आणखी एक संघर्ष

आणखी एक संघर्ष
🌸🍁🍀☘🌿🌱🌸
चंपारण्यातील कमेटीचकाम आटोपत आलं होत,इतर कामांचा व्याप मात्र बराच वाढला होता.शाळा,गावसफाई,हिंदीप्रचार,गोशाळा !

 एवढयात म गांधींना आणखी एक निरोप आला.
निरोप खेडा जिल्हातील शेतकऱ्यांचा, शेतीचे नुकसान व सारामाफी याबाबत होता.
पत्राने निरोप होता. *आपण हा प्रश्न हाताळावा.लोकांचे नेतृत्व स्वीकारणेबाबत आग्रह ही होता.*
*दुसरे एक पत्र होते अहमदाबाद बाबत , मजूरांचे तुंटपुंजे पगार,पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न*
या दोन्ही बाबतीत गांधींचा सल्ला ,पीडीतांना हवा होता. त्यांचे नेतृत्व हवे होते.
प्रत्यक्ष ठिकाणावर येईन.प्रश्न अभ्यासेन, तपास होऊन मग पुढे काय करायचे ,हे ठरविण्यात येईल.असे गांधींजींनी कळविले.

चंपारण्यातील कामाचा व्याप वाढीन होता. मधेच एका कामानिमित्त गांधी अहमदाबादला पोहचले. तिथेही कामाचा पसारा. एकामागे एक कामे.

त्याचत अहमदाबादमध्ये खेडाच्या प्रश्नांवरुन कामासंबंधी सल्लामसलती सुरु झाल्या. आणि मजुरासंबंधीही लोक गांधीकडे येऊ लागले.

गांधींनी मजूरांचे प्रश्नी लक्ष घातले.काही गिरणी मालक गांधींचे स्नेही होते, काही परिचीत. त्यांचे बरोबरच संघर्ष करायचा म्हणजे....
गांधींनी त्यांचेबरोबर बोलणी केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न सोडविण्यासाठी पंच नेमण्याचा सल्ला दिला.
*आपल्या मध्ये व मजुरामध्ये पंचानी मध्यस्ती करावी.हे मालकांना रुचेना,पटेना.* त्यांनी मध्यस्तीस नकार दिला.

सर्व प्रयत्न करून , शेवटी गांधींनी मजुरांची सभा बोलावली. त्यांना परिस्थिती समजून सांगीतली व सल्ला दिला.
**मजुरहो,आपण मालकांविरुद्ध,आपल्या हक्कांसाठी संप पुकारा.*

म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510