एका प्रश्नाचा निपटारा

एका प्रश्नाचा निपटारा
🌸🌿🍁🍀☘🌸

गांधी पुण्याला पोहचले.ना गोखले यांची उत्तरक्रिया वगैरे आटोपली.

पुढचा मार्ग ठरविण्यासाठी सभा भरली. गांधींना सोसायटीत घ्यावे का न घ्यावे ? या प्रश्नांवर चर्चा झाली. गोखले असेपर्यंत गांधी सोसायटीत असल्याप्रमाणेच होते.
 गोखल्यांचे इच्छेप्रमाणे  गांधींनी सोसायटीत दाखल होणेसाठी प्रयत्न चालविले.

काही गांधींना सभासद करणेस उत्सुक तर काही विरुद्ध ! गांधीबद्दल दोन्ही गटांना प्रेम.पण काहींना सोसायटीचे नियम प्रेम व नियमनिष्ठा !

चर्चेअंती अनेक बाबींवर गांधी व सभासद दोन ध्रुवांवर होते ...

पुष्कळ चर्चेअंती प्रश्न मिटला नाही.निर्णय पुढील सभेत घ्यायचे ठरले.

गांधी घरी जाताना विचारांच्या भोवऱ्यात !

विचारांती गांधींनी पत्र लिहले. *माझे दाखल प्रश्नांवर सभा भरवू नका* सभासदांत मतभेद असता आपण दाखल होण्याचा आग्रह अनुचित आहे. असे गांधींना मनोमन वाटले. उगाच आपल्यासाठी गोखलेंच्या सोसायटीत मतभेद नकोत.

""" *गांधींचा हा निश्चय मतभेद वाल्यांना आवडला* गांधींचा व सोसायटीचा स्नेह ही राहीला.
मतभेदाची जाणीव होती पण त्याचे कटुतेत रूपांतर झाले नाही.

म गांधी १५०वी जयंती वर्ष🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510