चंदन
*॥👁वाचावे आनंदे!*👁॥ . राजेंद्र गुरव, यमाई औंध
*॥चंदन*॥*
सांगोल्याला महेशचे लग्न...
महेश म्हणजे आमच्या धाकट्या मामाचा थोरला मुलगा !
लग्नाची गडबड .... लगीण घाई......
एक गाडी साधी ... रस्त्यावर थांबते ... एक माणूस लगबगीने ' अक्षता ' कार्यक्रमात मिसळतो !
अक्षता पडतात... अक्षतात गुंतलेले हात त्या व्यक्तीच्या हातात ! . .
मी म्हणतो ती व्यक्ती कोण आहे ?
..... इथले आमदार आहेत ते !
मी क्षणभर उडालोच !
ना गाड्यांचा ताफा !... ना अवती भोवती माणसे... ना पोशाखी डामडौल !..... ना चेहऱ्यावर अर्विभाव !
*गणपतआबा देशमुख* ,
आमदार सांगोल्याचे !
साधा माणूस... आपला माणूस !
,*12*वेळा सलग आमदार म्हणून निवडून आलेला !
त्यांची पुनः आठवण यायचे कारण म्हणजे राधाकृष्ण ग्रुप खरसुंडीवर आलेली ही माहिती !
एक दोन वाक्यातच त्यांचे ९४ वर्ष वयाला अनं आजही अनवाणी पायी फिरण्याला सलाम केलेला !
*आमदारांच्या वेतनवाढीच्या जमान्यात माझे लक्ष गेले पोस्टचा या भागावर*-
'' आमदारांचे घरात अठराविश्व दारिद्र्य !!
तो अनामिक लेखक पुढे लिहतो _
'सोलापूरला असताना वैयक्तिक कामाच्या निमित्तानं सांगोल्याला गेलो होतो. गणपतरावांच्या ऑफिसमध्ये साध्या लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या. गावातले लोक त्यांना आबा म्हणतात. आबा आणि आबांचं हे घर पूर्वीपासून असंच, साधं असल्याचं गावकरी सांगतात.
या वयातही आबा सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतात. रात्री उशिरापर्यंत ते सुरू असतं. सर्व अधिकारी त्यांना मानतात. त्यांनी सांगितलेलं काम झटपट करतात. सांगोल्यात तर सरकार दरबारी लोकांची कामं अडवली जात नाहीत.
डोंगराएवढं काम करून हा मनुष्य `मी केलं.’ असं म्हणत नाही. सतत आम्ही केलं, आमच्या पक्षानं ( शे का प )केलं असं म्हणतो. सभा संपल्यानंतर त्यांच्यासोबत सूतगिरणीतल्या गेस्ट हाऊसवर गेलो. भव्य परिसर. जवळ आलेल्या कर्मचाऱ्याला त्यांनी सांगितलं, `हे शिक्षणसेवक आहेत. यांची इथं रहायची व्यवस्था करायची. चांगली रुम द्या. गेस्ट हाऊसमध्ये एवढय़ा उशिरा जेवण शिल्लक नसणार. हे शंभर रुपये घ्या. जवळपासच्या हॉटेलवर यांना जेऊ घाला. या शंभर रुपयांत आताचं जेवण उद्याचा नाश्ता होईल. उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था मी करीन.’
मला इतर सहकार सम्राटांचा बडेजाव, त्यांचं वैभव आठवलं. हा नेता असा. तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप त्यांच्यावर कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात गणपतरावांसारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. त्याना पाहून मला तुकोबारायांचा अभंग आठवतोय.
*'चंदनाचे हात, पायही चंदन*
*परिसा नाही हीन कोणी अंग*
दीपा नाही पाठी पोटी अंधकार
सर्वांगे साकर अवघी॥'*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
मी ही इतरांच्यासारखं गडबडीत आमदार साहेबांचे हातात हात दिला !
'हे औंधचे आहेत ! '
(मी त्यांचे मतदार संघातला नव्हतो )..
ते म्हणाले - ' तुम्ही औंधच्या देवीचे पुजारी ना ! ...औदुंबर ( आमचे मामा ) बोलले होते मला !.. .... मी मानेनचं हो म्हटलं !
मग परत झुंबड !
वधू - वरांना आशिर्वाद देवून गणपतराव माघारी !
' अहो असे सगळ्यांच्याच मिसळतात ते !.... *अगदी घरच्या सारखे !*.. *सगळ्या मतदारसंघावर घारीची नजर अनं आईची माया आहे त्यांची* !
'असे आमदार मिळो सर्वां !
☘☘💥☘☘💥☘☘
१२ ऑगस्ट२०१६ , क्र २६
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment