सकारात्मक विचार

*॥👁वाचावे आनंदे👁॥*                 .                राजेंद्र गुरव, यमाई औंध
*॥सकारात्मक विचार ॥*

ऑलंपिक स्पर्धा चालू आहे. ...
यादीमध्ये भारत खूप मागे आहे..
चिनचा वृत्तपत्रांनी भारताचे या  द्रारिदयावर बोटं ठेवल आहे. 

ते एवढे यशस्वी अन आपण का मागे ? हा प्रश्न साहजिकच !
' .... एवढा अभ्यास पूर्ण कर , मग खेळायला सोडतो _ या भारतीय पालक व शिक्षक यांचे मानसिकतेची खिल्ली उडवणारे जोक मिडीयावर येत आहेत.

मला असते वाटते की आपल्या समजुती व नकारात्मक विचारांचा मोठा रोल आहे या मागे !

आपल्यापैकी बर्‍याच जणांना  प्रचंड यशस्वी माणसांबद्दल आदर आहे, ओसांडून वाहणारे प्रेम आहे पण प्रश्न  आहे आपण तसा प्रयत्न करण्याचा !
.
... . 'मोठी स्वप्नं पहाणे.. आणि त्या दिशेने पळत सुटणे.... मी जिंकणारच असं स्वतःला बजावणे ... आणि त्याप्रमाणे सदैव कार्यरत रहाणे..  
संकटांनाही संधी मानने :  या आणि अशा अनेक गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जेचा एक स्त्रोत कार्यामागे सदा रहातो व तो यशाची वाट सफल करतो !

 यशस्वी माणसांचे एकूण वागणेच
*सकारात्मक दिसेल... त्याचा शब्द अनं कृती  स्वतःची स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने अग्रेसर असेल ?
अशा अविश्रांत कृती करण्यास त्यांना कोठून प्रेरणा मिळते?
नकारात्मक बाबी कामात अडथळा आणणाऱ्या बाबी आणत असतील तर सकारात्मक बाबी प्रेरणेच्या विविध वाटा दाखविण्याचे काम खचीतच करणार !

व्यक्ती वर झालेले संस्कार सवयी बनतात. त्याचे कृतीही संस्कारानुकूल होतात. पण कृतीमागे अदृशपणे एक गोष्ट काम करते -ती म्हणजे त्याचे समजुती.

सकारात्मक समजुती कामाला बळ देणारचं ... पण चुकीच्या समजुती घोटाळा करणारचं !

आपण जे काही साध्य करतो त्या मागे आपल्या अंतरमनात रुजलेल्या समजुती कारणीभुत असतात.त्या समजुती कामावर परिणाम करतात. काही वेळा अडथळे निर्माण करतात .

लहानपणा पासून विशिष्ट गोष्टींसाठी मानसिकता निर्माण करायला हवी  माणसांच्या काही विशिष्ट सकारात्मक समजुतीमुळे त्यांचे कड्न विशिष्ट प्रसंगी विशिष्ट कृती होतात. यशस्वी- अशस्वी लोकांत जो काही क्षणांचा फरक पडतो - यात या समजुती महत्वाच्या ठरतात.

सकारात्मक कृती इतकेच सकारात्मक संभाषण ही परिणाम घडवित असते.

यशस्वी माणसांना आपले विचार इतरांबरोबर प्रभावीपणे मांडता येतात. त्यांच्या सकारात्मक संभाषण कौशल्यामुळे त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येतो. परंतु बर्‍याच माणसांना आपल्या विचारांना इतरांसमोर स्पष्टपणे मांडता येत नाही. 

 आयुष्यात सकारात्मक विचारउत्साहाची देणगी देते ,तेथे आळसाची कमतरता असते. आपण जे करु ते सकारात्मक व सळसळत्या उत्साहाने ! तर आपले ध्येय साध्य करणे सोपे होते , कामाचे ओझे वाटत नाही !
आपण पूर्वी समुद्र सफर ही पाप मानायचो .. मग नौकानयनात यशाचे माप कसे मिळायचे... समजुती साफ सकारात्मक तरच भारतात यशमार्ग प्रशस्त होतील असे मला वाटते !
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510