विविध धर्म तत्वज्ञान आणि गांधी
*विविध धर्म तत्वज्ञान"आणि गांधी*
🍁☘🍀🌿🌸
इंग्लडला जाऊन गांधीना वर्षभर झाले असेल. लोकशाहीच्या उगम स्थानी गांधींना विविध विचार प्रवाह भेटले.
विविध पंथाचे,विविध धर्मांचे लोक भेटले.
त्यात दोन थिऑसॉफिस्ट मित्र होते. गांधींजी जवळ त्यांनी गीतेसंबंधी विषय काढला. चर्चेतून गांधींना हे समजले की ते *एडविन आर्नल्डनी गीतेचे केलेले भाषांतर* वाचीत होते.
त्यांचेबरोबर गांधीं *गीता* वाचू लागले. त्यातील २रा अध्याय वाचताना त्यातील काही श्लोक गांधींचे मनात रुतून बसले.
गांधी म्हणतात गीतेच्या श्लोंकाचें ध्वनी माझ्या कानात घुमत राहिले. गीता हा अमूल्य ग्रंथ आहे. अशी माझी समजूत झाली. हळूहळू समजूत दृढ होत गेली. *आज जीवनाचा एवढा प्रवास झालेवरही तत्वज्ञानाच्या बाबतीत मला गीता हा सर्वोत्तम ग्रंथ वाटतो.*
ज्या वेळी मी आयुष्यात निराश झालो,त्यावेळी या ग्रंथाने मला अमूल्य मदत दिली आहे.
गीतेची बहुतेक इंग्रजी भाषांतरे गांधींनी वाचली. पण एडविन आर्नल्डचे भाषांतर त्यांना सर्वोत्तम वाटले. गांधी म्हणतात - 'मूळ ग्रंथातील भावार्थाला मुळीही बाधा आलेली नाही. '
गीता हा गांधींजींच्या वाचनातील नित ग्रंथ होता.
गांधींजींच्या याच मित्रांनी त्यांना आर्नल्डचे *बुद्धचरित्र* वाचण्याची शिफारस केली.गांधी म्हणतात मी बुद्धचरित्र अधिक आवडीने वाचले.
गांधींना एका अन्नाहारी वसतीगृहामध्ये एक भले खिस्ती भेटले. त्यांची व गांधींची खिस्ती धर्मविषयक चर्चा व्हायची. ते म्हणत माझा धर्म मांसाहार वा मद्यपानास विरोध करतो.तुम्ही *बायबल* वाचावे.
गांधी म्हणतात मी बायबल वाचण्याचा प्रयत्न केला. पण जुना करार माझ्याने वाचवेना., सृष्टीरचना या प्रकरणापुढे वाचताना मला झोपचं येई.. '
नवा करार वाचताना मात्र निराळाच परिणाम झाला.येशूच्या गिरिप्रवचनाची छाप फार चांगली पडली. ते ह्रदयात उतरले. मी गीतेशी त्याची तुलना करू लागलो. ' .: तुझा सदरा मागेल त्याला कोटही दे,तुझ्या उजव्या गालावर थप्पड मारील त्याच्यासमोर डावा गालही धर ! ' हे वाचून मला खूप आनंद झाला. शामळभट्टाचा छप्पा आठवला.
गांधींचे मित्र त्यांना एकदा ब्लॅवॅट्स्की लॉजमध्ये घेऊन गेले. त्यांनी गांधींना थिऑसॉफिकल सोसायटीत नेले.तेथील चर्चा व मित्रांच्या सांगण्यावरुन गांधींनी मॅडम ब्लॅवॅटस्कीचे
' *की टू थिऑसॉफी* हे पुस्तक वाचले. त्यावरुन गांधींना हिंदूधर्माचे ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण झाली.
*गांधींच्या बालमनाने गीता,आर्नल्डकृत बुद्धचरित्र आणि येशूची शिकवण यांचे एकत्रीकरण केले.*
*धर्म त्यागामध्ये आहे ही गोष्ट गांधींचे मनाला पटली**
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment