गोखल्यांचे प्रेम

गोखल्यांचे प्रेम
🌸🌿🍁🍀☘🌸

ना गोखल्यांच्या आमंत्रणावरून गांधीजी पुण्यास गेले. गोखले व त्यांच्या सोसायटी सदस्यांनी गांधींचे प्रेमभरे स्वागत केले.
गांधींनी सर्वाशी अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. मन मोकळेपणाने आपले मुद्दे मांडले. दुसऱ्यांचे ऐकले.

गोखले यांची इच्छा होती की गांधींनी सोसायटीमध्ये सामील होऊन कार्य करावे.
काही सभासदांची मात्र कार्यपद्धतीवरून गांधींशी मतभेद होते.
गांधींचा आपल्या ध्येयाशी चिकटून राहण्याचा गुण गोखले यांना ठाऊक होता. त्याचप्रमाणे गांधी दुसऱ्यांच्या गुणांची कदर करतात. दुसऱ्यांची पूज्य स्थानातील मर्मस्थाने अभ्यासतात. त्यातील चांगले अंगीकारतात हे ना गोखलेना ज्ञात होते.
पण सभासदांना हे ज्ञात नव्हते . ते गांधींना समावून घ्यायला तयार होईनात.

गांधींनी स्वतःच्या मनातील कल्पना गोखल्यांकडे विशद केली. *मी एक आश्रम स्थापून फिनिक्समधील सहवासी मंडळीला घेऊन राहायचे ठरविले आहे*
गोखले - "तुम्ही अवश्य तसे करा. या निर्णयात आम्ही तुमचे पाठी आहोत सभासदांबरोबरच्या चर्चेचा निकाल कसाही लागो, आश्रमासाठी लागणारे द्रव्य तुम्ही माझ्यापासून घ्यायचे. मी तो माझा आश्रम समजणार. "
गांधींना आनंद झाला. पैसे गोळा करण्याच्या व्यापातून, कामातून गांधींना मोकळीक मिळणार होती.
गोखलेनी सचिवांना
बोलावले व सांगीतले ," आमच्या हिशेबात गांधींचे खाते उघडा आणि त्यांना त्यांच्या आश्रमासाठी किंवा त्यांच्या सार्वजनिक खर्चासाठी जे पैसे लागतील ते तुम्ही त्यांना द्या. "

ना गोखलेंनी गांधींना सर्व बाजूंनी जोखले होते. गांधींच्या व्यक्तिमत्वाची पूर्ण छाप गोखलेंवर पडली होती. गांधींच्या साध्या, सत्यवादी, चिवट व सातत्याने कार्यरत व्यक्तीमत्वाची त्यांचेवर अमिट निशाणी पडली होती.
आफ्रिकेतील गांधी सहवासानंतर ना गोखलेंनी उद्गार काढले होते.
*भारतीय संस्कृतीतील सर्व शुचिता व दिव्यता गांधीजींच्या द्वारा प्रकट झाली आहे.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510