जगनही जानन्या झालं मुश्किल

👁️🌴👁️
*वाचावे आनंदे* भाग २७
यमाई औंध,राजेंद्र गुरव

*जगनही जान्यां झालं मुश्किल !*

कित्येक लोकांचे पुढे अनपेक्षित परिस्थिती !
 नियोजनाला वेळ नाही आणि हाताशी फारशी साधने नाहीत. घरातील, बाहेरील उद्याचं चित्र स्पष्ट नाही .घरातील संपत आलेला बाजार... आणि तरीही माणसं लढतच आहेत. शासनावर या साऱ्याचा  फार मोठा भार असणार आहे. फार मोठी तरतूद जेवण आणि आरोग्य या दोन घटकांच्या करावी लागते आहे.
 हातावर ज्यांचे पोट आहे अशी माणसं अगोदरच संसाराची दोन टोकं मिळताना मेटाकुटीला आलेली. दोन घासाची ज्यांना भ्रंत, त्यांना कशी मिळेल विश्रांत !

मिळेल ते खाणे . त्याचा दर्जा न पाहता खाली आणि पोटाची खळगी भरणे पोटाची आग शांत करणे. हे गरिबांच्या पाचवीला पुजलेले.... सज्जन शक्तीची सजगता एवढेच काय त्यांच्या हाती राहिले आहे.

लॉकडाऊन होण्यासाठी
माझ्याकडे घर आहे,
दोन्ही वेळा भागवायला
अन्नही पोटभर आहे ! १
मनोरंजन खूप आहे,
टीव्ही आणि इंटरनेट,
हवं ते मिळतंय सारं,
एक फोन करता थेट ! २
दिवसभर व्हॉट्स अप चालू,
भ्रमणध्वनी हाताशी,
कपाटात पुस्तकांच्या
रचून ठेवलेल्या राशी ! ३
खूप जरी नसले तरी
पैसे आहेत खात्यामध्ये,
गळ्यात गळा नसला तरी
ओल आहे नात्यांमध्ये ! ४
वीज आहे, पाणी आहे,
तसं काहीच कमी नाही,
उगीच कशाला कण्हायचं,
कारण काढत काहीबाही ! ५
कित्येक जण असे आहेत,
ज्यांच्याकडे नाही सारं,
कसं असतील जगत ते,
एकांताचं झेलत वारं ! ६
त्यांच्याकडे नाही बरं कां
वरीलपैकी एकही गोष्ट,
शारीरिक अन् मानसिक
नशिबामध्ये केवळ कष्ट ! ७
तुलनेमध्ये त्यांच्या आपण
सुखी आहोत कितीतरी,
देवाजीची आपल्यावरती
कृपा आहे हीच खरी ! ८
कृतज्ञ मी देवा तुझा
जे दिलंस त्याच्यासाठी,
ज्यांच्याकडे काहीच नाही
ठेव थोडं त्यांच्यासाठी !🙏🏻

🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
@राजेंद्र गुरव

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510