अवधान

अवधान
🍀🍁🌸☘🌿

महात्माजी एकदा महाबळेश्र्वरला होते.सायंकाळी रोज फिरायला जाणे हा गांधींचा शिरस्ता. त्या दिवशी ते फिरायला निघाले.
जवळच्या खेडयातून आलेला एक १०- १२ वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला हात जोडून उभा होता. कमरेला एक मळकट लंगोटी फक्त होती. खांदयावर एक मळलेले पटकूर होते.
आंघोळही बहुधा केलेली नसावी.

गांधींजी बरोबरच्या माणसास म्हणाले, ' त्याच्याजवळून ते अंगावरचं फडकं मागून घ्या .म्हणावं उद्या आणून देऊ '

मुलाला फडके मागण्यात आलं पण तो काही फडके देईना.

गांधी त्या मुलास म्हणाले. -' उदया इथेच आलास तर खाऊ मिळेल. ' .असे त्याला सांगायला सांगून गांधींजी पुढे निघाले.

दुसऱ्या दिवशी फिरायला निघायची वेळ झाली. गांधींजीनी प्यारेलालजींना थोडे खादीचे कापड, खाऊ व साबण बार बरोबर घ्यायला सांगितले.

तो मुलगा तेथे आला होता. गांधींनी त्याला जवळ घेतले. त्याला कुरवाळले.
त्याला खाऊ दिला आणि साबणही !

गांधी त्या मुलास म्हणाले - ' अंग व कपडे स्वच्छ धुऊन उदया ये. आणखी खाऊ मिळेल . '

आणि मग पुढे रोज तो मुलगा स्वच्छ अंघोळ करून येई. स्वच्छ कपडे घाली. हात जोडून तो मुलगा गांधींना अभिवादन करी.

 सोबतीला आणखीही मुले तेथे उभी असत.

गांधींजी खरोखरचे राष्ट्रातात होते.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510