अन्नाहार

अन्नाहार
🌸☘🍀🌿🍁

इंग्लंडमधील सहवासात गांधींना मुक्काम बदलावे लागे. मित्र प्रेमाने मांसाहाराची विनंती करीत. पण त्या आमिष आहारापुढे गांधींनी हार मानली नाही.

खाण्याची पंचाईत रोखण्यासाठी गांधीजींनी शोध सुरु केला. त्यासाठी पायपीट. गांधींना निरामिष अर्थात शाकाहार देणारे भोजनगृह शोधायचे होते. शाकाहारी भोजन मिळेल ,अशी कुणकुण गांधींना लागली.
मग शोध सुरु. रोज १०-१२ मैलाचे चालणे.
भटकंतीत गांधी एकदा फेरिंग्डन स्ट्रीटमध्ये पोहचले व ' व्हेजिटेरियन रेस्टोराँ (शाकाहारी भोजनगृह ) नाव वाचले. अर्थात त्यांना आनंद झाला.

ते आत जाणार एवढ्यात बाहेर ठेवलेली पुस्तके त्यांना दिसली. विक्रीची पुस्तके. *अन्ना हाराचे समर्थन हे पुस्तक त्यांनी पाहिले, लेखक - सॉल्ट. एक शिलींग किमत देऊन त्यांनी खरेदी केले.*
.....आणि ते जेवायला बसले. गांधी लिहतात, ' इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांना प्रथमच पोटभर खायला मिळाले. भूक शमली जणू !

*गांधींनी सॉल्टचे पुस्तक मनापासून वाचले. उत्कृष्ट पुस्तक, उत्तम परिणाम. हे पुस्तक वाचल्यानंतर गांधींचा शाकाहारावरील विश्वास आणखी वाढला. त्यांनी स्वेच्छेने आणि विचारपूर्वक शाकाहाराचा स्वीकार केला.*

*मातेसमोर केलेली प्रतिज्ञा त्यांना स्मरली.गांधी म्हणतात -मी केवळ सत्य - प्रतिज्ञेसाठी मांसाहार त्यागी. मात्र पुढेमागे कधी संधी मिळाल्यास मनमुराद मांस खावू.इतरांना आपल्या मांसाहारी कंपूत ओढण्याची सुप्त इच्छा होती.*

*आता मात्र त्यांनी मनापासून शाकाहार स्वीकारला. व इतरांनाही शाकाहारी बनविण्याची इच्छा बाळगू लागले.*
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510