चंपारण्य ३

*चंपारण्य - ३*
🌸☘🍀🍁🌿🌹🌸
कमीशनर साहेबांनी धमकावूनही म गांधींनी आपले काम चालूच ठेवले.गावागावातील शेतकऱ्यांच्या भेटी ,त्यांच्याशी चर्चा इ.

मोतीहारीपासून जवळच्या एका शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. म गांधीं त्यांना भेटावयास चाललेले.मध्येच पोलीस सुपरिटेंडची नोटीस .. ' चंपारण्य सोडून जा. '

*गांधींनी जबाब लिहून दिला _ " *मी चंपारण्य सोडून जाण्यास तयार नाही.मला माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे.*
चंपारण्य सोडण्याचा हुकूम मोडला म्हणून दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर रहावे असे समन्स मिळाले.

गांधींनी रातोरात नियोजीत कामे केली.जागून पत्रे लिहली. नियोजनाच्या सूचना व्रजकिशोर बाबूंना दिल्या.
समन्सची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. गांधीं जिथे-जिथे जात लोकांची गर्दी तिकडे जात होती.
गांधींनी नोटीशीचा प्रतिकार न त्या स्वीकारल्या. गांधींचे सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरचे वागणे नम्रपणाचे होते,सौजन्याचे होते.
गांधी म्हणतात *मला सरकारला,कायदयाला विरोध करावयाचा नव्हता तर त्यांचे हुकमाचा सविनय भंगच करावयाचा होता.*
*सरकारी कर्मचारी गांधींच्या एकूण वर्तनाने निर्भय झाले.पण त्यांचबरोबर त्यांनी हे ही जाणले की आपली सत्ता आजपासून लुप्त झाली. लोक निर्भय झाले आहेत आणि त्यांना आता शिक्षेचे भय नाही.*
*एका निर्भय महात्म्याने सारी साधी माणसे,अवघी जनताच निर्भय केली होती.*

म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510