गांधी - अक्षय वारसा

*म गांधी  आरसा आणि वारसा*
🍁☘🌿🍀🌸🌺

भारतीयांच्या मनातील गांधीजींचा चिरस्मरणीय ठसा कायम आहेच !

गांधी विचारसरणी समर्थक गांधीवादाची भलावण करतोच... पण इतर विचारसरणीला तुलनेसाठी गांधीजी हवाच असतो.

राजकारण्यांच्या  व्यासपीठावरील भाषणांचा आधार गांधी असतो. शद्बोशब्दी गांधीचा उदोs उदो ही त्यांची मजबूरी ही असू शकते...

*'एक रुपाया चांदीचा ,सारा देश गांधींचा असा जयघोष स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी, गांधी जयंती दिवशी देशभर घुमत असतो. तसाच तो जागतिक पटलांवर घुमत असतो, भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांचे तोंडीही.*
सरकार कोणत्याही पक्षाचे असतो. बाह्य जगतात  भारताचा चेहरा म्हणून गांधी हवेतच !
गांधीचा  संदर्भ घ्यावाच लागतो महद नेत्यांना !

भारतातील आंदोलने असो, उपोषणे असो वा क्रांतीचे नारे असो त्याला गांधीवादाची फोडणी असते.
सर्वसामान्यांचे प्रश्न गांधीच्या चेहऱ्याआडून मांडण्याचा अनेकांचा कल असतो.

अर्थातच शेतकरी, मजदूर, स्त्रीयां सर्वांपर्यंत... सर्वसामान्यांपासून विचारवंतापर्यंत सहजपणे पोहण्यासाठी गांधी हे अजून सोपान आहे.

अमेरीकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि द आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांना गांधीजीं म्हणजे जागतिक वारसा वाटतात. ओबामा आणि मंडेला यांचेप्रमाणे अनेक जागतिक नेत्यांना  गांधी आपले आदर्श वाटतात.

उपयुक्तता, अपरीहार्यता, आदर्शवाद यां सर्वांसाठी गांधी हवेत आहेत. गांधीवाद हवा आहे.
जागतिक शांततेची स्वप्नं पाहणाऱ्यांनाही गांधींचा हात हवा आहे ******

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510