तो

काहीही म्हणा
तो संसाराचा कणा
घरादाराचा तंबू
त्याच्याविना उणा ॥
रुंद त्याची छाती
अनं बळकट खांदा
अनेक रुपे अनेक मार्गे
तो जगाचा पोशिंदा ॥
आघाडीवर लढून
झेली संकटाचा मारा
जीवन कसरतीने
सांभाळी जगाचा डोलारा ॥

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510