अन्न हेच औषध

अन्न हेच औषध
🌿🍀☘🌸🍁

*योग्य आहार हेच औषध आहे. अति सेवन विषासमान असते.* असे लेख मध्यंतरी वाचनात आले.

गांधी सारख्या अखंड कार्यरत असलेल्या मानसाचा आहार कसा असेल ?

... मांसाहाराला पुरते सोडून गांधी शाकाहारी झाले. अन्न आहाराबाबत गांधी अधिकच सजग झाले. अन्नाहारावरील त्यांची श्रद्धा वाढत गेली.

 सॉल्टच्या पुस्तकाने आहारविषयक गांधींची जिज्ञासा अधिक तीव्र झाली.
गांधींना आहारविषयक पुस्तके मिळविण्याचा छंदच लागला.

अनेक पुस्तकापैकी गांधींनी ' *हॉवर्ड विल्यम्स्च्या - आहारनिती* पुस्तकाचा चांगला अभ्यास केला.या पुस्तकात निरनिराळ्या उत्तम,ज्ञानी पुरुषांचे आहारांचे व आहारविषयक ज्ञानाचे वर्णन केले होते.
*पायथागोरस ,येशू इ लोक केवळ अन्नाहारी होते असे सिद्ध करण्याचा त्यात प्रयत्न केलेला.*

 *डॉ.मिसेस अॅना किंग्सफर्डचे - 'उत्तम आहार पद्धति '* हे पुस्तकही विविध विषयांवर प्रकाश टाकणारे होते.

यात आणखी एक महत्वाचे म्हणजे *अॅलिन्सनच्या आरोग्य विषयक लेखा* चीही गांधीना मदत झाली.
*औषधांऐवजी फक्त आहारातील फेरफारांनीच रोग्याला बरे करण्याच्या पद्धतीचे समर्थन केले होते*****/*गांधीजींनी डॉ अॅलिन्सन यांचाही अभ्यास केला. डॉ. स्वतः अन्नाहारी होते. रोग्यांना ते फक्त अन्नाहाराचीच शिफारस करीत.

या सर्व पुस्तकांच्या वाचनाचा गांधींजीवर मोठा परिणाम झाला. गांधी स्वतःचे जीवन म्हणजे प्रयोग मानतात. त्या दृष्टीने आहार विषयक प्रयोगांनी गांधींच्या जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान
 पटकावले.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510