रणशिंग व शिंगवादकपांडूरंग गुरव

👁️🌴👁️
वाचावे आनंदे - ३१

*रणशिंगांची रणधुमाळी*

 शिंग म्हणजे चैतन्य,स्फूर्ती.. अंगात शिरणारे वारे !
 शिंग, तुतारी ,रणशिंग, मोगलशिंग पिंपोळी इत्यादी अनेक नावाने शिंग ओळखलं जायचं .स्वागतासाठी, स्फूर्ती दायक वातावरणासाठी  शिंग आणि युद्धभूमीवर ही रणशिंग फुंकले जायचं  उत्सव समारंभ यांची सुरुवात, पाहुण्यांचे स्वागत यासाठी शिंग फुंकले जाते.

 भगवान शंकरांचे पाच शिष्य, त्यातील शृंगी नावाच्या शिष्याने महादेवांच्या विवाहावेळी नंदी बैलाचे शिंग  वाजवले. मंगलमय वातावरणात पुष्पवृष्टी वेळी, शिंग वाजले तेव्हापासून लग्नकार्यात शिंग वाजवण्याची प्रथा प्रचलित आहे .शृंगी यांनी आपल्या ओठाच्या साह्याने एकाच श्वासात  फुंकून जो नाद निर्माण केला ता शिंगनाद  म्हणून आजही प्रसिद्ध आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शिंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.   गडावरून पायथ्याशी असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला तुतारी मार्फत वेगवेगळे संदेश दिले जात . शिंगाचा जणू मोबाईल झालेला.

तसेच युद्धात स्फूर्ती देण्यासाठी हर हर महादेव ,जय भवानी या गोष्टी बरोबर रणशिंगाची ही साद असे.

 आजही महाराष्ट्रात वाटेगाव( सांगली) सातारा, कराड ,कोल्हापूर ,अशा अनेक ठिकाणी तुतारी वाजली जाते.

 तुतारी वादनाच्या प्रक्रियेने उत्तम प्राणायाम होतो. उत्तम श्वसनाने,व्यायामाने हृदय व फुफ्फुस मजबूत होतात .

सध्याच्या काळात तुतारी वादकांना विशेष पोशाख असतो. डोक्यावर फेटा, कपाळी टीळा - ज्यातून शिवतत्त्व जागृत होते, कानात कुंडले, मोत्यांच्या माळा, बाराबंदी पोशाख इत्यादीमुळे तुतारी वादकाचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते.

हा शोधनिबंध सादर करणारे श्री पांडूरंग गुरव यांचेविषयी -

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गाव वाटेगाव ,त्याच गावातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुतारी वादक पांडुरंग गुरव यांचा जन्म 8 डिसेंबर 1968 रोजी झाला .
त्यांचे वडील शंकर वाटेश्वर गुरव ,पंडित गुरव या नावाने प्रसिद्ध ! वाटेश्वराची पूजा त्यांच्याकडे परंपरागत चालत आलेली. ते उत्कृष्ट शिंग वादक होते .त्यांचाच वारसा पांडुरंग गुरव यांनी चालवला .सहा फूट उंची, पिळदार बांधा असं त्यांचं व्यक्तिमत्व !
 शिंगवादनामध्ये उत्तम प्रगती साधल्यामुळे आणि  सातत्यामुळे त्यांना प्रसिद्धी  मिळाली.

 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, एक मे या कार्यक्रमातून त्यांनी आपली कला सादर करण्यास सुरुवात केली .

या कलेचा प्रसार करण्याचेही त्यांनी काम केलेले आहे. सुमारे पन्नास जणांना त्यांनी विनामूल्य प्रशिक्षण दिले आहेत .यासाठी लागणारी साधन सामुग्री ड्रेस इत्यादी स्वतः घेऊन दिले. आहे

अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तुतारी वादक यांचे झालेले काही विशेष कार्यक्रम !

 13 मे  2010 मॉरिशस ,मराठी मंडळ फेडरेशन यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त माननीय पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्या उपस्थितीत  !

तुतारी वादन 23 , २४ सप्टेंबर 2013 अमेरिकेतील टाइम स्क्वेअर चौकात, दिवाळीनिमित्त शंकर महादेवन यांच्या जय जय महाराष्ट्र गीताचंची सुरुवात त्यांच्या तुतारी वादनाने झाली

 2015 कोयासान विद्यापीठ, जपान! डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्घाटन तत्कालीन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत तुतारी वादन !

 2010 राष्ट्रकुल स्पर्धा कॉमनवेल्थ स्पर्धा

भारतीय नौसेना, भारतीय आर्मी, मुंबई पोलीस, अनेक मंडळे, विविध  वेळी -मंत्रालय राजभवन  येथे,विविध शासकीय समारंभ प्रसंगी अनेक ठिकाणी,
 2006 आंतरराष्ट्रीय सुरजकुंड मेळा, अनेक किल्ल्यावरती  वेळोवेळी,
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या गणेश उत्सव प्रसंगी ,

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, मुंबई फेस्टिवल, उदयपुरी फेस्टिवल, दिल्ली फेस्टिवल  इ वेळी.

पानिपत ,तानाजी मुंबई मिरर इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये..
 फू बाई फू, चला हवा येऊ द्या, अशा विविध कार्यक्रमांमध्ये...
 या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या  पांडूरंग गुरव यांचे कार्यक्रम झाले आहेत त्यांना मानाचा मुजरा !

🔷🔷🔶🔶🔶🔹🔹
@राजेंद्र गुरव

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510