण्याचे योजले. आश्रम सजवला गेला. सर्वत्र फुलांच्या माळा,तोरणे लावण्यात आली. समारंभाची वेळ झाली. सर्वजण महात्माजींना सन्मानाने कार्यक्रमस्थळी घेऊन आले. उत्साहाचे वातावरण सर्वत्र. कार्यक्रमात महात्माजी बोलू लागले - "  आज मी पन्नाशी ओलांडली.आपण आनंद साजरा केलात. आपण आनंदात माळा, हार इ आणलेत. या हार - माळा यांची मला गोडी नाही. पण आपण सर्वांनी जे केले त्यामागची भावना मी जाणू शकतो. झाले ते बरेच झाले पण मला एक सांगायचे आहे *आपण माझा वाढदिवस जेवढया आनंदाने साजरा केलात, तेवढा माझा मृत्यूदिनही साजरा करा.*  माझ्या आयुष्यासाठी आज ज्याप्रमाणे प्रभूचे आभार मानीत आहात, त्याप्रमाणे त्या प्रभूने मला नेलं तर त्यावेळीही त्याचे आभार माना. जीवन आणि मरण या दोन्ही परमेश्वराच्या मंगल देणग्या. . त्यामुळे मरणांवेळी उगाच रडत बसू नक...

Gandhi _maharashtra times

*दै.महाराष्ट्र टाईम्स-नागपूर आवृत्तीचे संपादक,जेष्ठ व्यासंगी पत्रकार श्रीपाद  अपराजित यांचा " अपूर्ण   अस्तित्वाचे दुःख ! " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला.      "परिवर्तन घडवितानाही वर्तनातील घसरण टाळणारे,ब्रिटिशांना देशाबाहेर घालवितानाही कटुता प्रतिबिंबित होऊ नये यांची काळजी घेणारे, आपल्या प्रार्थना कक्षेत दूराग्रहींनाही प्रवेश देणारे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या वर्तनातून आदर्श वस्तुपाठ घालून दिला हे केवळ देशपातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर सर्वश्रृत असताना, राष्ट्रपित्याच्या स्मृतिदिनी त्यांच्या गतप्राण  सावलीचेही भय वाटणार्‍या, कटरवाद्यांनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून 'रक्त' सांडविण्याची  मानसिक क्रौर्याची  परिसीमा गाठणारी विकृती या देशात अद्यापही जीवंत आहे यांचे दर्शन घडवावे या सारखी या देशातील दुर्देवी शोकांतिका नसावी " असे लेखात नमूद करून, या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण भाष्य करणार्‍या या लेखाचा गोषवारा असा :—*              महात्मा गांधी या देशाचे नेते जसे आहेत तस...

म गांधी व भारतीय स्त्री , Indian lady & Gandhi

👩‍⚖ *भारतीय स्त्री आणि म गांधी* आज ८मार्च जागतिक महिला दिन. स्त्री उन्नयनांचे राजमार्ग कालपरत्वे प्रशस्त होवोत ही मनोकामना ठेवून अनेक हात कार्यरत आहेत. स्त्रीदास्यविमोचनाच्या क्षेत्राने गांधीजींनी जे कार्य केले आहे,ते आधुनिक भारताच्या पायाभरणीत एक महद् वरदानच ठरले आहे. ' म गांधीच्या पूर्वीही सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियां नव्हत्या असे नाही पण त्यांचे प्रमाण नगण्य, संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी ! म गांधीच्या आंदोलनात स्त्री शक्तीचा एक प्रवाह आपल्याला दिसून येतो. सामान्य भारतीय स्त्री 'चूल आणि मूल ' या चक्रात अडकलेली. चार भिंतीच्या पलीकडेच जग तिला पारखे ! तिचा श्वास जणू घरातच अडखळलेला.... गांधीजींनी स्त्रीची सुप्त शक्ती ओळखली ! रुढी - परंपरेच्या वरंवट्याखाली स्त्री पिचून गेली होती. ,,,,,पण ही स्त्री शक्ती समाजसेवेच्या क्षेत्रात वापरली गेली तर...? गांधीनी स्त्रींवर्गाला समाजक्षेत्रात यावयाचे आवाहन केले . म गांधी सारख्या ऋषी तुल्य व्यक्तीमत्वाचे आवाहनास स्त्रीयांनी जो प्रतीसाद दिला तो अभूतपूर्व होता. म गांधी यांनी स्त्रीच्या पूर्ण स्वातंत्र्यांच...

नांदी The beginning

*नांदी* द आफ्रिकेत म गांधी यांचेवर जबरी हल्ला झाला. प्राणावर बेतणारा हल्ला... पण गांधीनी हल्लेखोरांना माफी दिली. हिंदुस्थानात गांधींनी जीं पत्रके प्रसिद्ध केली होती, त्यांच्या नकला गांधीजवळ होत्या. मुलाखत घेण्यात आलेल्या बातमीदारांना त्यांनी त्या नकला दाखविल्या. हिंदुस्थानात गांधींनी काय सांगीतले हे सर्वांना कळले. गैरसमजाचे मळभ दूर झाले. दर्बानकर युरोपीनास स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली. गांधी सत्यभक्त आहेत, सरळ आहेत.. आहेत निर्दोष हे सर्वांना पटले ! गुंडांच्या अत्याचाराचा निषेध होऊ लागला. *गांधीजींचे अहिंसेचे शस्त्राची ही पहिली सत्वपरीक्षा होती. अशा प्रकारे स्वतः हालअपेष्टा साहणे व विरोधकांना प्रेमाने जिंकणे.या  रीतीने तयार होणारा सत्याग्रहाचा हा प्रयोगसिद्ध मार्ग गांधीना मिळाला* *इतिहासातील भावी सत्याग्रहाच्या प्रयोगांची ही नांदी होती*. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

क्षमा sorry

*क्षमा* गांधीजी गुंडांना ओळखू शकत होते. पण ते क्षमाशील होते. " कोणावरही खटला चालविण्याची माझी इच्छा नाही, त्यांचा काय दोष ? बातम्यांवर त्यांनी विश्वास ठेवला. पुढाऱ्यांनी त्यांना खरे सांगीतले नाही. युरोपियांना मी बदनाम करतो असे त्यांना वाटले .केला त्यांना हल्ला .. फिर्याद करून काय होणार ? माझ्यावर हल्ला करणाऱ्यास सत्य कळल्यावर पश्चाताप होईलच ! " " तुम्ही असे लिहून दया म्हणजे वसाहत मंत्र्यांना कळवू .तुमच्या या वर्तनाने येथील वातावरण लवकर शांत होईल. मी आपला आभारी आहे. " गांधीजींनी तसे लिहून दिले. त्या क्षमेचा जादूसारखा परिणाम झाला. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

बिकटवाट २, harder way 3

*बिकटवाट - २*              यमाई औंध, राजेंद्र गुरव गांधीना रुस्तुमशेठजींच्या घरी पोहचविले.पण घराला गुंडांनी  गराडा दिला. ते का घर पेटवणार होते? मोठा बाका प्रसंग पोलीस अंमलदाराने गांधीजींस वेष बदलून दुसऱ्या एका मागील दाराने निघून जायला सांगितले आणि स्वतः बाहेर गुंडांना गुंगूवून ठेविले. ' चला फाशीला - लटकवू गांधीला ' असे .तो गाणे म्हणू लागला. त्याचे मागे गुंडही गाणे म्हणू लागले. गांधीजी सुखरूप निघून गेल्यावर अंमलदार गुंडांना म्हणाला, " या घरात गांधी नाहीत. शोधा त्यांना, त्यांनी दिला का गुंगारा कि गेले गांधी पळून " "आम्हांला घरात पाहू दे " - गुंड गर्जले. " बघा, एकजणाने आत जाऊन पाहून यावे " गुंडाचा एक प्रतिनिधी आत गेला. त्यांने शोधले पण गांधीजी दिसले नाहीत. पोलीस अंमलदाराची हुशारी पाहून गुंड चकीत झाले. शेवटी हसू लागले आणि ' झाडावर लटकवू गांधीला , फाशीला लटकवू गांधीला ' असे गात गुंड घरी निघून गेले. ही हकिकत वर्तमानपत्रात _ . इंग्लडमधील वसाहत मंत्र्याकडून तारेने संदेश आला की हल्लेखोरांवर खटला भरा. दर्बानचा अधिकारी गांधीकडे आला व म्हणा...

सत्याची वाट बिकट The harder way of truth

*सत्याची वाट बिकट !*             यमाई औंध, राजेंद्र गुरव   गांधीजी आफ्रिकेत आणि कुटूंब हिंदुस्थानात... पत्नी व मुले यांना घेऊन जाण्यासाठी महात्मा भारतात आले. १८९६ मध्ये आले होते ६ माहिन्यांसाठी , पंरतु ६ महिनेच्या अगोदरच ' निघून या ' अशी तार आली. दादा अब्दुला शेठ यांनी निरोप दिला 'मी बोट विकत घेतली आहे, त्यातूनच या !' *पुनः आफ्रिका* गांधीजी निघाले .सोबत दुसरी बोट हिंदी लोकांची . जवळपास ८०० उतारू होते. बोट दर्बनकडे . वाटेत प्रचंड वादळे ! सर्वजन देवाची प्रार्थना करीत. जातधर्म विसरून सर्व एक झाले. समुद्र शांत_ प्रवास सुखरूप             गांधी परतत आहेत. गोऱ्यांना समजले- चिडले. द आफ्रिकेत खोटया बातम्याना ऊत - गांधीजींनी हिंदुस्थात आफ्रिकेतील गोऱ्यांची पत्रकाद्वारे नालस्ती केली. ' कशाला येतो हा गांधी ? आमचे नाव जगात बदनाम करणारा. आता बायका पोर- ८०० कुली. हा लोकांना चिथावतो. याला उतरू दयायच नाही'.- गोरे गडबड करू लागले. वातावरण तापले. *' सरकारने मनाई करावी नाहीतर आम्ही गांधीला समुद्रात फेकू* ' गुंडाची  ओरड *समुद्रा...

म गांधी पुन्हा २, Gandhi again and again 2

*म. गांधी... पुन्हा,पुन्हा !*                यमाई औंध, राजेंद्र गुरव     गेली महिनाभर आपण  म गांधीचे कर्तृत्व स्मरतोयं ! गांधीचे कर्तृत्व आभाळभर... अनं त्यालाही अनेक पदर.. कितीतरी आयाम ! गांधीनी आपल्या कार्यशैलीने काँग्रेस देशव्यापी केली. त्यातून सर्वसामान्यांची नेतृत्व पुढं आली.... आणि मग पिढयान पिढया प्रस्थापित सनातन्यांचा जळफळाट झाला ! काँग्रेस व म गांधीना संपविण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले . स्वातंत्र्य चळवळीत अजीबात सहभाग नसलेल्या संघटनेनी म गांधीची यथेच्छ टवाळी करून घेतली आहे. गोबेल्स नितीचा बेमालूम वापर करून गांधीच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम राबवू पाहीला. आहे. राजकारण ,समाजकारण,क्रियाशील आध्यात्म , शैक्षणिक तत्वज्ञान, पत्रकारीता, महिला व खेडयांचे सबलीकरण, सक्षम मनाची घडण, .. .. विविध क्षेत्रातील विविधांगी योगदानाने गांधीची एक अमिट निशाणी भारतवर्षावर आहे. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी लोक, अभ्यासू - चिकित्सक लोक गांधीना मानतात पण वर्षानुवर्ष पिचलेल्या समाजास धर्माच्या वेसणी लाऊन जे आपला कार्यभाग साधून घेत होते, त्या...

गांधी व फाळणी Gandhi and divisied India

*फाळणीला गांधी जबाबदार होते का? गांधीजींनी मुस्लिमांचे लांगुलचालन करून हिंदूंच्या हिताशी तडजोड केली होती काय?* या प्रश्नाचा अस्सल ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे घेतलेला वेध! फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींनी तयार केलेला तडजोडीचा हाच तो मसुदा जो काँग्रेस श्रेष्ठींपैकी कोणीही मान्य केला नाही आणि त्यामुळे गांधीजींनी वाटाघाटीतून अंग काढून घेतले. ---------------- २६९. तडजोडीच्या सुत्राचा मसुदा (गांधीजींनी यावर आपल्या हस्ताक्षरात “गांधीचा मसुदा” असे लिहिले आहे.) [एप्रिल १०, १९४७] (लॉर्ड माऊंटबॅटन यांना एप्रिल ११, १९४७ला पाठवलेल्या पत्रानुसार गांधीजींनी या मसुद्याची कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांशी आदल्या दिवशी रात्री चर्चा केली होती. पाहा लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र एप्रिल ११, १९४७)  १. जोपर्यंत पाकिस्तानचा प्रश्न आहे आणि काँग्रेसची गोष्ट आहे बळजबरीने काहीही दिले जाणार नाही. गोष्ट जर विवेकाला पटण्यासारखी, न्याय्य आणि तर्कशुद्ध असेल तरच मान्य केली जाईल. बळजबरीने काहीही घेतले जाणार नसल्यामुळे कोणत्याही प्रांताला वा त्याच्या भागाला पाकिस्तानमध्ये सामील न होण्याचा आणि इतर प्रांतांबरोबर...

Gandhi again and again, म गांधी पुन्हा पुन्हा

*म.गांधी .. पुन्हा अनुभवताना !* यमाई औंध, राजेंद्र गुरव 🇮🇳☘🌺🌿💫🦅  विविध राजेशाहीच्या अनं विशेषतः मराठी साम्राज्याच्या  पतनानंतर उभ्या राष्ट्राने गुलामीचे अंधारयुग पाहिले होते.  परकिय सत्तांची आपल्याला परंपरा आहेच . या सत्तांची दडपशाही आपण पिढयांन पिढया पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. परकीय अंमल पाचवीला पूजलेला !..  त्या गुलामगिरीविरुद्ध विविध प्रकारे दिलेला लढा हा आपल्या इतिहासाचा भाग होऊन राहिला आहे.  अशाच काळाच्या एका तुकड्याने पिचलेल्या भारतीयांना निर्भयतेचा मंत्र दिला म.गांधींनी ! परकीयांच्या सत्ते विरूद्ध लढताना गांधीनी भारतीयांना निर्भयता दिली, सत्यशक्ती दिलेली, स्वतःहून काम करण्याचा आत्मविश्वास दिला आणि सदृढ नैतिक शक्तीही दिली . राष्ट्राला राष्ट्रपण देणाऱ्या गांधीजीच्या वैचारिक शक्तीमुळे, व्यवहारी अधिष्ठांनामुळे भारतातील विविध वैचारिक पंथ, लोक एकात्म झाले . त्या सर्वांचे नेतृत्व करून गांधीजींनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला,म्हणूनच महात्मांजींना राष्ट्रपिता  म्हणून यथार्थपणे गौरवितात ! हिंसाचाराचे थैमानाने ,विध्व...

गांधी - आफ्रिका सरकारशी तडजोड

*सरकारशी तडजोड* ☘🍀🍁🌸🌿 'आता स्वेच्छेने परवाने काढा पुढे आम्ही हा कायदा रद्द करू !' - सरकारची ही तडजोड सत्याग्रही या नात्याने मान्य केली. माघार घ्यायची - का नाही ? यावरून सत्याग्रहांच्यात मतभेद होते. गांधींनी केलेली जडतोड काहींना माघार वाटत होती. मीर आलम पठाण गांधीचा जुना पक्षकार. तो नेहमी गांधीजींचा सल्ला घ्यायचा. तडजोडीचे त्याला मान्य नव्हते . मग चळवळ का सुरू करायची -असे त्याला वाटले. सत्याग्रहांचे वतीने गांधीजी पहिला परवाना गांधीजी काढणार होते. गांधीजी निघाले. तेवढयात मीर आलम तेथे पोहचला. " कोठे चाललात ? " मीरचा प्रश्न " परवाना काढायला जातो. ठसे दयायला, मी दाही बोटांचे ठसे देणार आहे. तुम्ही दोन अंगठ्यांचे दिलेतरी बास. चला माझ्या बरोबर ! " गांधी एवढे बोलतात तेवढयात त्यांच्या डोक्यावर सोटा बसला.  ' हे राम ! ' - म्हणत गांधी जमिनीवर पडले, बेशुद्ध झाले. लाथा, बुक्काचे तडाखे चालूच होते. युरोपियन लोक धावले. मीर आलम व त्याचे साथीदार पळणार होते. तोच युरोपियन लोकांनी धरले. पोलीसही आले. गांधीजीचे मित्र श्री डोक नावाचे धर्मगुरू  तिकडे धावल...
शब्दाला जागणारा गांधीजींना जबरी दुखापत झाली होती. डोक यांचे घरीच त्यांची सुश्रुषा चालली होती. परवाने काढणारा अधिकारी त्यांचे तब्यतेची चौकशी करण्यासाठी आला. " मी परवाना काढायला आलो होतो, पण त्यावेळी हा प्रकार झाला. आता त्वरेने माझे ठसे घ्या ! अधिकारी त्यांना थांबवित म्हणाला " तुमची तब्येत अजुनही खराब आहे.  घाई कशाला करतायं ? " " लोकांना, माझे ऐकणाऱ्या अनुयायांना मी परवाने काढा असे सांगतो आहे. तर आधी मी तसे वागले पाहिजे " तो अधिकारी गहिवरला..  गांधीजीची अवस्था आणि त्याची सत्यवृत्ती पाहून त्याचे डोळे भरून आले. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

गांधी (होळी - सर्वस्वाची आणि परवाण्याची )

*होळी - सर्वस्वाची अनं परवान्यांची !* ☘🍀🌿🌸🍁 गांधीजींवरचा तो हल्ला जीवघेणाच होता. ओठ कापला गेला होता. गालातून रक्त येत होते. त्यांचे पुढचे तीन दात पडले होते. " झोपून रहा " विश्रांती घ्या " - डॉक्टरांचा सल्ला. परिस्थितीचे भान ठेवून गांधीजींनी एक पत्रक लिहून प्रसिद्ध केले *'माझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना माफ करा,त्यांना आपण काय करीत आहोत याचे भान नव्हते.'* हल्ला करणारे मुसलमान होते म्हणून हिंदूनी संतापू नये. सांडलेल्या रक्तामुळे हिंदू - मुसलमान एकत्र येवोत. कराराप्रमाणे ज्यांची इच्छा आहे,त्यांनी परवाने काढा. पुढे सरकार कायदा रद्द करेल. "  प्रेमळ लोक सेवेला, काही प्रार्थना म्हणत. त्यiचे प्रेमाने गांधी भारावून जात. कालांतराने गांधी ठीक होऊ लागले. सरकारने पुन्हा धोका दिला. कायदा रद्द केला नाही. गांधीनी सरकारला कळविले *दिलेल्या विहित वेळेत कायदा रद्द करा, नाहीतर साऱ्या परवान्यांची होळी करू.* सरकारचे उत्तर आले नाही. गांधीजींनी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस. लोक जमले. प्रचंड सभा भरली. *गांधीजी म्हणाले आता जरी सरकारचे उत्तर आले तरी सरकारचे अभ...

गांधी - टॉलस्टॉय फार्म - १

..*टॉलस्टॉय फार्म* 🌿🍁🌸🍀☘ 'ठं '- दलित कुदळीचा घाव घालतोय, तर मराठा नकळत ती माती पाठीत भरून बाहेर फेकतोय, . कुठं हिंदू श्रमदान करतोय तर थकला म्हणून त्याला कुठं मुस्लीम नकळत प्यायला ग्लासभर पाणी आणून देतोय, कुठं चांभार श्रमदानाठिकाणी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करतोय तर त्याला हातभार म्हणून लोहार नकळत स्वतःचे पैसे देतोय. . कुठं तृतीयपंथी सगळ्यांना वाटून चहा देतोय, तर कुठं अपंग कुदळ खोरे शेलवटायचं काम करतोय, . कुठं रंगाने काळा असणारा माती परिक्षणाची माती गोळा करतोय तर कुठं गोरा त्याच्या पोतेची नोंद ठेवतोय, . कुठं ब्राम्हण रोपवाटीका तयार करतोय तर कुठं, वारीक त्याला रोज पाणी घालतोय, *कालच पाणी फौंडेशनच्या अनुशंघाने वरील प्रकारच्या एकसंघ विचाराच्या गोष्टी घडत आहेत अशा आशयाची सचिन अतकरेंची पोस्ट आली होती* आणि एकदम आठवण झाली गांधीच्या टॉलस्टॉय फॉर्म... वरील गोष्टी जशाच्या तश्या ठिकाण मात्र दूर आफ्रिकेत.. कुठं गुजराती खोऱ्याने माती ओढतोय तर महाराष्ट्रीयन  स्वतः ती पाटीत भरून कडेला टाकतोय... कुठं आंध्री दळण दळतोयं, कुणी रानातनं फळं गोळा करतोय, कोणी रानातं ख...