गांधींजींचे बोलणे

गांधींजींचे बोलणे आणि सलगी देणे !
🌸🍁🌱🍀☘🌿🌸

गांधींच्या वागण्यामध्ये जसा साधेपणा होता,सहजता होती त्याप्रमाणे वक्तृत्वामध्ये एक साधेपणा होता सहजता होती. सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांची निवड होती.तेथे शब्दफुलोरा नव्हता ,नव्हता डामडौलही !  कोणताही अभिनिवेशही नव्हता... होता एक ठामपणा ! त्यामध्ये सत्य होते, कळकळ होती.
त्यामुळे त्यांचे वक्तृत्व हा लोकांच्या विश्वासाचा विषय ठरला होता.

 गांधीजींचं वक्तृत्व म्हणजे सामान्य लोकांशी साधलेला सुसंवाद होता, मारलेल्या गप्पा होत्या, केलेल्या गुजगोष्टी होत्या आणि या सर्व गोष्टी जणू भारतभूमीच्या चरणी अर्पण केलेल्या होत्या.

त्यांच्या भाषणात भारतवर्षातील छोटे-मोठे विषय ,सर्वसामान्यांची दुःख होती.अतिशय ठामपणे अतिव आपुलकीने आणि सुह्रदयाने,ते आपले म्हणणे मांडत .

गांधींचे प्रभावी शब्द व त्यामागील त्यांची तळमळ , आपुलकी लोकांची मने हेलावून सोडी. त्यांच्या भाषणाने लोक विलक्षण प्रभावित होत,ते त्यांच्याजवळ मोठे वक्तृत्व होते म्हणून नव्हे !अगदी मृदू, सौम्य आवाजात ते बोलत.त्यात आवेश नसे पण एक साधेपणा होता, सत्य होते. लोकांना ते भावे. ते लोकांची आपुलकीने बोलत लोकांना त्यांचे बोल ,आपलीच भाषा वाटे.  समुदायातील प्रत्येक व्यक्तीचा गांधींच्या शब्दावर विश्वास असे, गांधीजींचा प्रत्येक शब्द लोकांच्या हृदयाला जाऊन  भिडे !

 *'गांधीजींचा आवाज मृदू व  सौम्य होता परंतु त्यात पोलादाचे सामर्थ्य होते त्यांच्या शब्दांमुळे आम्ही रोमांचित होत असू अशी ग्वाही गांधींच्या शब्दातील जादू विषयी पंडित नेहरूंनी दिली आहे'*

 *गांधींची उज्ज्वल विचारसरणी, एखाद्या सामान्य गरीब शेतकऱ्यासारखी त्यांची राहणी ,सर्व सुखाचा त्याग केलेले साधुसंता सारखे त्यांचे जीवन  वैरागी,  गोरगरीब बद्दल त्यांना वाटत असेल असलेली कणव आणि गोड वाणी ,सारे अद्भूत होते.*
लोकांच्या कल्याणाबद्दल त्यांची असलेली सततची धडपड व आपल्या कृतीमध्ये आणि शब्दांमध्ये असलेले एकत्व यामुळे गांधीजींचे बोलणे सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडे. गांधीजी सर्वसामान्यांची भाषा बोलत. सर्वसामान्यांची दुःख आपल्या भाषेतून व्यक्त करत. एखादी कृती, एखादा आंदोलन त्याचं नेमकं नियोजन गांधींच्या कडे असेआणि त्यांना समुदायाकडून काय करून घ्यायचं याचेही  नियोजन महात्मा गांधींच्याकडे असे ! त्यामुळे आपल्या नेमक्या शब्दांनी योग्य स्फूर्ती ते जनसामान्यांना देत .. ..आणि योग्य तो परिणाम घडून येई.
 'करेंगे या मरेंगे ' या एका शब्दाने सारा देश पेटून उठला होता ! अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा अधिकार गांधींनी आपल्या कृतीने मिळवला होता . त्यांच्या शब्दाने चैतन्य दाटे, अनेकांना स्फूर्ती देण्याची ताकद त्यात होती.त्यांचा तो शब्द ,कोणी खाली पडू देत नव्हते !

🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510