बॅरीस्टर गांधी

बॅरिस्टर गांधी
🌿🍀🌸☘🌹

म गांधीजी बॅरिस्टर पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्लंडला गेले होते.

खाणे - पिणे - खर्च यासंबंधी त्यांची झालेली ओढाताण त्यांनी आत्मकथेत व्यक्त केली आहे.

कायदयाच्या या पदवीच्या अनुशंघाने गांधी म्हणतात -
' कायदयाचा अभ्यास सोपा होता. दोन परीक्षा होत्या. रोमन लॉ व इंग्लंडचा कायदा. दोन हप्त्यांनी दयावयाच्या या परीक्षांची पुस्तके ठरलेली होती.पण क्वचित कोणी वाचीत. रोमन लॉ साठी छोटी टिपणे लिहिलेली होती. '

गांधी मात्र  टिपणीच्या पुस्तकांच्या ऐवजी मूळ पुस्तके वाचून काढावे या मताचे होते. गांधींनी मूळ पुस्तके खरेदी केली. रोमन लॉ लॅटिनमधून वाचला.

इंग्लडच्या कायद्याचे वाचन गांधींनी खूप मेहनत घेऊन केले. त्यासाठी त्यांना ब्रूमचे कॉमन लॉ चे पुस्तक उपयोगी पडले.
गांधी म्हणतात 'कॉमन लॉ ' हे पुस्तक बरेच सुरस होते.
पुढे गांधींना स्नेलच्या ' इक्विटी ' मध्ये गोडी वाटली. व्हाइट व ट्यूडर चे वाचन झाले.

गांधींनी पुढे विलीयम्स् व एडवर्डसचे स्थावर मिळकतीवरील पुस्तक आणि गुडिपचे जंगम मिळकतीवरील पुस्तकाचे अध्ययन केले.

गांधीजी बॅरिस्टर झाले. १o जून १८९१ त्यांना बॅरीस्टरचा किताब मिळाला.

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510