आळंदीतील गुरव समाजाची पूर्वपीठीका व थोर संत ह भ प पानसरे महाराज गुरव*
👁️🌴👁️
*वाचावे आनंदे* भाग ३३
यमाई औंध,राजेंद्र गुरव
🕉🕉🕉🕉
*आळंदीतील गुरव समाजाची पूर्वपीठीका व थोर संत ह भ प पानसरे महाराज गुरव*
हा शोधनिबंध ॲड कृष्णाजी ज्ञानेश्वर पानसरे यांनी सादर केला होता.
या शोधनिबंधाचे सुरुवातीला गुरव समाजाच्या संबंधीने काही बाबींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे .
संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी ,हजारो वर्षापासून सिद्धेश्वराचे मंदिर आळंदी येथे आहे व गुरव समाजातील पुजारी हजारो वर्षापासून तिथे पूजा-अर्चा करीत आलेले आहेत .
संत नामदेव म्हणतात *आळंदी हे गाव! पुण्यभूमी ठाव! दैवताचे नाव! सिद्धेश्वर!*
ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंती शेजारी ग्रामदैवत भैरोबाचे मंदिर आहे व अशी वंदता आहे की, त्या मंदिराखाली काशीची गंगा गुप्त रूपाने आहे व नदीच्या काठी मणिकर्णिका घाटावर ती अवतीर्ण झाल्याचे दिसते. येणारे भाविक सारे तीर्थ अवश्य घेतात. दर्शनास गेलेल्या भक्तास गुरव ही माहिती अवश्य देतात .
1920 च्या सुमारास आळंदी तीर्थक्षेत्र येथे गुरवांची बहुसंख्य घरे होती.
गुरवांची प्रामुख्याने आडनाव वाघमारे आहे. त्यासंबंधी कथा सांगितली जाते सिद्धेश्वराचे मंदिर जंगलात होते. लोकवस्ती नव्हती .भक्ष्याच्या शोधात आलेल्या वाघ गुरव मंदिराबाहेर कधी येतो याची वाट पाहत राहिला. गुरव पुजाऱ्याने भगवान शंकराचा धावा केला महादेव म्हणाले 'तुझ्या अंगात एवढी शक्ती आहे की तू वाघाला मारू शकतो. तू भिऊ नको माझं अभय आहे तुला! ' त्याप्रमाणे त्या गुरव पुजाऱ्याने धैर्य शक्ती प्राप्त झाली. त्याने पूजेला आणलेल्या कळशी *वाघाच्या तोंडात घातली व जबडा पाडून टाकला. " तेव्हापासून गुरव यांना वाघमारे आडनाव पडले*
*काही तज्ञांच्या मते गुरव येथील सर्व देवी-देवतांचे पुजारी असून प्रामुख्याने सिद्धेश्वर ,पद्मावती या या प्रमुख देवता आहेत .वाघमारे हा शब्द व वग्गु मारी या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. वग्गु म्हणजे भक्त व मारी म्हणजे देवी ! हे कानडी शब्द आहेत. याचा अर्थ देवीभक्त या अर्थाने वाघमारे शब्द रूढ झालेला असावा*
*आळंदी हे प्राचीन शिव पीठ आहे शिव पीठ हे जुनाट !ज्ञानाबाई तेथे मुगुट! वेदशास्त्र देती ग्वाही I म्हणती ज्ञानाबाई आई | इ संत एकनाथ महाराज यांनी केलेले हे वर्णन आहे*
जनाबाई एका ठिकाणी म्हणतात _ *सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार*
आजही आळंदीहून पंढरपूरला पालखी सोहळा जातो ,त्याचा मुक्काम आजोळ घरी म्हणजे गांधीवाडा (अलीकडच्या काळातील ) येथे संत ज्ञानेश्वर मंदिराशेजारी गुरव आळी जवळ थांबते.
आळंदी मध्ये संत सं संप्रदायाची मोठी परंपरा असल्यामुळे ,अनेक साधक तेथे येतात.
या सर्वांना सर्व ग्रंथांचा अभ्यास एकाच ठिकाणी मिळावा ,मृदुंग वादन, संस्कृतचे अध्ययन ,कीर्तन प्रवचने व पोट भरण्याची काहीतरी विद्या देणारी संस्था असावी असा विचार करून वै ह भ प मारुती बुवा गुरव यांनी विष्णुबुवा जोग महाराज., लक्ष्मण बुवा इत्यादी सहकाऱ्यांना घेऊन *वारकरी शिक्षण संस्थेची आळंदी येथे स्थापना केली* *24 .3 1917 रोजी ही संस्था स्थापन झाली* *मारुती बुवा गुरव हे चिटणीस कार्यवाहक म्हणून 1922 ते 1943 पर्यंत कार्यरत होते* .. क्रमश :
🔷🔷🔶🔶🔶🔹🔹
@ यमाई औंध,राजेंद्र गुरव ९५६११५४१४०
🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
@राजेंद्र गुरव
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment