म गांधीजींचा परिसस्पर्श

🇮🇳🇮🇳 *परिसस्पर्श*

सामान्यांना नव्हत्या राजकीय आकांक्षा
राजसत्तेच्या खिजगणीत त्यांच्या अपेक्षा
परंपरेची मानसिक ,राजकीय गुलामगिरी.,
 समता कोठे?...सदा लोकांची उपेक्षा ॥

भरडून जाणे , पिचत पडणे
वरूनी चाले - परंपरेचा वरवंटा
थपडा खाणे, वाकून जगणे ,
एकवार विरोधक ठरे करंटा ॥

सत्ताधांच्या साठमारीत
सामान्यांचे  अस्तित्वच लपणे
त्यांचे अश्रू,दुःख अपार
गांधींनी  सह्रदयतेने जाणणे ॥

सलामीलाच त्यांनी हे दैन्य टिपले I
राजदरबारी परखड स्पष्ट सत्य मांडले
लोकांना, पीडीतांना,श्रमवंताना
आपली भाषा बोलणारे,
दुःख मांडणारे गांधी आपुले वाटले ॥

सीमीत असलेली राष्ट्रसभा
गांधींनी गावोगावी नेली
सर्वसामान्यांची नेतृत्व
त्यातूनी पुढे आली ॥

चंपारण्य,अमदाबाद खेडा
आंदोलनानी रान उठवले
सामान्यांचे प्रश्न कसे सोडवावे
भारतावर्षात पटविले, रुजविले ॥

आंदोलनातूनी प्रश्न सोडविले
असंख्य लोक नेते जोडले
संसारी स्वप्नं अपेक्षा सोडूनी
भारताचे चरणी सर्वस्व अर्पिले ॥

जे येवूनी त्यांना मिळाले
सर्वस्वी त्यांचे झाले
सरदार, राजेंद्रप्रसाद इ नेताजी
एक जीव कायम राहिले ॥

२७ वी वर्षाचीअखंड आराधना
स्वतंत्र भारत, स्वतंत्र जनता
भारतवर्ष हर्षे  सण साजरा
स्वातंत्र्यसम आनंद ना दुसरा ॥

घ्यावी ना वाटली उसंत
असा राजयोगी संत
भिडला नौखालीतील वणव्याला
पिडीतांचे अश्रू पुसण्याला
शमली दंगल  शमला वणवा
स्तिमीत जग करी महात्म्या वंदना ॥

नको श्रेय, फोटो वा स्तुती
 नको  विरोधी टिका विखारी
लोकांचे सदा दुःख निवारीन
ध्येय एकच ,जरी पाय अंगारी ॥


सर्वसामान्यांचा,गुरुदेवांचा महात्मा
नेताजी गौरवी साक्षात राष्ट्रपिता
टाईम्स निवडी हा शतकांचा नेता
बीबीसी म्हणे सहस्त्रसर्वोच्च नेता

कित्येक पदव्या, कित्येक सन्मान
जगाने केले  महात्म्यास दान ॥
आईन्स्टाईन,बराक,मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग..कित्येक )
कित्येक लढती घेऊनी मानवतेचे वाण ॥


यमाई औंध,राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
२८.५.२०२०

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510