गांधी: नेते एकत्रीकरण

नेत्यांचे एकत्रीत काम आणि नेतृत्वाचा परिणाम
🌸🍃☘🍂🌺🍃🌸

गांधीप्रणीत असहकार चळवळीला मोतीलाल नेहरू ,चित्तरंजन दास लाला लजपतराय, मोहम्मद अली जिना इत्यादींनी विरोध केला होता.

कालांतराने मात्र गांधींचे एकूण  परिणामकारक नियोजनावर विचार होऊन मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय, देशबंधू दास इत्यादी गांधींचे समर्थन करण्यासाठी  पुढे  आले.
 नेते आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत होते  स्वतःच्या अपेक्षापेक्षा देशाच्या आकांक्षा त्यांना महत्त्वाचे होत्या.
 गांधीजींच्या अभिनव कार्यक्रमाचा प्रभाव तरुण क्रांतिकारकांवरी  पडला होता. महाराष्ट्रातील क्रांतिकारक सेनापती बापट ,बंगालमधील सूर्यसेन, व्ही .व्ही.एस.अय्यर इत्यादी क्रांतिकारी विचारांनी काम करणारी मंडळी गांधीजींच्या पाठीमागे उभी राहिली. ही मंडळी गांधीजींच्या असहकार चळवळीत स्वतःहून सामील झाली. या अभूतपूर्ण प्रयोगाला त्यांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळाला.
*मोतीलाल नेहरू, वल्लभभाई पटेल' चितरंजन दास 'सुभाषचन्द्र बोस ,जवाहरलाल नेहरू*  यासारख्या अनेक प्रभावी नेत्यांचे नेतृत्व या चळवळीला लाभले .या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने ही चळवळ देशभर पसरली.
 देशासाठी सर्वस्व वाहणारी तरूणपिढी या कार्यक्रमात तयार झाली तरुण नेतृत्वाच्या प्रचंड त्यागामुळे जनतेला फार मोठी प्रेरणा मिळाली आणि हजारो तरुण कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रकार्यासाठी एकत्र आले. या चळवळीतील सर्वसामान्यांचा सहभाग नेत्यांच्या कल्पनेच्या बाहेर होता आणि ब्रिटीश सरकारला एक मोठी जरब निर्माण करणारा होता.

 या चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य ही चळवळ देशभर फार कमी वेळात फोफावत गेली .पुरुषांच्या बरोबर स्त्रियाही या चळवळीत ठामपणे उभ्या राहिल्या गोरगरीब दीनदलित देशासाठी वाटेल तो त्याग करायला तयार झाले.
ब्रिटीश सरकारला या बदलाची नोंद घ्यावी लागली.

म गांधी १५० जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510