महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा*

👁️🌴👁️वाचावे आनंदे ३०


🕉🕉🕉🕉


*महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा*

या विषयावरील शोधनिबंध माननीय श्री सदानंद आगलावे जेजुरी  यांनी सादर केला होता.  ते म्हणतात -
'
' उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा !  खंडोबाम्हणजे साक्षात शिव शंकराचा अवतार असं म्हणलं जाते. कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल या दोन देवतांचा दैत्यांचा बिमोड करण्यासाठी भगवान शिवांनी जो अवतार घेतला तो खंडोबा.
 अवताराचा दिवस होता चैत्री पौर्णिमा. देवाचे अवतार स्थान कही पठार (कडेपठार ) तर देवानी राक्षसाला मारलेला दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा अष्टमी. महादेवांनी हातात खड्ग घेऊन राक्षसाचे खंडन केले म्हणून खंडोबा नामाधिमान  !

 देवांची पत्नी माळसादेवी अर्थात साक्षात पार्वती माता ! जेजुरी या तीर्थस्थळी दोघांचे एकत्र स्वयंभू लिंगस्थान आहे .त्यामुळे नवदांपत्यांना जेजुरीला दर्शनासाठी आणतात अशी प्रथा  !

मल्ल दैत्याचा संहार केला म्हणून देव मल्हारी नाम पावला.
 सदा आनंद निर्माण करणारा भक्तांसाठी तोच सदाआनंद झाला आहे.

भंडारा उधळताना सदानंदाचा येळकोट असा जयजयकार करतात. येळकोट हा कानडी शब्द आहे म्हणजे सात कोट म्हणजे कोटी अर्थात 70000000 सैन्याचा जो मालक हा असा !
 जेजुरी म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत ! कुलदैवत म्हणजे कुलाचा रक्षण करणारी संभाळ करणारी देवता !
 देवतांना प्रसन्न करण्यासाठी वर्षातून देवाची वारी  करावी,देवाला पुरणपोळीचा नैवेद्य करावा अशा प्रथा. जागरण गोंधळ अभिषेक इत्यादी विधी केले जातात या सर्व विधींचे कुलधर्म कुलाचार करण्याची जबाबदारी प्राचीन काळापासून गुरव समाजाकडे आहे. अनेक घराण्यांचे कुलोपाध्याय, पुरोहित म्हणून पौराहित्य  गुरव  करतात.
*छ्त्रपति शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राजमाता जिजाई माता यांनी गुरव समाजाकडे श्रींच्या पूजेचे, अभिषेकाचे हक्क सूर्य _चंद्र असे पर्यंत राहतील असा आशयाचा ताम्रपट छत्रपतींच्या मोहर शिक्क्यासह दिलेला आहे तो आजही उपलब्ध आहे* *यामध्ये आगलावे,बारभाई ,सातभाई, दिडभाई अशी चार घराणी आहेत.

 देवांच्या इतर सेवेसाठी घडशी व कोळी आहेत.

 मंदिर गाभाऱ्यामध्ये मध्ये 3 स्वयंभू लिंगे आहेत. मध्यभागी देव खंडोबा, डाव्या बाजूस म्हाळसादेवी व उजव्या बाजूस बाणाई देवी आहे.

 खंडोबा हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. मोठे कामासाठी सुरूवात करताना, बाहेर निघताना किंवा पूर्वी युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी देवाच दर्शन व नवस बोलण्याची पद्धती आहे.
 कुलाचारामध्ये घरातील टाक किंवा मूर्ती  घेऊन देवाच्या भेटीला जेजुरी येणे ही पद्धत आहे.
खंडोबाचे जागरण तर देवीचा गोंधळ असतो शिवशक्ती ची एकत्र आराधना होते .

देवाची पूजा तीन वेळा ( त्रिकाळ पूजा ) होते. पहाटे पाच वाजता काकडा ,भूपाळी ! त्यानंतर पंचामृत स्नान ,अभ्यंगस्नान ,रुद्रावर्तन यानंतर देवाची पूजा होती.
 दुपारी धुपारती, रात्री साडेआठ वाजता शेजारती होते ,यामध्ये पंचामृत स्नान अभ्यंगस्नान देवाला अंघोळ करून यथासांग पूजा करून रात्री देवांची १ोज फुलांनी सजवतात . नैवेद्य दाखवून देवाना झोपवले जाते व नंतर मंदिर बंद होते.
 जेजुरीला काही प्रमुख यात्रा आहेत. चैत्र पौर्णिमा या दिवशी देव अवतीर्ण झाले  म्हणून,चंपाअष्टमी या दिवशी, या दिनी  पुरणपोळी व भरीत रोडगा यांचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.
 देवाला तेल लावतात .

पौष महिन्यात  खंडोबाचे लग्न पाली येथे असते .
महाशिवरात्र हा जेजुरीमध्ये वैशिष्टपूर्ण व मोठा उत्सव  उत्सव !

खंडोबा हे प्रभू राम ,कृष्ण, रावण, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत आहे. आणि संत, महंत देव यामध्ये स्वामी समर्थ, साईबाबा, देवदर्शनासाठी जेजुरी  आल्याचे उल्लेख आहेत.

 तर मौर्य, चालुक्य, उदा. राजा पुलकेशी, घोरपडे,  शिर्के, पवार, कदम, जगताप,  औंध पंत, बडोदागायकवाड , ग्वाल्हेरशिंदे असे अनेकांचे अर्थात सर्वसामान्य लोक, राजेरजवाडे ,व्यापारी, शेतकरी , बलुतेदार अठरापगड जातींचे खंडोबा हे कुलदैवत आहे !

🔷🔷🔶🔶🔶🔹🔹
@राजेंद्र गुरव

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510