गांधी जवळूनी गोजिरे
*गांधी जवळूनी गोजिरे*
- राजेंद्र गुरव
🌸🍃🌺🍂☘🍃🌸
दुरुनी गांधी साजरे
जवळून अधिकच गोजिरे
गांधी म्हणजे साधा माणूस
अहंपणाचा नाही मागमूस
विचारांची आगळीच मूस
हरवृत्तीची प्रसवेल कूस
प्रफुल्लीत मने ,एक जन सारे
जवळूनी अधिकच गोजीरे १
गांधी म्हणजे निर्मळ हास्य
मानवी मनाचे सोडवी दास्य
गांधी म्हणजे कणखर बाणा
तिमीरावरती घन हाणा
उष:कालाचे दूत सर्वत्र पसरे
गांधी जवळूनी अधिक गोजिरे.
गांधी म्हणजे आपला माणूस
रक्ताचा ...हाडा मांसाचा
मातीच्या हर कणात
रुजून अवचित साचलेला.
जग हे कर्तृत्वाने भारणारे
गांधी जवळूनी अधिक गोजिरे
गांधी म्हणजे नैतिक शक्ती
सत्य निर्भयता विमुक्तभक्ती
प्रश्नाची व्यवहारी युक्ती
सामान्यांची आंतर्रिक शक्ती
विकसीत करी हर मन प्रेमभरे
गांधी जवळूनी अधिक गोजिरे
गांधींजीमुळे पुनीत परंपरेची पाऊले
गांधींच्या बोलण्यात वर्तमानाची चित्रे
गांधींच्या कृतीत भविष्याची स्वप्ने.
हर काळ सोबतीमुळे निखरे
गांधी जवळूनी अधिकच गोजिरे ॥
गांधी म्हणजे मानवतेचे गाणे
सदा सहज मंगल होऊन जाणे
सत्याने शिवमय होऊन राहणे
काळाच्या भाळावरती कर्तृत्वाचे देणे
साधेपणाला निर्मितीचे धुमारे
गांधी जवळूनी अधिकच गोजीरे
म गांधी १५० वी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
- राजेंद्र गुरव
🌸🍃🌺🍂☘🍃🌸
दुरुनी गांधी साजरे
जवळून अधिकच गोजिरे
गांधी म्हणजे साधा माणूस
अहंपणाचा नाही मागमूस
विचारांची आगळीच मूस
हरवृत्तीची प्रसवेल कूस
प्रफुल्लीत मने ,एक जन सारे
जवळूनी अधिकच गोजीरे १
गांधी म्हणजे निर्मळ हास्य
मानवी मनाचे सोडवी दास्य
गांधी म्हणजे कणखर बाणा
तिमीरावरती घन हाणा
उष:कालाचे दूत सर्वत्र पसरे
गांधी जवळूनी अधिक गोजिरे.
गांधी म्हणजे आपला माणूस
रक्ताचा ...हाडा मांसाचा
मातीच्या हर कणात
रुजून अवचित साचलेला.
जग हे कर्तृत्वाने भारणारे
गांधी जवळूनी अधिक गोजिरे
गांधी म्हणजे नैतिक शक्ती
सत्य निर्भयता विमुक्तभक्ती
प्रश्नाची व्यवहारी युक्ती
सामान्यांची आंतर्रिक शक्ती
विकसीत करी हर मन प्रेमभरे
गांधी जवळूनी अधिक गोजिरे
गांधींजीमुळे पुनीत परंपरेची पाऊले
गांधींच्या बोलण्यात वर्तमानाची चित्रे
गांधींच्या कृतीत भविष्याची स्वप्ने.
हर काळ सोबतीमुळे निखरे
गांधी जवळूनी अधिकच गोजिरे ॥
गांधी म्हणजे मानवतेचे गाणे
सदा सहज मंगल होऊन जाणे
सत्याने शिवमय होऊन राहणे
काळाच्या भाळावरती कर्तृत्वाचे देणे
साधेपणाला निर्मितीचे धुमारे
गांधी जवळूनी अधिकच गोजीरे
म गांधी १५० वी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment