सत्याग्रहाचे मंगला चरण

सत्याग्रहाचे मंगलाचरण
🌸🌺🌿☘🍂🍀🌸

शांतीनिकेतनला जाण्यापूर्वीं प्रवासात गांधी रेल्वे प्रवासात विरमगावला पोहोचले. तेथे जकात तपासणीच्या अनुषंघाने गांधींना खूप त्रास झाला.

गांधींजीनी मुद्दाम तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास केला.अंगावर कपडे सामान्य माणसाचे होते.
विरमगाव येथे प्लेगमुळे ३ऱ्या वर्गाची तपासणी होई. गांधींना थोडा ताप होता. अंमलदाराने त्यांना राजकोटला डॉक्टरांना भेटावयास सांगीतले.

त्या दरम्यान गांधींना भेटलेल्या मोतीलाल यांनी विरमगावची जकाततपासणी व त्यामुळे होणारा त्रास विशद केला.

हुकूमाप्रमाणे गांधी राजकोटला डॉक्टरांकडे. गांधींना पाहून डॉक्टर खजील. पुढे त्याने गांधींच्या मुक्कामी तपासणीची सोय केली.

३ऱ्या वर्गाला ही तपासणी आवश्यक होती. अंमलदार या वर्गाला पशूवत वागवी. बोलणे म्हणजे खेकाटणेच ! ३ऱ्या वर्गाचा उतारु जणू त्यांचा नोकर !
त्याला बोलावे, मारावे, लुटावे. तिकीट देताना रखडवावे, मुद्याम विलंब करून गाडी चुकवावी. हे स्वतः गांधींनी पाहिले.
काठेवाडात जकाततपासणीपायी होणारे त्रास इतरांनी गांधींचे कानावर घातले.अनेक तक्रारी.

त्यावेळी लॉर्ड विलिंग्डन यांनी गांधींना भेटीला बोलावले होते. गांधींनी तक्रारींचा अभ्यास केला.त्यात तथ्य आढळले. त्यांनी त्यानुसार सरकारशी पत्रव्यवहार केला.
सेक्रेटरी व पुढे लॉर्ड विलिंग्डनकडे प्रत्यक्ष भेटीत तक्रार दिली.
चर्चेतील सूचनेप्रमाणे गांधींनी वरिष्ठ सरकारबरोबर पत्रव्यवहार चालविला.

दोन वर्षानंतर दाद मिळाली. प्रत्यक्ष भेटीत त्यांनी चर्चा केली. लाॅर्डला विरमगावसंबंधी काही माहिती नव्हती. गांधींच्या तक्रारी त्यांनी ऐकून त्यांनी त्याचठिकाणी  त्वरीत  टेलिफोन करून त्यांनी विरमगावसंबंधीचे कागद मागवले.
आणि वर गांधींनीं वर्णीलेली स्थिती असेल तर आणि अंमलदाराचे काही वेगळे म्हणणे नसेल तर जकात रद्द करू असे अभिवचन दिले.

या भेटीनंतर थोडयाच दिवसात जकात रद्द झाल्याची बातमी गांधींना वर्तमानपत्रात वाचायला मिळाली.

हा विजय गांधींना सत्याग्रहाच्या मंगलचरणांसारखा वाटला.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510