कमला निंबकर बालभवन, फलट
॥👁 *वाचावे आनंदे*👁ll .
राजेंद्र गुरव, यमाई औंध
॥ *रवीचंद्र _ २* ॥
रवी नित्य नवीन प्रकाशमान विषय घेवून येत असे !
तोच उत्साह, नावीन्याचा ध्यास अनं काहीतरी करण्याची आस !
कोणताही नविन विषय घेऊन घाई गडबडीत रवी आम्हांला धडकेच
एकदा रवी असाच गडबडीत भेटला - म्हणाला . ' आपल्याला फलटणला जायचयं '.... मी माळी बरोबर बोललोयं '... ' तू बोलून घे ! . माळी म्हणजे - ' अंकुश माळी ! ... मी त्याचे खोलीवर गेलो !... चर्चा झाली ... ' एवढयात रवी आलाच ! ' .. मग ठरलं ना , मी नियोजन केले आहे.. त्याप्रमाणे जाऊ !
ठरल्याप्रमाणे आम्ही ( रवी , अंकुश आणि मी ) फलटणला पोहोचलो .... .. रिक्षा एका शाळेसमोर थांबली . बाहेरचा साधा बोर्ड - ' *कमला निंबकर बालभवन* फलटण ' .... रवीने सोपस्कार पार केले '... ' .. आम्हांला प्रार्थना हॉल मध्ये नेण्यात आले ... क्षणात पसायदान सुरु झाले.. ' शिस्त..स्वरांची , मनाला भिडली... अंतर्यामी शांतता.. .. मी माझे आयुष्यात जवळजवळ २० वर्षे शिक्षण सेवेत व ३० वर्षाहून अधिक मंदिर वा धार्मिक कार्यक्रमात असे पसायदान फार क्वचित ऐकले आहे !
' मग आमची थोडक्यात ओळख , निटनेटके स्वागत .... आणि श्रवणीय परीपाठ !
' दिवसभर आमचे शाळा वाचन चाललेले ! _ ' आळीपाळीने वर्ग, .. ग्रंथालय तासिका, प्रयोगशाळा, कला - कार्यानुभवाचे काम, वर्ग रचना , अभ्यासातील प्रयोग, प्रोजेक्ट वर्क इत्यादी
. . ग्रंथपालांनी स्वतः ' एक तास ग्रंथाल याचा ही संकल्पना ' सांगीतली तर मुख्याध्यापकांनी *मंजूताईंनी*उपक्रमांची माहिती दिली. ' ... परिसरातील लघूउद्योगांची विद्यार्थ्यांनी गोळा केलेली माहिती - हा प्रोजेक्ट माझे अजुनही स्मरणात आहे.
'विद्यार्था _ शिक्षकांनी मिळून तो उत्तम प्रोजेक्ट केलेला, .. माहिती व चित्रांची पद्धतशीर मांडणी.. लक्षवेधक !फलटणच्या परिसरातील लघुउद्योगांची माहिती मुलांनी गोळा केलेली !... मुलाखत तंत्राचा वापर, चित्रमय माहिती फोटो, अनुरूप कविता ... आणि प्रत्यक्ष जीवनांशी जोडलेले नाते ! ' ती प्रोजेक्ट वही अद्याप तशीच डोळ्यांसमोर !
वर्गअध्यापणाची परवाणगी रवीने अगोदरच घेतलेली... वर्गात 15 ते 20 च मुले , खेळकर वातावरण, मोकळी -ढाकळी मुले... अध्यापणाचा एक प्रसन्न अनुभव !
शेवटच्या टप्प्यात आम्हाला संस्थेच्या संस्थापिका भेटल्या ! *मॅक्सीन मावशी* !
प्रसन्न, दिलदार मावशी आमचे बरोबर गप्पात रमल्या !... बाई परदेशात जन्मलेल्या , तिकडचं वाढलेल्या ... कर्मभूमी म्हणून फलटणची निवड !
' इतक्यावेळ बोलल्या .... एकही इंग्रजी शब्द नाही ,... सारं अस्सखलीत मराठीत !... आपण मराठी माणसे किती मोडतोड करतो मराठीची !
आम्ही माघारी फिरलो - सोबत खजिना विविध मूल्यांचा कृतीचा !.... माझे पुढचे फलटणवारीत कमला निंबकर दर्शन हटकून होई !
जुन्या डाएट पासून जवळ असल्यामुळे एकदा कोर्समधून शाळेत जाऊन बसलो... रमलो... वेळ कसा गेला कळलेच नाही !
माझे आझाद कॉलेजच्या बी.एड सत्रात बावकर सरांशी परिचय झाला ते कमला निंबकरचे अध्यापक ! त्यांचेबरोबर 'संगणक वर्ग ' पाहण्यास मी फलटणला !
आमचे खबालवाडी प्राथ.शाळेस 'यशवंतराव चव्हाण आदर्श शाळेचा पहिला पुरस्कार मिळाला !... त्या पुरस्कारासह मी कमला निंबकरला !
'मी . 'कमला निंबकर ' असं असं घेतलं , शिकलो.. राबवलं मंजुताईनी ऐकलं.... पण चेहऱ्यावर आपण काहीतरी दिलं असा भाव मुळी नव्हता !
माझी बहिण फलटणला वास्तव्याला असताना , त्यांनी मला सल्ला विचारला - ' कोणत्या शाळेत प्रवेश घेवू ! _ ' कमला निंबकर 'माझे एकच उत्तर ! = माझ्या दोन्ही भाच्या तिथचं शिकल्या !
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*आयडियल अॅकडमी सातारा,* द्वारे पुढे शाळाभेटी अनुभवत्या आल्या !.. प्रसिद्धी विन्मुख प्रकाशजी बडदरे फार प्रेमाने मला शाळेचे कंगोरे समजावयाचे !
नामदेव माळी सरांचे ' *शाळा भेट* ' पुस्तक पुढे पावले !
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
.. ' *१९९५*साली शाळाभेट कशाबरोबर खातात हे माहित नसताना फलटणच्या ' कमला निंबकर बालभवनची ती घेतलेली भेट अजुनही काल घेतल्यासारखी .. ..*रवीचंद्रा*बरोबर चाललेली ती प्रकाशवाट अजुनही अंतरयामी प्रज्वलीत करतेआहे*( क्रमशः ) 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
. 🕉 राजेंद्र गुरव, यमाई औंध ९५६११५४१४०

Comments
Post a Comment