बुद्ध पौर्णिमा

👁️🌴👁️
*वाचावे आनंदे* भाग ३५
यमाई औंध,राजेंद्र गुरव

* बुद्ध पौर्णिमा*

गौतम बुद्धांची ही कथा तर प्रसिद्ध आहे.
कित्येकदा वाचलेली,  ऐकलेली.                                      .
...युध्दातील लढवय्या हत्ती म्हातारपणी चिखलात रूतला. बराच प्रयत्न करून बाहेरच येता येईना. शेवटी मनाने खचून खाली बसला. माहूताने अनेक लोकांच्या सहाय्याने वेगवेगळया दोर्‍या-काठया वापरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. तेथून गौतम बुद्ध जात असताना लोकांनी ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी लोकांना हत्ती हा पूर्वीचा युद्धलढवय्या असल्याने चिखलाच्या चारही दिशेला युद्धाचे वातावरण तयार करून युद्धनगारे वाजवण्याचा सल्ला दिला. या कृतीने नगार्‍याचा ध्वनी ऐकून हत्ती शरीराची हालचाल करून उठून जोरात मुसंडी मारून चिखलाच्या बाहेर पडला. हत्तीच्या आत चिखलातून बाहेर पडण्याची प्रचंड ऊर्जा मुळातच होती. फक्त तिला जागवण्याचे काम लोकांनी युद्ध नगार्‍यांच्या माध्यमातून केले.

म्हणून आपल्या आत असलेल्या प्रचंड ऊर्जेच्या स्त्रोताला जागवण्यासाठी सकारात्मक विचार करा व मनाची उभारी वाढवा.
💥गांधी व बुद्ध यांची एक गोष्ट

मोठ्या माणसांबद्दल बोलणाऱ्या छोट्या माणसांसाठी आणि ह्या बोलण्यावरून डोक्यात राख घालून घेणाऱ्या माणसांसाठी,

माणस मोठी कशी होतात.

गांधीजींची छोटी गोष्ट.

एका इंग्रजाने पत्र पाठवल.तीन चारी पानी पत्रात फक्त शिव्या लिहिलेल्या होत्या.
गांधीजींच्या सहायकाने पत्र गांधीजींना वाचायला दिल.
त्याची अपेक्षा होती त्या इंग्रजाला उत्तर देण्याची.
गांधीजीनी पत्र वाचल आणि त्याला लावलेली टाचणी काढून बाजूला जपून ठेवली.
सहायकाने न राहवून विचारल, " बापू, त्याने एवढ्या शिव्या दिल्यात तुम्हाला आणि तुम्ही उत्तर दिल नाहीत उलट फक्त टाचणी काढून ठेवलीत ? "

गांधीजी उत्तरले , " त्यात तेवढी टाचणी उपयोगाची होती. "

आता बुद्धाची गोष्ट.

वेगवेगळ्या गावातून फिरत असताना एका गावात आल्यावर बुद्धाना लोक शिव्या द्यायला लागले.
थोड्या वेळाने लोकांचा आवेग ओसरल्यावर बुद्धांनी विचारल , " झाल कि अजून बाकी आहे ? "
लोकांना आश्चर्य वाटल, एवढ्या शिव्या दिल्यावर तुम्ही चिडला का नाहीत म्हणून त्यांनी बुद्धाना प्रश्न विचारला.
बुद्ध म्हणाले, " मागच्या गावातल्या लोकांनी मला फळ,मिठाई,उत्तम सरबत अस बरच काही दिलेलं, मी ते तसच पुन्हा वाटून टाकल., तुमच्या शिव्या मी घेणारच नाही तर त्याचा मला राग का यावा ? "

माणस मोठी होतात ती अशी !

आपल्याला ह्या माणसांवर शितोंडे उडवणाऱ्या माणसांच्या सोबत कुस्ती खेळायला चिखलात उतरायचं कि दुर्लक्ष करून ह्या माणसांच्या मार्गावर चालायचं हा निर्णय आपला.

भगवान गौतम बुद्ध ज्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून चालले. ज्यांनी ज्या तत्वाची शिकवणूक अखिल जनतेला दिली, मानव जातीला दिली.

 ती अजूनही अनेक देशांमध्ये स्थित आहे.
 भारताची एक ओळख गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे. जगातील अनेक मान्यवरांना ,देशांना भेटताना भारताला ही ओळख नेहमीच उपयोगी पडली आहे.
🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
@राजेंद्र गुरव
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510