शांतीनिकेतन

गुरुदेवांच्या शांतीनिकेतनमध्ये
🌸☘🍀🍁🌿🌸

ना गोखले यांनी म गांधींना सूचविले होते. ' आपण हिंदुस्थान फिरा.अभ्यासा. हिंदूस्थानला  जाणा. मग पुढे काय करायचे ते ठरवा. '

गांधींनी ना गोखल्यांचा निरोप घेतला व ते हिंदुस्थानचा अभ्यास करावयास निघाले.

गांधींनी प्रथमतः  शांतीनिकेतनला जायचे ठरविले होते, गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना भेटायचे होते.

गांधीजी शांतिनिकेतमध्ये पोहचले. सर्व शिक्षक विद्यार्थी त्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.
तेथील साधेपणा,निसर्गप्रेम, शिस्त, कलाप्रेम इ पाहून गांधी रमून गेले.

म गांधी  व गांधींजींची मंडळी यांची राहण्याची स्वतंत्र सोय केली होती. मगनलाल गांधी सर्वांची सोय तत्परतेने करीत होते. फिनिक्स आश्नमातील सर्व नियमांची सर्वांकडून ते अंमलबजावणी करुन घेत.

गांधी सर्वांत मिसळून गेले. विद्यार्थ्यांना एकत्र जमवून गप्पा मारु लागले. गोष्टी सांगू लागले.
विद्यार्थी सकाळ पासून काय करतात. मेहनत किती घेतात, त्यांचा आहार कसा, शिक्षण कसे असते.
गांधींनी हे सारे पाहिले अभ्यासले ! .

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०,  🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510