गांधी: नेत्यांची उंची
*नेत्याची उंची त्याचे नियोजनात दिसते , त्यांच्या कार्यनितीत दिसते...*
*तरुणांनों, कार्यकर्त्यांनों गांधींना त्या दृष्टीने अभ्यासा !*
🌸🍃☘🍂🌺🍃🌸
1 ऑगस्ट 1920 गांधीजींनी असहकार आंदोलनाची हाक दिली होती. त्या दिवशीच लोकमान्य टिळक कालवश झाले.
आता गांधींजींची जबाबदारी आणखीच वाढली.
काळाचा प्रवाहात गांधीजींच्या नेतृत्वाखाली या नव्या भारताच्या जडणघडणीचा उष:काल होत होता. गांधीजीनी असहकाराचा कार्यक्रम तमाम जनतेला दिला होता.
गांधींच्या असहकारकार्यक्रमामध्ये दोन बाजू होत्या. एक बाजू होती विधायक स्वरुपाची तर दुसरी होती सरकारविरुद्ध बंडाची सरकारचे दृष्टीने विघातक, नकारात्मक परिणाम देणारी.
गांधींनी जे असहकाराचे नियोजन मांडले होते. *त्यामध्ये स्वदेशी चळवळीला गती देणे. हातमाग ,छोटया उदयोगांना चालना देणे. मद्यपान निषेध करणे. जातिप्रथेचे निर्मूलन करणे. हिंदू-मुस्लीम ऐक्य साधणे. लोकांच्या छोटयामोठया वादांच्या निपटाऱ्यासाठी ग्रामीण,स्थानिक भागात लवाद नेमणे. लो टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ १ कोटी स्वराज्य फंड गोळा करणे. लोकांना चरख्याचे शिक्षण देणे. त्यांनी स्वतः कातलेल्या सुतांचे कपडे वापरण्यास त्यांना प्रवृत्त करणे* .. इ...इ...
म गांधींनी दिलेले हे मुद्दे अभ्यासले तरी गांधींचे सूक्ष्म नियोजनाचा आणि एखादी चळवळीप्रती असलेला त्यांचा दृष्टीकोन दिसतो.
.. उगाच वितंडवाद केलायं, लोक नुसतेच पेटवलेत असं यात नाही.
... गांधींजीं पुढे सर्वसामान्य माणूस उभा आहे. प्रत्येकात श्रमनिष्ठा बानवायची. प्राचिन भारतातील स्वयंपूर्ण खेडी संकल्पना रूजवायची आहे. गावागावात असलेली एकी ठळक करायची आहे. स्वदेशीबद्दल जागृती आणि प्रेम निर्मायचे आहे. लो टिळकांसारख्या बुजुर्गाबद्दलही गांधींना आदर आहेच.त्यांचे स्मृतीत फंड उभारयचा आहे. मद्यपानांमुळे कुटुंब आणि समाज स्वास्थ बिघडते ,याकडेही सामान्यांचे लक्ष वेधायचे आहे. हिंदू धर्माची जी किड ती जातप्रथा... तिचा प्रभाव कमी करायचा आहे. आपआपसातील वाद आपणच निमवायचे. त्यांत शक्ती खर्च नको, ब्रिटीशांचा हस्तक्षेप नको _ कशाला आयते कोलीत त्यांजकडे,असा विचार आहे. ! .
. *सध्याच्या मौहल्ला कमेटी वा म गांधी तंटामुक्त गाव योजना या गांधींच्या त्या विचांरांचीच अपत्य असावीत*.*
सर्व बाजूंनी चिंतामुक्त, स्वयंपूर्ण माणूस गांधींना निर्माण करायचा होता.
त्याची भांडणात ताकद जात नाही.,दारुत आयुष्य वाहत नाही. जो छोटेमोठे काम करून आपले पायावर उभा आहे. त्यांचे कुटूंब आर्थिकदृष्टा सक्षम आहे. असे प्रत्येक गाव बनावे असे गांधींना वाटे.
खेडी स्वयंपूर्ण बनतील, माणसे आत्मनिर्भय बनतील. स्वतःचाच कच्चा माल मग परकीय मालाकडे दूर्लक्ष, त्याची आयात आपोआपच कमी होईल. भारताचा पैसा देशाबाहेर जाणे थांबेल. ( स्वदेशीचा नारा अजुनही ऐकू येतो, अधीमधी.. )
नैतिक, आत्मिक बळ वाढलेला व्यक्ती मग सरकारी धोरणाचा विचार करेल. सरकारला सक्षमपणे विरोध करेल असा कदाचित गांधीविचार असेल.
चळवळीतील माणसांच्या पोटापाण्याचा त्याचे कुटुंबस्वास्थाचा विचार नेत्यांनी केला पाहिजे हा मंत्र, महामंत्र गांधींनी दिला आहे, असे मला वाटते.
*येथे कार्यक्रत्याची कार्यशक्ती फक्त संघर्षकामी वापरायची अशी दिशा नाही. तर तो कार्यकर्ता ,कार्य करण्यास सक्षम बनवा ही दिशा आहे.त्याप्रमाणे कार्य आहे.*
त्यावेळी भारताची दशा , इंग्रजांनी भारतीय ग्राम पद्धतीवर घातलेले घाले.. लोकांत राजकीय आकांक्षा सोडा, राजकीय ज्ञानाचा असलेला अभाव. ... आणि बलाढय इंग्रजांविरुद्ध त्यांना उभे करायचे आहे !
*गांधींजींचा अभ्यास आणि कार्यनिती दोन्ही त्यांचे कार्यक्रमातून स्पष्ट होते. लोकांना सर्व बाजूंनी सक्षम करा,ज्ञान दया,निर्भयता दया आणि मग संघर्षास उभे करा.*********

*येथे कार्यकर्त्यांची कार्यशक्ती फक्त संघर्षकामी वापरायची अशी दिशा नाही. तर तो कार्यकर्ता ,कार्य करण्यास सक्षम बनवा.घर समाज चालविण्यास कर्ता बनावा ही दिशा आहे.त्याप्रमाणे कार्य आहे.*
त्यावेळी भारताची दशा , इंग्रजांनी भारतीय ग्राम पद्धतीवर घातलेले घाले.. लोकांत राजकीय आकांक्षा सोडा, राजकीय ज्ञानाचा असलेला अभाव. ... आणि बलाढय इंग्रजांविरुद्ध यांना उभे करायचे आहे ?
*गांधींजींचा अभ्यास आणि कार्यनिती दोन्ही त्यांचे कार्यक्रमातून स्पष्ट होते. लोकांना सर्व बाजूंनी सक्षम करा,ज्ञान दया,निर्भयता दया आणि मग संघर्षास उभे करा ही गांधीनिती*
*ही माणसे एवढी सक्षम असावीत. की ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतील, जणू स्वतःसाठीची सारी यंत्रणा स्वतः चालवतील. सरकारी यंत्रणा त्यांना नकोच ! सरकारी शाळा नकोत,न्यायालय नकोत, त्यांचा परकीय माल नको.सरकारची मिरवण्यापूर्तीची पदकेही नकोत.शासकीय यंत्रणेचा सारा पट येथे उधळून लावायचा. तो घाल घाव अनं कर तुकडे, असे प्रकार करून नाही. तर तशीच सक्षम यंत्रणा उभी करीत.*
*गांधींना एकाच वेळी प्रबळ सत्तेचे जनमतावर असलेले राक्षसी गारूड कमी करायचे होते.आणि आत्मप्रतिष्ठेची भावना वृद्धिंगत करीत ,सरकारशीही पंगा घेणारा प्रचंड मनोबल असणारा समाज घडवायचा होता.*
*शेवटी समाजसमृद्धी हेच प्रत्येक राजकीय,सामाजिक चळवळींचे ध्येय हवे ना ? असा प्रश्न जेंव्हा, जेंव्हा भारतवर्षाला,जगाला पडतो तेंव्हा तेंव्हा ते म गांधींपर्यंत येवून का पोहचतात.याचा विचार तरुणाईने,नव्या उमेदीच्या कार्यकत्र्यांनी करायला हवा.*
*२७.८.२०१९*
म गांधी १५०वी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments
Post a Comment