हिंदुस्थानचा राजा

हिंदूस्थानचा राजा🍀🌸☘🍁🌿

स्वातंत्र्यलढयात गांधीजीना अनेकवेळा तुरुंगवास झाले. गांधीजी त्यावेळी येरवड्यास होते. कोठून तरी परदेशातून गांधींना पत्र आले होते.
त्या पत्रात एक निरागसता होती, निर्मळपणा होता.

त्या पत्राच्या लिफाफ्यावर पत्ता लिहला होता...
To THE KING OF INDIA
DELHI, INDIA

असा प्रथमदर्शनी विचित्र पत्ता. आतील मजकूर वाचला गेला. मजकूराहून कळाले ते पत्र म गांधींजींना उद्देशून लिहले आहे. अखेर ते पत्र येरवड्यास आले.

लाखो भारतीयांचा आराध्य , हिंदी जनतेचा राजा तुरूंगात होता.

त्या अजान बालकास म गांधी म्हणजे भारताचे राजे वाटले.

जनतेसाठी अंगावर एक धोतर ,उपरणे असलेला हा राजा. हातातील काठी म्हणजे त्यांचा राजदंड !

राज्य कुठले त्यांचे ?.. भारतीयांच्याच नव्हें जगातील लोकांच्या हृदयात त्यांचे चिरंतन स्थान आहे.

( पुढे दिल्लीच्या राजघाटावर प्रदर्शनात या पत्राचा लिफाफा मांडला होता. )
(आधारित )

गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510