Datta bhakta Ramchandra Gurav
[13/12 05:34] gurav rajendra: ॥ 👁🌴👁॥ *श्री.दत्तभक्त रामचंद्र मारुती गुरव*॥🕉*l महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरु झाली. १लाखाचे पहिले बक्षीस श्री. रामचंद्र मारूती गुरव यांना लागले. त्यांनी ते कुणालाही न सांगता श्री .क्षेत्र गाणगापूरी दत्तात्रयांचे चरणी अर्पण केले. लाख रुपयांमधून श्री.परिसरात मंडप झाला. त्यांची दत्तवारी अखंड होती. त्यांची अखेरची वारी क्षेत्र गाणगापूरी महाशिवरात्री झाली. दत्तपालखी छबीनेवेळी ते दत्तचरणी विलीन झाले.मरणाचाही सोहळा झाला. त्यांना वाचासिद्धी प्राप्त होती अशी वंदता आहे. अनेक सांसारिक त्यांचेकडे प्रश्न घेवून जात. त्यांचे मरणानंतर त्यांचे गावी तिसंगी (पंढरपूर ) येथे लोकांनी त्यांची समाधी बांधली व समाधीशेजारी श्री. दत्तात्रयांचे देवालय ही बांधले. त्यांनी आपल्या दानाची कानोखबर ही न देता व इतर मोहापासून ते जीवनभर अलीप्त राहिले. ह्या बाबी मुलां-बाळांना कळू दिल्या नाहीत. जीवनकालाच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या जावाईंना सांगीतल्या ! मंदिर भक्तीकार्याला कै. रामचंद्र मारूती गुरवांचे विचारांची झळाळी येवो. सद्भभक्तीतील काही अंश तरी परमेश्वरा आम्हांस जीवनमार्गात ...