अभिनव प्रयोग

*आणखी एक संघर्ष*
 *अहमदाबादमध्ये गांधींचा अभिनव प्रयोग* 🌸🌿☘🍀🌱🍁🌸
*अहमदाबादमध्ये*
गिरणीमालक अफाट नफा मिळवीत व त्याचा थोडाही वाटा मजुरांना मिळत नसे.यासंबंधी त्यांनी गांधींकडे तक्रार केली. चर्चेअंती गांधींनी मजूरांना संपाचा सल्ला दिला.
मजूर व त्यांचे पुढारी यांज बरोबर अनेक वेळा गांधींनी चर्चा केली.मजूरांबरोबर चर्चा करुन गांधींनी संपकाळात मजूरांनी कसे राहयचे यासंबंधी नियोजन केले.
१ काही झाले तरी शांतीभंग नको
२ ज्यांना कामावर जायचे आहे,त्यांची अडवणूक नको.
३ मजुरांनी भिक्षान्न खाऊ नये.
४ संप संपेपर्यंत दृढ रहावे,पैसे संपले तर इतर काम करुन मिळवावेत.

सर्व पुढाऱ्यांची मान्यता.नंतर मजुरांची सभा.ठराव - आपली मागणी मान्य झालेशिवाय किंवा त्यांचे योग्यतेचा अभ्यास करणेसाठी पंच नेमलेशिवाय कोणीही कामावर जाणार नाही.

रोज सभा.शेकडो मजूर.गांधी रोज नियोजनाची आठवण करून देत.रोज मिरवणूक व नंतर सभा.
संपाला २१ दिवस झाले.गांधी वेळोवेळी वाटाघाटी करीत. पण मालक पंच नेमण्यास तयार नव्हते.

... दिवसांमागून दिवस जात होते. काही मजूरांचा संयम संपत होता. गिरणीत कामावर जाणाऱ्यांचा द्वेष होऊ लागला.सभेची हजेरी कमी होऊ लागली. परिणाम नसलेने काहींची नाराजी.काही डगमगू लागले.

गांधींनी निकाल लागेपर्यंत मी उपोषण करणार असे जाहीर केले आणि मग एकच लगभग. मजूर त्यांची माफी मागू लागले.काहींना रडू कोसळले. काही मालक टोमणे मारू लागले.

गांधींचा निश्चय दृढ होता. काहीजण त्यांचेबरोबर उपोषणास बसले.
*आपल्या मागण्यासाठी,विरोधकांचे मतपरिवर्तन करण्याच्या हेतूने एखादया नेत्याने स्वतःवर कष्ट लादून घेण्याची, व ती पाहण्याची   भारतीयांची पहिली वेळ होती.*
*सारे अभूतपूर्व यांने दोन गोष्टी साध्य झाल्या.मजूरांनी संप चालू ठेवला. वाटाघाटीस वेग आला.आनंदशंकर ध्रुव इतर जण मध्ये पडले. मजूर आपुलकीने आपला प्रयास करीत राहीले. आणि गिरणीमालकही वाटाघाटीस तयार झाले.*
*म गांधींचे सत्याग्रहाचे शस्त्र फलदायी ठरले. चंपारण्यात व पुढे खेडमध्ये त्यांनी निःशस्त्र प्रतिकाराचे अस्त्र वापरले.तर मिल मजुरांचे प्रश्नावेळी सत्याग्रहाचा यशस्वी वापर झाला.*

आणखी एक संघर्ष (२ )
🌸🍁🍀☘🌿🌱🌸

म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510