खेडा सत्याग्रह यश आणि निर्भय शेतकरी

खेडा सत्याग्रह  यशस्वीता आणि निर्भय शेतकरी.
🌸🍀☘🍂🍃🌺🌸
खेडा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. तेथील अधिकारी अन्यायकारी शेतसारा वसूली करीत होते.
वसूली सक्तीची व शेतकऱ्यांचे वकूबीपेक्षा जास्त होती.
गांधींजीनी या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांना एक केले. ...मग संघटित विरोध.
या प्रकरणात म गांधी व सरदार पटेल, अन्यायाविरुद्ध मैदानात होते.
'आमचे उत्पन्न कमी आहे. सारावसुली वर्षभर माफ व्हावी " असा अर्ज सरकारकडे पाठविला होता. पण सरकारवर परिणाम शून्य.
सारा माफ झाला नाही.
मग म गांधीचे पुन्हा पत्र
- 'आम्ही सारा भरणार नाही. वसूलीसाठी जो इलाज करायचा आहे तो सरकारने करावा. आम्ही सर्व सोसू. जमिन खालसा झाली तरी बेहतर.
जे काही समर्थ आहेत. तेही सारा भरणार नाहीत, त्यामुळे दुबळेही घाबरून सारा भरतील.... इ. "
.... एकूणच सत्याग्रहात लोक अधिकाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नव्हते. लाठीहल्ल्यांस भीक घालत नव्हते. तुरूंगाची भीती नष्ट झाली होती....

प्रथमतः नडियादच्या मामलेदाराने निरोप दिला-
"जे सुस्थितीत आहेत. त्यांनी महसूल भरावा.तसे केले तर मग गरिबांची वसुली तहकूब ठेवण्यात येईल. "
म गांधी यासंबंधी लेखी आदेश मागीतला. तसा आदेश मिळालाही.

तहसिलदार एका तालुक्यातील , बाकीचे लोकांचे  काय म्हणून गांधींनी कलेक्टर कडे इतरांसाठी पाठपुरवठा केला.
कलेक्टरांनी सांगीतले सर्वांसाठीच तसा हुकूम झाला आहे.

गांधींनी ती जडतोड जरा नाखुशीने स्वीकारली.
शेतकरीवर्गाची झालेली जागृती व लढ्यातील निर्भयता ही जमेची बाजू होती.
सरदार पटेल राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले ही ही महत्वाची बाब घडली.

म गांधी १५० वी जयंतीवर्षानिमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510