कुणी ना पाहिले संकट ?

👁️🌴👁️
*वाचावे आनंदे* भाग  ४४
यमाई औंध,राजेंद्र गुरव

*जीवनी कुणाच्या आले ना संकट, कुणाचे जीवन सदा निष्कंटक*

 ज्यानं आपल्या जीवनामध्ये संकट पाहिलं नाही, दुःख पाहीले नाही असा मनुष्यच नसावा  मुळी !
'सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताएवढे ' ही मानवाची अवस्था आहे .
पण आलेल्या परिस्थितीला माणूस कसे सामोरे जातो हेही महत्त्वाचे आहे. स्थितीचे रडगाणे गायचे कि तिला हसत-हसत समोर जायचे.
 दुःखही चांगलंच झोंबतयं, अशी माणसाची प्रवृत्ती दुःखाला दुःख वाटू देणार नाही. सदानंदाचे रुप देण्याची ही प्रवृत्ती  व्यक्तीला वेगळ्या यशस्वी उंचीवर नेऊन ठेवेल ही निश्चित !

 *अनुपम खेरचा हा एक किस्सा ऐकला होता.*

*त्यात त्यांनी एक प्रसंग सांगितला, मनाला खूप भावला..*
*'आखरी रास्ता' ची शूटिंग चालू होती. अनुपम खेर तयार होत होते. सेट वर एसी नव्हता..प्रचंड गर्मी होत होती. मी इतका मोठा कलाकार आणि आणि माझ्यासाठी एसी नाही, ह्या भावनेने त्यांचा इगो दुखावला गेला.*
*त्यांनी व्यवस्थापन कमिटीला धाऱ्यावर धरलं.*
*खूप काही ऐकवलं.*
 *थोड्या वेळाने त्यांचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं..तिथे अमिताभ बच्चन एका खुर्चीवर पुस्तक वाचत बसले होते. त्यांचं ते दाढीचा गेटअप, अंगावर शॉल आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही त्रास दिसत नव्हता.*

*ते उठले आणि अमितजी कडे गेले..*
*ते बोलले..*
*"सर..बहुत गर्मी है.."*
*"हं" असं म्हणून त्यांनी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं..*
*"आपको नही हो रही गर्मी सर?"*

*अमितजी ने डोकं वर केलं आणि बोलले..*
*"गर्मी के बारे में सोचता हूँ, तो होती है..वरना नही होती.."*

*ह्या एका वाक्यात जीवनाचा सार सांगितला आहे त्यांनी..*
*आज सगळीकडे भयावह परिस्थिती आहे..पुढे काय होईल ह्याची चिंता आहे..*
*पण रात्र नंतर सकाळ अटळ आहे..ह्याच्या आधीही खूप संकट आले आहेत* *मानवजातीवर पण त्यावर आपण मात केलं आहे..*
*आज बऱ्याच लोकांमध्ये नैराश्य येत आहे..मानसिक संतुलन जात आहे..*
*हे काही अंत नाही..ह्यातून बाहेर पडणारच आहोत आपण..*
*आपण ह्या परिस्थितीकडे कोणत्या स्वरूपात पाहतो, त्यावर आपल्याला त्रास होणार का आपण आनंदी राहणार हे ठरलेलं आहे.*

*ह्या काळात मी न घाबरता जगलो, आनंदी होतो,लोकांसाठी जितकं शक्य तितकं केलं..ह्या आठवणी बनवायचे आहेत का मी सतत घाबरत, रडत, सहानुभूती घेत दिवस काढले अशा आठवणी करायचे आहेत हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे*

*चिखलात राहूनही कमळ त्या चिखलापासून अलिप्त राहून, प्रसन्नतेने फुलत राहते. चिखलाचा लवलेशही त्याच्या जीवनात  प्रवेशित होऊ शकत नाहीत. काट्यात राहून गुलाबही आनंदात फुलून जातो आणि इतरांनाही आनंद देत राहतो आणि फुलांचा राजा बनून जातो*

🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510